Marathi Ukhane for Male

Marathi ukhane for male: मित्रांनो आपल्या समाजात धार्मिक कार्य होत असतात, आणि या कार्यात उखाणे घेण्याची पद्धत असतेच. तसेच लग्न हे कार्य आहे जे उखाणे घेतल्याशिवाय पूर्ण होताच नाही. म्हणूनच Ukhane in Marathi for male या पोस्टमध्ये आम्ही तुम्हा सर्वांसाठी छान  Marathi ukhane for Groom  घेऊन आलो आहोत.

लग्नातील विधी संपली आणि वरात घरी येते , तेव्हा आपले नातेवाईक आपल्याला दरवाज्यात अडवतात आणि उखाणा घेण्यास सांगतात, म्हणून लग्नाला जाताना मराठी उखाणे Marathi Ukhane लक्षात ठेवा. या पोस्टच्या मध्ये आम्ही नवरदेवासाठी मराठी उखाणे (Marathi ukhane for male romantic) सुंदर उखाणे तुम्हाला सांगणार आहोत. तर लग्नाला किव्हा सणाला जाताना या मधील तुमच्या आवडीचे उखाणे तरी नक्की पाठ करून जा.

Marathi Ukhane for Boys | Marathi Ukhane For Male

नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री,
***झाली आज माझी गृहमंत्री.

दुर्वाची जुडी वाहतो गजाननाला,
सौ. ****सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला.

जीवनरूपी सागरात सुखदुःखाच्या लाटा,
सुखी संसारात सौ.*** चा अर्धा वाटा.

चंद्राला पाहून भरती येते सागराला
***ची साथ मिळाली माझ्या जीवनाला

देवाच्या देव्हाऱ्यात फुलांना पहिला स्थान,
सौ.*** ने दिला मला पतिदेवाचा मान.

जुईच्या वेलीला आलाय बहार,
***ला घालतो २६ एप्रिल ला हार.

जाईचा वेल पसरला दाट
***बरोबर बांधली जिवनाची गाठ.

बकुळ फुलांचा सडा पडे अंगणी,
सौ*** आहे माझ्या अंगणी.


Marathi Ukhane for Boys | नवरदेवासाठी उखाणे

गुलाबाच्या झाडाला आली सुगंधी नाजुक फुले,
*** नी दिली मला दोन गोंडस मुले.

आम्रवृक्षाच्या छायेत कोकिळा करते कूजन,
सौ.*** सोबत करतो मी लक्षमीपूजन.

तडजोड हा मंत्र आहे दोन पिढ्यांना जोडणारा पूल
***ना आवडते मोगऱ्याचे फुल.

बुर्ज खलिफा बांधायला कारागीर होते कुशल
***चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.

दवबिंदूच्या थेंबाने चमकतो फुलांचा रंग
सुखी आहे संसारात सौ *** च्या संग !!!!!

समर्थांचा दासबोध आहे अनुभवाचा साठा
***चे नाव घेतो तुमचा मान मोठा !!!!!

गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ,
सौ.*** ने दिला मला प्रेमाची साथ.

दुर्वाची जुडी वाहतो गजाननाला
सौ…..सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला !!!!!

अग्नीच्या साक्षीने घेतले मी सात फेरे,
***चे व माझे जुळले जन्मोजन्मीचे फेरे.

मंदिराला खरी शोभा कळसा ने येते
***मुळे माझे गृहसौख्य खुलते.

चांदीच्या वाटीत दहीभाताचा काला,
सौ.*** चे नाव घेता पहिला आरंभ केला.

दोन जीवांचे मीलन जणु शतजन्माच्या गाठी,
***चे नाव घेतो तुमच्या आग्रहासाठी.

दोन शिंपले एक मोती, दोन वाती एक ज्योती
माझी आणि सौ…..ची अखंड राहो प्रीती !!!!!

चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा,
सौ. ***चा आणि माझा जन्मो जन्माचा जोडा.


