How to Start Youtube Channel in Marathi

आजच्या पोस्टमध्ये आपण युट्युब चॅनेल कसे सुरु करायचे । How to Start Youtube Channel in Marathi हे जाणून घेणार आहोत. युट्युब जगातील सर्वात लोकप्रिय विडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे. युट्युबवर कोणीही स्वतःचा चॅनेल बनवून ,आपले विडिओ शेअर करू शकतो आणि त्या चॅनेल ने पैसे कमवू शकतो.

युट्युबवर दररोज लाखो लोकं काही ना काही कुठल्यातरी विषयांचे विडिओ सर्च करतात, या कारणामुळे युट्युब दुसऱ्या क्रमांकाचा सर्च इंजिन बनला आहे. या लेखामध्ये आपण युट्युब चॅनेल सुरु करण्यासाठी सर्व आवश्यक गोष्टींचा समावेश करणार आहोत, जेणेकरून आपण लगेच चॅनेल तयार करून त्यावर विडिओ अपलोड करून , आपला प्रेक्षक वर्ग वाढवू शकता.

तर चला आपण युट्युब चॅनेल कसे सुरु करायचे । How to Start Youtube Channel in Marathi हा जाणून घेऊया.

Table of Contents

युट्युब चॅनेल साठी विषय निवडणे ( Identify Your Youtube Channel Blog Niche )

युट्युब चॅनेल तयार करण्यासाठी सर्वात आधी चॅनेल चा विषय निवडणे महत्वाचे आहे, तुम्हाला आवडत असलेला विषय निवडा, आणि तुमच्या प्रेक्षकांना पण तो विषय आवडेल हे विश्वास ठेवा. म्हणून प्रथमतः तुमच्या YouTube चॅनेल आणि ब्लॉगचा विषय किंवा थीम निश्चित करा. तुम्ही कुठल्याही विषयावर चॅनेल बनवू शकता, जसे फूड, फॅशन, प्रवास, तंत्रज्ञान किंवा साहित्य. तुमचा चॅनेल इतरांपेक्षा कसा वेगळा असेल, असा विषय निवडा. तुमच्याकडे ज्या विषयाचे कौशल्य आहे किंवा त्याबद्दल अधिक जाणून घेण्यास इच्छुक आहात असे एक विषय निवडा.

कन्टेन्ट साठी रिसर्च आणि प्लॅन करा

नवनवीन आयड्यास साठी तुमच्या विषया रेलटेड , विद्यमान युट्युब चॅनेल्स वर एक्सप्लोर करा. मार्केटमधील गॅप्स ओळखा आणि त्याप्रमाणे युनिक कन्टेन्ट तयार करा. उच्च-गुणवत्तेची, माहितीपूर्ण आणि आकर्षक कन्टेन्ट तयार करा जी तुमच्या Target प्रेक्षकांच्या गरजा आणि आवडी पूर्ण करेल .

तुमचे YouTube चॅनल सेट करा । Set up your YouTube channel

सातत्यपूर्ण कन्टेन्ट सह एक सुव्यवस्थित YouTube चॅनेल तयार करणे , व्यवसायांना अधिक चांगल्या प्रकारे वाढविण्यात मदत करू शकते, परंतु ते योग्यरित्या करणे तितकेच महत्त्वाचे आहे. ते आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया.

तुमच्या युट्युब अकाउंट मध्ये Sign-In करा

YouTube कन्टेन्ट पाहण्यासाठी, शेअर करण्यासाठी, तयार करण्यासाठी आणि त्यावर टिप्पणी करण्यासाठी तुम्हाला Google अकाउंट असणे गरजेचे आहे. तुम्ही youtube.com वर जा आणि वरच्या उजव्या कोपर्यात “Sign-in” वर क्लिक करा. तिथून, तुम्हाला Google साइन-इन पेजवर नेले जाईल.

signin

तुमच्याकडे Google खाते असल्यास, तुम्हाला साइन इन करण्यास सूचित केले जाईल.

जर तुमच्याकडे गुगल अकाउंट नसेल, तर तुम्हाला नवीन अकाउंट बनवायला लागेल, ते बनवल्यावर त्याने तुम्ही युट्युब वर लॉगिन करू शकता.

google-sign-in

युट्युब चॅनेल तयार करा । Create Your Youtube Channel

एकदा कि तुम्ही साइन इन केलं कि, तुमच्या स्क्रिन वर उजव्या कोपऱ्यात तुम्हाला यूजर आयकॉन दिसेल, त्यावर क्लिक केलं कि ड्रॉप डाउन मेनू ओपन होईल , त्यामध्ये Setting टॅब असेल , त्याला क्लीक करा.

