'आता आम्ही पण पाकिस्तानी कलाकारांना बोलवायचं का..?' पाक टीमच्या स्वागतावर 'Raees' दिग्दर्शकाचा Tweet

पाकिस्तानी संघ तब्बल ७ वर्षांनी भारतात क्रिकेट खेळण्यासाठी आल्याने यावर बरीच मतमतांतरे पाहायला मिळत आहे.

क्रिकेटर्सना परवानगी दिल्यानंतर आता पाकिस्तानी कलाकारांनाही भारतात यायची परवानगी मिळावी अशी राहुल ढोलकीया यांनी  आशा व्यक्त केली आहे

उरी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी कलाकार व खेळाडू यांच्यावर बंदी घातल्यामुळे हा विषय काही वर्षांपूर्वी चांगलाच चिघळला होता.

आता पुन्हा पाकिस्तानी क्रिकेटर्सची भारतीय मैदानावर वापसी झालेली पाहून राहुल ढोलकीया यांनी ट्वीट केलं आहे

“आता पाकिस्तानी क्रिकेटर्ससुद्धा इथे आले आहेत, तर आपण पाकिस्तानी कलाकार, गायक यांनाही पुन्हा भारतात निमंत्रण देऊ शकतो का?”

राहुल ढोलकीया चा ट्विट 

राहुल ढोलकीया यांनी २०१७ साली प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या ‘रईस’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

पाकिस्तानी कलाकारांना भारतात बंदी असल्याने या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी पाकिस्तानी माहिराला भारतात येणं शक्य झालं नव्हतं अन् यावरही त्यावेळी राहुल ढोलकीया यांनी भाष्य केलं होतं.