Google Pay information in Marathi

मित्रांनो, आज आपण गुगल पे म्हणजे काय? गुगल पे कसे वापरावे? Google Pay information in Marathi या संदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत.

आजच्या डिजिटल युगात सर्व काही Online झाले आहे. जसे कि Online शिक्षण, गेमिंग, लोन, पेमेंट, इन्शुरन्स असे बरेच व्यवहार आता ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. मोबाईल द्वारे ऑनलाईन पेमेंट करणे हे एकदम कॉमन झाले आहे म्हणजेच भाजीवाल्या पासून मोठमोठ्या मॉल मध्ये आता Online Payments स्वीकारले जातात. यामध्ये ऑनलाईन पेमेंट्स साठी जास्त वापरला जाणारा अँप हा गुगल पे आहे, म्हणून आपल्याला Google Pay बद्दल संपूर्ण माहिती असणे गरजेचं आहे.

गूगल पे काय आहे? (What is Google Pay in Marathi)

Google Pay हे गूगल कंपनी द्वारा डेव्हलप केलेले UPI आधारित डिजिटल पेमेंट सर्व्हिस आहे, जी आपल्याला मोबाईल द्वारे पेमेंट करण्याची सुविधा देते. गुगल पे ने केलेले व्यवहार सोप्पं आणि सुरक्षित असतात कारण ते अँप गुगल ने तयार केले आहे.

गुगल पे चा इतिहास । History Of Google Pay

Google Pay चा प्रवास साल 2011 मध्ये Google Wallet लाँच केल्यापासून सुरू झाला होतं. सुरुवातीला पीअर-टू-पीअर पेमेंटवर लक्ष केंद्रित करून, Google Wallet ने यूझर्सना त्यांचे स्मार्टफोन वापरून पैसे पाठवण्याची आणि स्वीकारण्याचे ऑप्शन दिले होते.

यानंतर 2015 मध्ये गुगल ने आपले गुगल वॉलेट ची सर्व्हिस अजून चांगली करण्यासाठी Google Wallet ला Android Pay मध्ये विलीन केलं.

साल 2018 च्या सुरुवातीला Google ने अँड्रॉइड पे ला रिब्रन्ड करण्याचे ठरवले आणि Google Pay चा जन्म झाला. या रेंब्रांडिंग नंतर Google Pay खूप वेगाने United States च्या बाहेर सर्वत्र जगभरात पसरलं.

गुगल पे कसे वापरावे (How to Use Google Pay in Marathi?)

गुगल पे आल्याने आपली बँकिंग करण्याची पद्धतच बदलून गेले आहे. गुगल पे अँप च्य मदतीने आपण आपले सर्व बँकिंग व्यवहार घरी बसल्या करू शकतो, तेही सोप्या पद्धतीने. आपल्याला रोजच्या दैनंदिनात पैश्याचे व्यवहार करायला लागतात जसे कोणाला पैसे पाठवायचे असतील किंवा कोणाकडून पैसे घेण्याचे असतील, किराणा दुकानाचा बिल पेमेंट, मोबाईल रिचार्ज असे बरेच काही व्यवहार GPay द्वारे आपण घरी बसल्या करू शकतो

गुगल पे वापरण्यासाठी प्रथमतः आपल्या कडे Google Pay अँप असणे गरजेचं आहे, हे अँप आपण Google Play स्टोर वरून डाउनलोड करू शकतो. यानंतर गुगल पे अँप वर आपले अकाउंट तयार करणे आणि मग आपले बँक खाते या अँप बरोबर जोडायचे असते. एकदा कि तुम्ही तुमचे बँक खाते, गुगल पे बरोबर जोडले कि मग तुम्ही पैश्याचे व्यवहार करू शकता.

गुगल पे वर नवीन खाते कसे ओपन करायचे? (How to Open Google Pay Account in Marathi) How do I create a G pay account?

गुगल पे वर खाते ओपन करणे खूप सोप्पं आहे. खाली दिलेल्या स्टेप्स वापरून तुम्ही गुगल पे वर खाते ओपन करू शकता:

प्रथमतः गुगल पे वर खाते उघडण्यासाठी लागणारे आवश्यक गोष्टी : बँक अकाऊंट, डेबिट ATM कार्ड, Gmail Account, बँक अकाउंट ला लिंक असलेला मोबाईल नंबर.

1 . प्रथमतः गुगल पे ॲप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून, इंस्टॉल करून घ्या आणि इन्स्टॉल झाल्यानंतर मोबाईल मध्ये गूगल पे ॲप ओपन करा.

Google Pay App Download

2. यानंतर बँक अकाऊंट ला लिंक असलेला मोबाईल नंबर add करा. आता तुमचे Gmail Account निवडून, add करून घ्या.

3. तुम्ही दिलेला मोबाईल नंबर Verify केला जाईल. त्यासाठी तुमच्या मोबाईल नम्बर वर OTP येईल, तो टाकून Verify करून घ्या.