आता तुम्हाला अकाउंट ओव्हरविव पेजवर नेलं जाईल , तिथे Create Your Channel वर क्लिक करा.

create-new-channel

आता तुम्हाला चॅनेल चे नाव टाकण्यास सांगितले जाईल. तुम्ही ठरवल्याप्रमाणे चॅनेल चा नाव फीड करा आणि Create बटण वर क्लीक करा. चॅनेल नेम टाकल्यानंतर कदाचित तुमचा अकाउंट टेक्स्ट मेसेज किंवा व्हॉइस कॉल ने व्हेरिफाय करायला सांगण्यात येईल, जर असा झाला तर, तुम्हाला मिळालेला कोड टाकून व्हेरिफाय करा.

create-your-channel-name-youtube

एकदा कि व्हेरीफिकेशन झाला कि, तुम्हाला तुमच्या चॅनेलच्या डॅशबोर्ड पेज वर नेण्यात येईल.

इथे तुम्ही तुमच्या चॅनेल बद्दल बेसिक डिटेल्स टाकू शकता, त्यासाठी तुमच्या चॅनल डॅशबोर्डवरून, “Customize Channel” वर क्लिक करा. आता तुम्हा channel customization पेज वर नेण्यात येईल , तिथे तुम्ही Basic Info , Profile Image , Banner Image हे डिटेल्स भरू शकता.

customize-channel

आता तुमचा चॅनेल विडिओ अपलोड साठी तयार आहे.

लक्षवेधी चॅनेल आर्ट तयार करा

तुमच्या चॅनेल आर्ट आणि थम्बनेल बघितल्यावर प्रेक्षकांवर पहिली छाप पडते, म्हणून चॅनेल आर्ट आणि थम्बनेल आकर्षक असणे गरजेचे आहे. तुमच्या विडिओ चा थम्बनेल बघितल्यावर प्रेक्षक ठरवतात कि विडिओ ओपन करायचा का नाही. लक्षवेधी चॅनेल आर्ट आणि थम्बनेल तयार केल्याने, तुमच्या चॅनेल वर ट्रॅफिक वाढण्याची शक्यता वाढते.

Quality कन्टेन्ट तयार करा

स्वतःचा चॅनेल सुरु करत असताना कन्टेन्ट अतिशय महत्वाचा भाग आहे. तुमच्या चॅनेलचे यश तुमच्या Content च्या गुणवत्तेवर अवलंबून असते. तुमच्या प्रेक्षकांना महत्त्व देणारी आकर्षक आणि माहितीपूर्ण पोस्ट तयार करण्यावर लक्ष केंद्रित करा.

तुमच्या व्हिडिओंचे Quality चांगली ठेवण्यासाठी कॅमेरा, मायक्रोफोन आणि लाईट्स यासारख्या चांगल्या उपकरणांमध्ये गुंतवणूक करा. तुमचे व्हिडिओ पोस्टची आगाऊ योजना करा आणि पोस्टिंगचे सातत्य राखून ठेवा.

Playlist तयार करा

YouTube वर व्हिडिओ प्लेलिस्ट व्यवस्थापित करणे आणि तयार करणे हा आपल्या दर्शकांना आपल्या पेजवर थांबवून ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. YouTube प्लेलिस्ट केवळ तुमची संबंधित सामग्री एका व्यवस्थित आणि नीटनेटक्या सूचीमध्ये व्यवस्थापित करत नाहीत तर ते स्वयं-प्ले देखील करतात. एकदा एक व्हिडिओ संपला की, पुढचा सुरू होतो… वगैरे. हे दर्शक दुसऱ्या चॅनेलवर जाण्याची शक्यता कमी करते.

कन्टेन्ट Optimize करा

तुमच्या चॅनेल ची Visibility वाढवण्यासाठी सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO) टेक्निक चा वापर करा. सर्च रिजल्ट मध्ये उच्च रँक करण्यासाठी तुमच्या Title , Description आणि Tags मध्ये संबंधित कीवर्ड वापरा. दर्शकांना आकर्षित करण्यासाठी लक्षवेधी लघुप्रतिमा आणि आकर्षक Thumbnails तयार करा.

तुमच्या चॅनेलचा प्रचार करा

तुमची रिच वाढवण्यासाठी आणि अधिक दर्शकांना आकर्षित करण्यासाठी तुमचा कन्टेन्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करा. तुमच्या प्रेक्षकांच्या कंमेंट्स ना प्रतिसाद द्या. एकमेकांच्या चॅनेलचा क्रॉस-प्रमोट करण्यासाठी तुमच्या विषयामधील इतर YouTubers आणि ब्लॉगर्ससह सहयोग करा.

