Marathi Ukhane for Female : आपल्या धर्मात खूप साऱ्या धार्मिक पद्धती आहे , ज्या धार्मिक कार्यात केल्या जातात. त्यातलीच एक पद्धत म्हणजे उखाणे घेणे. धार्मिक कार्यात उखाणे घेण्याची पद्धत खूप जुनी आहे. धार्मिक शुभकार्यात किंवा सणासुदीला रचून म्हटलेल्या मजेदार तुकड्यास ‘उखाणे’ असे म्हणतात. सर्वात जास्त उखाणे हे लग्न कार्यात नवऱ्या मुलाला किंवा नवऱ्या मुलीला विचारले जातात. आजही उखाणे (Ukhane Marathi for Female) घेण्याची संस्कृती टिकून आहे. विशेषतः स्त्रीजीवनाशी निगडित असलेला उखाणा स्त्रियांच्या मनातील भावना मोकळी करण्याचं प्रभावी माध्यम आहे.
चला मग आज आपण लग्नातील उखाणे, मंगळागौर उखाणे, संक्रात उखाणे , दिवाळी उखाणे, हळदी कुंकू उखाणे म्हणा किंवा कोणत्याही धार्मिक शुभकार्यातील उखाण्यांबद्दल जाणून घेऊया.
Ukhane Marathi for Female
यमुनेच्या किनाऱ्यावर कृष्ण वाजवितो पावा,
***रावांचे नाव घेते तुमचा आशीर्वाद हवा.
समर्थांचा दासबोध अनुभवाचा साठा,
***चे नाव घेते तुमचा मान मोठा.
सीते सारखे चारित्र्य, रामा सारखे रूप,
***राव मला मिळाले आहेत ते अनुरूप
शंकराच्याच्या पिंडीवर वाहते जवस,
***रावांचे नाव घेते संक्रातीचा दिवस.
एकविरा आईच्या देवळात सोन्याचा कळस,
*** चं नाव घ्यायला मला नाही आळस.
गुलाबाच्या फुला पेक्षा नाजूक दिसतेय शेवंती,
***रावांनी सुखी रहावे हि परमेश्वराला विनंती
सोनेरी चोळीला चंदेरी बटन,
संजयरावांना आवडते तंदुरी चिकन.
कोऱ्या घागरीत लिंबाचा खार,
***च्या गळ्यात सोन्याचा हार.
राजा हरीशचंद्र चा रोहिदास पुत्र,
***च्या गळ्यात बांधले मंगळसूत्र.
जंगलात आहे झाडी दाट, कोकणात पिकतो भात,
***च्या संगतीत दिवस जातो आनंदात.
यमुनेच्या तटावर कृष्ण वाजवितो पावा,
***रावांचे नाव घेते तुमचा आशीर्वाद हवा.
जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
*** रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने
संसाररुपी सागरात पतिपत्नींची नौका,
***चे नाव घेते सगळेजण ऐका.
Marathi Ukhane for Female
शुभवेळी शुभ दिवशी आली आमची वरात,
***रावांचे नाव घेते, पहिले पाऊल घरात.
सर्व देवांमध्ये श्रेष्ठ ब्रह्म, विष्णू-महेश,
***रावांचे नाव घेऊन करते गृहप्रवेश.
जीवनाच्या वाटेवर पाऊल नवीन ठेवते
सगळ्यांचा मान राखून ***रावांचे नाव घेते.
सोन्याचे दागिने सोनाराने बनविले,
***रावांचे नाव घेण्यासाठी तुम्हा सर्वांनी अडविले.
चांदीच्या ताटात अगरबत्तिचा पुडा,
*** रावांच्या नावाने भरला हिरवा चुडा
काचेच्या बशीत पेरू ठेवले कापून,
***रावांचे नाव घेते सर्वांचा मान राखून.
बुर्ज खलिफा बांधायला कारागीर होते कुशल,
***रावांचे नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल.
आंब्यात आंबा हापूस आंबा,
***चे नाव घेते तुम्ही थोडं थांबा.
गळ्यातील मंगळसूत्र, मंगल सुतात डोरले,
*** रावांचे नाव माझ्या हृदयात कोरले
विठ्ठलाच्या मंदिरात संगीताची गोडी,
सुखी ठेव विठ्ठला ***ची जोडी.