Marathi ukhane for male romantic | Marathi ukhane Male

इंद्राची इंद्रायणी दुष्यतांची शकुंतला,
***नाव ठेवले माझ्या प्रिय पत्नीला.

कश्मिरच्या नंदनवनात फुलांचा गंध,
***च्या संगतीत सापडला जीवनाचा आनंद,

निळ्या आकाशातून पडती पावसाच्या सरी,
***चं नाव घेतो ***च्या घरी.

कौशल्या सारखी माता, रामासारखा पुत्र,
***च्या गळ्यात बांधले मी मंगळसूत्र.

मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट,
***बरोबर बांधली जीवनगाठ.

जगाला सुवास देत उमलती कळी,
***नाव घेतो***वेळी.

नवग्रह मंडळात मंगळाचा आहे वर्चस्व,
***आहे माझे जीवन सर्वस्व.

बशी मध्ये ठेवला गरम चहाचा कप
***ला म्हटलं चल नाटकाला स्टँड अप.

मुंबई-पुण्याच्या मध्ये आहे शहर लोणावळा
*** ला विचारतो मी आती क्या खंडाळा?

घर असावं नेहमी क्लीन अँड नेट
***आहे माझी सिम्पल अँड बेस्ट.

राजकारणी लोक आणतात खरेपणाचा आव
***च नाव घेतल्याशिवाय जायचं नाही मित्रांनी केला मज्जाव.

पौर्णिमेची रात्र ,मंद मंद वाहतो वारा
***चा स्वभाव मला नेहमी दिसतो बरा.

कोल्हापूरला गेलो होतो आणला स्पेशल खवा
*** चा सहवास मला नेहमीच हवा.

चंद्र आहे चांदण्यांचा सोबती,
***माझी जीवन साथी.

सकाळच्या आकाशाच्या निळसर रंग, पण,
***आहे घरकामात दंग.

मुखी असावे प्रेम हातामध्ये दया,
***वर जडली माझी माया.

ससाळ पाहिजे वाणी, स्त्री पाहिजे निर्मला.
***च्या नावाचा लागला मला जिव्हाळा.

बशीत बशी कप बशी,
***सोडून बाकी सगळ्या म्हशी.

ग्रजी भाषेत चहाला म्हणतात टी,
सौ. ***चे नाव घेण्यास लागते डबल फी.


नवरदेवासाठीचे नवीन उखाणे । Marathi Ukhane for Groom

हिमालय पर्वतात बर्फाच्या राशी,
सौ.*** चे नाव घेतो अक्षता पडल्याच्या दिवशी.

 उगवला सूर्य, मावळली रजनी,
***चे नाव कायम वसे माझ्या मनी.

 उभा होतो मळयात, नजर गेली तळ्यात,
सोन्याचा हार *** च्या गळयात.

 पार्वतीचा महादेव आणि सितेचा राम,
***आली जीवनी आता आयुष्यभर आराम.

 काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून,
****राणीचं नाव येतं फक्त हृदयातून.

 काय जादू केली, जिंकल मला एका क्षणात
पहिल्या भेटीतच भरली *** माझ्या मनात.


Marathi ukhane for male funny | नवरदेवासाठी Ukhane For Groom Marathi

स्टुलावर स्टूल बत्तीस स्टूल,
*** माझी एकदम ब्युटीफुल.

बंगलौर, मैसूर, उटी म्हणशील तिथे जाऊ,
****ला घास भरवतो बोट नको चाऊस. 

मुंबापुरीची मुंबा देवी आज मला पावली,,
श्रीखंडाचा घास देताना***मला चावली.

शेतात नांगरता नांगरता सापडली कवडी ||
****माझ्या गुडघ्या एवढी ||

श्रावण महिन्यात प्रत्येक वारी सण
***ला सुखात ठेवी हा माझा पण.

श्री शंकराच्या भेटीसाठी पार्वती येते नटून
***माझ्या संसारात आल्याने मी गेलो फुलून.