मोनेटायझेशन स्ट्रॅटेजि । Monetization Strategy

एकदा तुम्ही एक ठोस प्रेक्षकवर्ग तयार केल्यावर, तुम्ही YouTube चे पार्टनरशिप प्रोग्रॅम , ब्रँड स्पॉन्सरशिप , अफिलीयट मार्केटिंग आणि माल विक्री यासारखे कमाईचे पर्याय एक्सप्लोर करू शकता. लक्षात ठेवा की कमाईसाठी वेळ लागतो म्हणून उच्च-गुणवत्तेची कन्टेन्ट तयार करण्यावर लक्ष केंद्रित करणे हे सुरुवातीला तुमचे प्राधान्य असले पाहिजे.

कन्सिस्टन्सी । Consistency

यशस्वी YouTube चॅनेल तयार करण्यासाठी वेळ आणि मेहनत लागते. तुमच्या पोस्टिंग शेड्यूलशी कंसिस्टन्ट रहा आणि तुमची कन्टेन्ट सुधारत राहा. चिकाटीने राहा, कारण आकर्षण मिळविण्यासाठी आणि तुमचे प्रेक्षक वाढण्यास थोडा वेळ लागू शकतो.

दर्शकांना Subscribe करण्यास सांगा

जेव्हा कोणी तुमच्या चॅनेलला Subscribe करतो, जेव्हा तुम्ही एक नवीन व्हिडिओ चॅनेल वर टाकता, तेव्हा त्यांना एक नोटिफिकेशन मिळते — त्यामुळे तुमचा सदस्यसंख्या वाढवणे हा तुमची ऑरगॅनिक ट्राफिक वाढवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.

YouTube Shorts सारखे नवीन फॉरमॅट वापरून पहा

YouTube Shorts हे YouTube चे एक नवीन वैशिष्ट्य आहे: शॉर्ट-फॉर्म, व्हर्टीकली ओरिएंटेड व्हिडिओ जे 15-60 सेकंद लांब असतात. 2021 मध्ये जगभरात लॉन्च करण्यात आलेले शॉर्ट्स 6.5 अब्जाहून अधिक दैनिक व्ह्यूज मिळवून YouTube चे प्राईझ विनिंग नवीन वैशिष्ट्य बनले आहेत.

Conclusion

लक्षात ठेवा, यश एका रात्रीत मिळणार नाही. समर्पित राहा , धीर धरा ,तुमचे कौशल्ये आणि कन्टेन्ट सुधारत राहा. तुमच्या YouTube चॅनेल आणि ब्लॉगसाठी शुभेच्छा!

या How to Start Youtube Channel in Marathi पोस्ट बद्दल तुम्हाला काही अडचण असेल किंवा तुमच्या काही सूचना असतील तर नक्कीच कंमेंट करा. तसेच तुम्हाला हि पोस्ट कशी वाटली हे सुद्धा सांगा आणि शेयर करायला विसरू नका. 

धन्यवाद !

FAQs – How to Start Youtube Channel in Marathi

YouTube वर चॅनेल तयार करणे विनामूल्य आहे का? Is it Free to Create a Channel on YouTube?

होय, YouTube चॅनेल तयार करणे विनामूल्य आहे!

YouTube वर 1000 व्ह्यूजमधून तुम्हाला किती पैसे मिळतात? How much money do you get from 1000 views on YouTube?

सरासरी, YouTubers AdSense द्वारे प्रति 1,000 व्हिडिओ दृश्यांमध्ये $3 आणि $5 दरम्यान कमावतात.


यूट्यूब चैनल चालू करण्यासाठी काय करावे लागेल? What do you need for a beginner YouTube channel?

युट्युब चॅनेल चालू करण्यासाठी तुम्हाला फक्त Youtube वर अकाउंट बनवायला लागेल, एकदा कि अकाउंट तयार झाला कि तुम्ही युट्युब चॅनेल तयार करून व्हिडीओ टाकू शकता.


युट्युबर होण्यासाठी कोणत्या आवश्यकता आहेत?

YouTuber होण्यासाठी कोणतीही विशिष्ट पात्रता आवश्यक नाहि.

हे देखील वाचा : वर्डप्रेस वेबसाईट कशी बनवावी ? SEO म्हणजे काय ? WHAT IS SEO IN MARATHI ?

Share and Enjoy !

Shares
Similar Posts

3 Comments

  1. […] हे देखील वाचा : युट्युब चॅनेल कसे सुरु करायचे । HOW TO START YOU… […]

Leave a Reply