4. गुगल पे ॲप मध्ये सुरक्षेसाठी Pin Lock चा ऑप्शन दिला जाईल, ते टाकून घ्या. हे केल्याने तुमचा गुगल पे अँप सुरक्षित राहील.

5. आता तुमचा Google Pay वर अकाउंट ओपन झाले आहे. यानंतर तुम्ही बँक अकाउंट Add करून, तुमचे व्यवहार करू शकता.

गुगल पे वरून पैसे कसे पाठवायचे?

google pay

Google Pay वरून पैसे पाठवण्याचे अनेक ऑप्शन आहेत. ते सर्व ऑप्शन्स आपण खाली दिले आहेत

1) QR Code

QR Code हि सगळ्यात सोप्पी पद्धत आहे, गुगल पे ने पैसे पाठिवण्याची. QR Code ऑप्शन मध्ये तुम्हि फक्त समोरच्या व्यक्तीचा QR कोड स्कॅन करून त्या व्यक्तीला पैसे पाठवू शकता. आपण QR कोड खूप ठिकाणी लागलेल बघितले असतील, जसे की, किराणा स्टोर, शॉपिंग सेंटर, डेअरी, क्लोथिंग सेंटर, हे QR कोड स्कॅन करून त्यांना पेमेंट करू शकता. QR Code ने पैसे पाठवण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

  1. तुमचा गुगल पे अँप्लिकेशन ओपन करा.
  2. डाव्या बाजूला मधल्या भागी तुम्हाला Scan any QR असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  3. आता तुमचा कॅमेरा ओपन होईल, तुम्हाला ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत, त्यांचा QR कोड स्कॅन करा.
  4. यानंतर तुम्हाला किती पैसे पाठवायचे आहेत तेवढे टाका, आता UPI पिन एंटर करून तुमचे पेमेंट पूर्ण करा.

2) Phone Number

गुगल पे मध्ये ज्या व्यक्तीचा नंबर तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह आहे, त्याला नंबर द्वारे पैसे पाठवण्याचा पर्याय आहे. तुम्ही डायरेक्ट नंबर टाईप करून पण त्या नम्बर वर पैसे पाठवू शकता. दोन्ही पर्यायामध्ये मोबाईल नंबर त्याच्या बँक अकाउंटशी लिंक असणे आवश्यक आहे. खालील पद्धतीने तुम्ही नंबर द्वारे पैसे पाठवा:

  1. तुमचा गुगल पे अँप्लिकेशन ओपन करा.
  2. आता तुम्हाला Pay Contacts आणि Pay Phone Number असे ऑप्शन दिसतील, यात ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत त्याचा नंबर सेव्ह असेल तर Pay Contacts वर क्लीक करा आणि नंबर सेव्ह नसेल तर Pay Phone Number वर क्लीक करा.
  3. यानंतर तुम्हाला ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचा आहे, त्याचा नंबर टाकल्यावर, त्या व्यक्तीचे नाव दिसेल, त्यावर क्लीक करा.
  4. आता Pay बटन वर क्लिक करा, तुम्हाला जेवढे पैसे पाठवायचे आहेत. ते एंटर करून तुमचा पिन नंबर टाकून पैसे ट्रान्सफर करा.

3) Bank Transfer

गुगल पे द्वारे पैसे पाठवण्याचा अजून एक पर्याय म्हणजे Bank Transfer आहे. हा पर्यायाने पैसे पाठवायचे असतील तर ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे असतील त्याचे Bank Details (बँक अकाउंट नंबर, IFSC Code, व त्या व्यक्तीचे पूर्ण नाव) तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.

  1. तुमचा गुगल पे अँप्लिकेशन ओपन करा.
  2. Bank Transfer या पर्यायावर क्लिक करा.
  3. आता तुम्हाला ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहे, त्याचे बँक डिटेल्स भरायला सांगणार, ते डिटेल्स एंटर करून, कन्फर्म करा.
  4. यानंतर हवी तेवढी Amount टाका, आणि UPI PIN एंटर करून, पैसे सेंड करा.

4) Pay to UPI ID or number

या पर्यायांमध्ये ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत, त्या व्यक्तीचा UPI ID आपल्याकडे असणे गरजेचं आहे. तुमच्याकडे जर समोरच्या व्यक्तीचा UPI Id असेल तर Pay to UPI ID or number ऑप्शन सर्वात सोप्पा पर्याय आहे.

  1. तुमचा गुगल पे अँप्लिकेशन ओपन करा.
  2. Pay to UPI ID or number वर क्लिक करा.
  3. ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत, त्या व्यक्तीचा UPI Id तेथे एंटर करा, त्यानंतर amount एंटर करून आणि पैसे सेंड करा.

