Marathi ukhane for male romantic, स्मार्ट मराठी उखाणे , Smart marathi ukhane Male ukhane in marathi for male

नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, ***झाली आज माझी गृहमंत्री.

जीवनरूपी सागरात सुखदुःखाच्या लाटा, सुखी संसारात सौ.*** चा अर्धा वाटा.

देवाच्या देव्हाऱ्यात फुलांना पहिला स्थान, सौ.*** ने दिला मला पतिदेवाचा मान.

गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ, सौ.*** ने दिला मला प्रेमाची साथ.

कश्मिरच्या नंदनवनात फुलांचा गंध, ***च्या संगतीत सापडला जीवनाचा आनंद,

घर असावं नेहमी क्लीन अँड नेट ***आहे माझी सिम्पल अँड बेस्ट.

कोल्हापूरला गेलो होतो आणला स्पेशल खवा *** चा सहवास मला नेहमीच हवा.

मुंबई-पुण्याच्या मध्ये आहे शहर लोणावळा *** ला विचारतो मी आती क्या खंडाळा?

बशीत बशी कप बशी, ***सोडून बाकी सगळ्या म्हशी.

उगवला सूर्य, मावळली रजनी, ***चे नाव कायम वसे माझ्या मनी.

अजून  मराठी उखाण्यांसाठी