संतांचे वाङमय म्हणजे ‘सारस्वताचा सागर’
***म्हणजे प्रेमाचा आगर.

संसाराच्या सागरात पतीपत्नी नावाडी
***मुळे लागली मला संसाराची गोडी.

एक होती चिऊ, एक होता काऊ,
***ला घास भरवला तर मी काय खाऊ.

सनई आणि चौघडा वाजतो सप्त सुरात
***चे नाव घेतो ***च्या घरात.

वर्षाचे महिने बारा,
***या नावात सामवलाय आनंद सारा.

सायंकळीच्या आकाशाचा निळसर रंग
आणि *** असते घरकमात दंग.

सासूबाई आहेत प्रेमळ, मेहुणी आहे हौशी
सौ***चे नाव घेताना मला होते ख़ुशी !!!!!

पंढरपूरच्या देवळाला सोन्याचा कळस
***चे नाव घ्यायला मला नाही आळस.

सोन्याची सुपली, मोत्यांनी गुंफली
***राणी माझी घरकमात गुंतली.

हिमालय पर्वतात बर्फाच्या राशी
सौ…..चे नाव घेतो अक्षता पडल्याच्या दिवशी !!!!!

संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका
***चे नाव घेतो सर्वजण ऐका !!!!!

दोन शिंपले एक मोती, दोन वाती एक ज्योती
माझी आणि सौ***ची अखंड राहो प्रीती !!!!!


Marathi Ukhane Navardevasathi । नवरदेवासाठी मराठी उखाणे

अभिमान नाही संपत्तीचा, गर्व नाही रूपाचा,
…… ला घास घालतो वरण-भात तूपाचा.

 आंबा गोड, ऊस गोड, त्याही पेक्षा अमृत गोड
…. चे नाव आहे अमृतपेक्षा ही गोड.

 काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून
……. चं नाव येतं मात्र थेट माझ्या हृदयातून.

 कृष्णा च्या बासरीचा राधेला लागे ध्यास
….. ला देतो मी लाडवाचा घास.

 सगळ्या रुढी परंपरेत आहे विज्ञानाचे धागेदोरे,
…सह घेतले मी सप्तपदीचे फेरे.

 कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास
…… ला देतो मी श्रीखंडाचा घास.

 ग़जाननाच्या मंदिरात संगीताची गोडी
सुखी ठेवा गजानना ….. आणि माझी हि जोडी.

 गर्द आमराई त्यामध्ये पोपटांचे थवे
…. चे नाव माझ्या ओठी यावे.

 गाडीत गाडी डेक्कन क्वीन
……… आहे माझी ब्युटी क्वीन.

 आकाशात उडतोय पक्षांचा थवा
…… चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा


या पोस्ट मधील मराठी उखाणे ना केवळ फक्त लग्नासाठी नाही तर दुसऱ्या कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात कोणी तुम्हाला उखाणा घ्यायला सांगितले तर पटकन उखाणा घेऊन त्यांच्यावर तुमची छाप पडू शकता. जर का तुम्हाला हे Marathi ukhane for male funny आवडले तर तुमच्या मित्र मैत्रीण सोबत नक्की शेअर करा.

आम्हला आशा आहे कि तुम्हाला हे Marathi ukhane for male romantic, स्मार्ट मराठी उखाणे , Smart marathi ukhane Male आवडले असतील. आणि हे ukhane in marathi for male तुमच्या मित्रांसोबत सुद्धा नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना सुद्धा सुंदर सुंदर उखाणे निवडण्यास मदत होईल.

हे देखील वाचा मराठी उखाणे नवरीसाठी । MARATHI UKHANE FOR FEMALE 2023

Share and Enjoy !

Shares
Similar Posts

1 Comment

  1. […] MARATHI UKHANE FOR MALE । नवरदेवासाठी मराठी उखाणे 2023 […]

Leave a Reply