हे देखील वाचा UPI ID म्हणजे काय ? WHAT IS UPI ID IN MARATHI ? UPI ID कसा तयार करायचा ?

गुगल पे वरून मोबाईल रिचार्ज कसा करावा?

गुगल पे मध्ये मोबाईल रिचार्ज करण्याचा हि पर्याय भेटतो. तुम्हाला इथे सर्व मोबाईल कंपनी रिचार्ज चे ऑप्शन भेटतात. खूपच सोप्या स्टेप्स वापरून तुम्ही गुगल पे ने मोबाईल रिचार्ज करू शकता.

  1. गुगल पे अँप ओपन करा. मग तुम्ही Mobile Recharge या ऑप्शनवर क्लिक करा.
  2. ज्या मोबाईल नंबर वर तुम्हाला रिचार्ज करायचा आहे, तो मोबाईल नंबर एंटर करून, तुम्हाला हवा असलेला रिचार्ज प्लॅन सिलेक्ट करून Pay वर क्लिक करा.
  3. आता UPI PIN एंटर करून, पेमेंट पूर्ण करून टाका.

गुगल पे मध्ये UPI Pin कसा बदलावा ? How to Change UPI Pin in Google Pay?

Google Pay मध्ये UPI पिन बदलण्यासाठी, या सोप्या पायऱ्या फॉलो करा:

  • तुमच्या स्मार्टफोनवर Google Pay अँप ओपन करा.
  • जर तुम्ही Google Pay अकाउंट मध्ये साइन इन केले नसेल तर, होम स्क्रीनवर, स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपर्यात असलेल्या तुमच्या प्रोफाइल चित्रावर वर टॅप करा. हे तुम्हाला तुमच्या अकाउंट सेटिंग्जवर घेऊन जाईल.
  • अकाउंट सेटिंग मध्ये , तुम्हाला ज्या बँक खात्यासाठी UPI पिन बदलायचा आहे ते निवडा.
  • खाली स्क्रोल करा आणि “Forgot UPI PIN” पर्यायावर टॅप करा.
  • आता सुरक्षितेसाठी तुमची आयडेंटिटी व्हेरिफाय करण्यास सांगितले जाईल, इथे काही डिटेल्स विचारले जातील, एकदा कि तुमची ओळख व्हेरिफाय झाली कि तुम्हाला set a new UPI PIN चा ऑप्शन दिसेल.
  • आता तुम्हाला हवा असलेला UPI PIN टाका आणि Confirm करून Submit करा.

अशाप्रकारे तुम्ही तुमचा UPI PIN बदलू शकता.

गुगल पे चे फायदे । Benefits of Using Google Pay

गुगल पे वापरण्याचे फायदे :

  1. इजी टू युज : तुमचा गुगल पे अँप नेहमी तुमच्या बरोबर तुमच्या मोबाईल मध्ये असतो, कधीही कुठेही इजिली पेमेंट करा.
  2. सुरक्षा : तुमचा डेटा आणि पेमेंटची माहिती एन्क्रिप्शन मेथड ने सुरक्षित केली जाते.
  3. स्पीड : तुमचे पेमेंट्स काही सेकंदात केले जातात.

Conclusion

Google Pay ने आपले ऑनलाईन पेमेंट करण्याची पद्धत बदलून टाकली आहे, गुगल पे ने आपण स्मूथ, एजी ,सेक्युर पेमेंट्स करत असतो. आम्हाला अशा आहे कि हि गूगल पे म्हणजे काय? गुगल पे कसे वापरावे? | Google Pay information in Marathi पोस्ट तुम्हाला आवडली असेल.

FAQs

गुगल पे मधील ट्रॅनजेक्शन हिस्टरी कशी डिलीट करायची? How to Delete Transaction History in Google Pay?

गुगल पे अँप ओपन करा, उजव्या कोपऱ्यातील फोटो वर क्लीक करा, Settings वर क्लिक करा, आता Privacy & Security वर क्लिक करा , यानंतर Data & Personalization वर क्लिक करा , पुढे Google accounts वर क्लीक करा , आता तुम्हाला खाली ट्रॅनजेक्शन हिस्ट्री दिसेल, या मधून तुम्ही ट्रॅनजेक्शन डिलीट करू शकता.

गुगल पे वापरण्यास काही फी आकारली जाते का ?

नाही, गूगल पे विनामूल्य वापरू शकतो.

Google Pay हेल्पलाइन नंबर काय आहे? what is Google Pay Helpline number ? what is Google Pay Customer Care number ?

Google Pay हेल्पलाइन क्रमांक 1800-419-0157 आहे.

Google Pay व्यवहार मर्यादा किती आहे? what is Google Pay Transaction Limit per day ?

भारतातील GPay वापरकर्त्यांसाठी प्रतिदिन ट्रान्सफर मर्यादा रु. 100000 आहे.

Share and Enjoy !

Shares
Similar Posts

Leave a Reply