मंद वाहे वारा, संथ चाले होडी,
परमेश्वर सुखी ठेवो *** ची जोडी.
मनी प्लांटचा वेल पसरला दाट,
***बरोबर बांधिली जीवनाची गाठ.
राजहंसाच्या पिलास चारा हवा मोत्याचा,
***रावांचा नाव घेते आशीर्वाद द्यावा सौभाग्याचा.
जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
***चे नाव घेते पत्नी या नात्याने.
तेलाच्या दिव्याला तुपाची वात,
***रावांचे नाव घेऊन करते संसाराला सुरवात
पंढरपूरचा विठोबा तुळजापूरची भवानी,
***रावांची आहे मी अर्धांगिनी.
मुंबईची महालक्ष्मी, कलकत्याची कालिका,
***चे नाव घेते *** ची बालिका.
हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी,
***चे नाव घेते लग्नाच्या दिवशी.
नाशिकची द्राक्षे, गोव्याचे काजू,
***चे नाव घ्यायला मी कशाला लाजू.
पाव शेर रवा, पाव शेर खवा,
***चे नाव घेते, हजार रुपये ठेवा.
मैत्री आणि नात्यात नसावा स्वार्थ,
*** मुळेच माझ्या जीवनाला अर्थ.
इंग्लिशमध्ये पाण्याला म्हणतात वॉटर,
*** रावांचे नाव घेते***ची डॉटर.
सागराला आली भरती, नदीला आला पूर,
***रावांच्या प्रेमासाठी आईवडील केले दूर.
रामाने आणले रामफळ सितेने आणले सीताफळ,
लक्ष्मणने आणले चुडे, ****नाव घेते सर्वांच्या पुढे.
संजयरावांचा आणि माझा संसार होईल सुखकर,
जेव्हा मी चीरेन भाजी आणि तो लावेल कुकर.
एक दिवा दोन वाती, एक शिंपला दोन मोती,
अशीच राहू दे माझी आणि ***रावांची प्रेम ज्योती.
श्रीकृष्णाने केले अर्जुनाच्या रथाचे सारथ्य,
***आणि माझ्या संसारात होईल तुम्हा सगळ्यांचे आदरातिथ्य.
कळी हसेल फुल उमलेल, मोहरून येईल सुगंध,
***च्या सोबतीत गवसेल जीवनाचा आनंद.
अबोलीच्या फुलांचा गंध काही कळेना,
***रावांचे नाव घ्यायला शब्द पुरेना
कलियुगात घडलाय यांच्या रूपाने चमत्कार,
***रावांचे नाव घेऊन सर्वांना करते नमस्कार.
आजच्या सोहळ्यात थाट केलाय खास,
***ला भरविते जिलेबीचा घास.
मंगळसुत्रातील दोन वाटया सासर आणि माहेर,
—— रावांनी दिला सौभाग्याचा आहेर
हिरव्या शालूला जरीचे काठ,
***चे नाव घेते सोडा माझी वाट.
सासुरवाशीन मुलीने राखावा थोऱ्यामोठ्यांचा मान,
….. रावांना कन्या केली माझ्या आईवडिलांनी दान
लग्नात लागतात हार आणि तुरे,
***च्या नाव घेण्याचा आग्रह आता पुरे.
साडीत साडी विमलची साडी,
***रावांना बाबांनी दिली Fortuner गाडी.
आम्हाला आशा कि मराठी उखाणे नवरीसाठी । Marathi Ukhane for Female ही पोस्ट तुम्हाला आवडली असेलच. या लेखा मध्ये आम्ही बायकांचे मराठी उखाणे, Ukhane in Marathi for female marriage , लग्नासाठीचे मराठी उखाणे, मराठी उखाणे नवरी साठी, Marathi Ukhane navri sathi, Ukhane Marathi , Marathi Ukhane List | Best Marathi Ukhane for girls , Females ,Smart Marathi Ukhane Female , महिलांकरिता स्मार्ट उखाणे , Marathi Ukhane For girls , नवरीसाठी भरपूर नवीन उखाणे, modern Marathi ukhane for female, चा देखील समावेश केलेला आहे. या उखाण्यांबद्दल तुमचे मत कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा.
धन्यवाद !
हे देखील वाचा HEART TOUCHING BIRTHDAY WISHES IN MARATHI FOR WIFE | BIRTHDAY WISHES FOR WIFE IN MARATHI