What is Google Bard in Marathi

आजच्या लेखामध्ये गुगल बार्ड म्हणजे काय? What is Google Bard in Marathi ? हे जाणून घेणार आहोत. ChatGPT ची चर्चा सुरु असताना ,अल्फाबेटची मालकी असलेल्या गुगलने एआय चॅटबॉटला टक्कर देण्यासाठी आपला स्वतःचा एआय चॅटबॉट डेव्हलप केला आहे. या चॅटबॉटचे नाव आहे Google Bard. सध्या याला यूजर्सच्या फीडबॅकसाठी प्रस्तुत करण्यात आले आहे. 

गुगल बार्ड म्हणजे काय ?

गुगल बार्ड हे गुगलने लाँच केलेले एक नवीन सर्व्हिस आहे. बार्ड ही Google ची प्रायोगिक, संभाषणात्मक, AI चॅट सर्व्हिस आहे. हे ChatGPT प्रमाणेच कार्य करण्यासाठी आहे, सर्वात मोठा फरक म्हणजे Google ची सेवा वेबवरून तिची माहिती काढेल.

दुसऱ्या एआय चॅटबॉट्सप्रमाणे, बार्ड तुमच्यासाठी कोड लिहू शकतो, गणिताच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो आणि तुम्हाला कन्टेन्ट लेखन मध्ये मदत करू शकतो.

Google Bard ची घोषणा कधी झाली?

गुगल नेहमी आपल्या युझर्सला वेगवेगळ्या सुविधा सेवा फिचर्स पुरवत असते ,आपल्या कस्टमरला आर्टिफिशियल इंटलिजन्सचा अनुभव प्राप्त करून देण्यासाठी हे फिचर लाॅच केले असल्याचे सांगितले जात आहे.

गुगल आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याद्वारे बार्डची घोषणा 6 फेब्रुवारी रोजी करण्यात आली. घोषणेच्या वेळी जरी बार्ड पूर्णपणे नवीन संकल्पना होती, लाँचच्या वेळी, AI चॅट सेवा Google च्या लँग्वेज मॉडेल फॉर डायलॉग अॅप्लिकेशन्स (LaMDA) द्वारे बनवले होती, ज्याचे दोन वर्षांपूर्वी अनावरण करण्यात आले होते.

Google Bard कसे काम करते?

Google Bard हे Google च्या स्वतःच्या आणि सर्वात प्रगत मोठ्या लँग्वेज मॉडेल (LLM) PaLM 2 द्वारे समर्थित आहे, ज्याचे अनावरण Google I/O 2023 मध्ये करण्यात आले होते.

PaLM 2, PaLM ची अधिक प्रगत आवृत्ती आहे , जी एप्रिल 2022 मध्ये रिलीझ झाली होती, हि आवृत्ती बार्डला अधिक कार्यक्षम होण्यासाठी, खूप उच्च स्तरावर कार्य करण्यास आणि मागील समस्यांचे निराकरण करण्यास मदत करते.

बार्डच्या सुरुवातीच्या व्हर्जन मध्ये LaMDA चे लाइव्हेंट मॉडेल व्हर्जन वापरली गेले होते, कारण त्यासाठी कमी कॅम्पुटिंग पावर लागत असे आणि ते अधिक वापरकर्त्यांपर्यंत पोहचू शकत होते.

LaMDA हे ट्रान्सफॉर्मर वर बनवले आहे, जे Google च्या न्यूरल नेटवर्क आर्किटेक्चरवर तयार केले गेले होते, आणि ते २०१७ मध्ये ओपन सोर्स केले गेले होते. गुगल नुसार , ChatGPT चे लँग्वेज मॉडेल GPT-3, हे सुद्धा ट्रान्सफॉर्मर वर बनवले आहे.

तुम्ही Google Bard कसे वापरू शकता ? How can you access Google Bard?

Google Bard चा वापर करण्यासाठी तुम्हाला त्यांच्या वेबसाईट वर तुमचा अकाउंट असणे गरजेचं आहे. सध्या Google Bard चा वापर करणे विनामूल्य आहे , कारण हे अजून रिसर्च स्टेज मध्ये आहे. 

प्रथमतः गुगल बार्डच्या bard.google.com ह्या आॅफिशिअल वेबसाईटवर जावे लागेल. यानंतर आपल्यासमोर गुगल बार्डचे पेज ओपन होईल.थोड स्क्रोल करून खाली आल्यावर खाली उजव्या कोपऱ्यात आपणास ट्राय बार्ड नावाचे आॅप्शन दिसुन येईल, त्याला क्लिक करा.

what is chatgpt in marathi

यानंतर पेजच्या खाली दिलेल्या प्रायव्हसी पॉलिसीला स्वीकारण्यासाठी खाली दिलेल्या आय अँग्री ह्या बटणावर ओके करायचे आहे.

यानंतर पेज ओपन होईल , त्यामध्ये बार्ड एक प्रयोग आहे , असं पॉप अप येईल. त्यावरील Continue बटण क्लिक करा.

bard is experiment

आता गुगल तुमच्या प्रश्नांची उत्तरे देयाला तयार असेल. तुम्ही Enter a prompt here मध्ये तुमचे प्रश्न लिहून एंटर करा

New Chat

बार्ड अजूनही विकसित होत आहे म्हणून ते नेहमीच परफेक्ट असू शकत नाही . हे कधीकधी चुकीचे किंवा अयोग्य प्रतिसाद देऊ शकते. तथापि, Google, Bard मध्ये सुधारणांवर काम करत आहे, तरीही बार्ड एक शक्तिशाली टूल आहे जे विविध टास्कसाठी वापरले जाऊ शकते.

गूगल बार्ड चे फायदे

Google Bard चे खूप सारे फायदे आहेत, त्यापैकी काही फायदे जाणून घेऊया.

गुगल बार्ड चा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते सध्या विनामूल्य आहे. फीडबॅक स्टेज मध्ये असल्याकारणाने तुम्ही Google Bard विनाशुल्क वापरू शकता.

बार्ड आपल्या विविध शैली मध्ये ब्लॉग पोस्ट, कविता, कोड, स्क्रिप्ट्स, ईमेल, लेटर इत्यादींसाठी मजकूर तयार करू शकतो.

बार्ड 100 हून अधिक भाषांमध्ये भाषांतर करू शकतो.

बार्ड तुमच्या प्रश्नांची उत्तरे सर्वसमावेशक आणि माहितीपूर्ण पद्धतीने देऊ शकतो.

बार्ड विविध प्रकारची क्रिएटिव्ह कन्टेन्ट लिहू शकतो.

Conclusion

आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचे Google Bard in Marathi काय आहे? ही पोस्ट आवडली असेल.

तुम्हाला सदर दिलेल्या माहिती मुळे नक्कीच फायदा होईल अशी अपेक्षा आम्ही करतो. जर तुम्हाला आमची पोस्ट आवडली असेल तर आम्हाला कंमेंट द्वारे सांगा, आणि Google Bard in Marathi पोस्ट आपल्या इतर मित्रांना देखील शेअर करा

धन्यवाद.

FAQs- Google Bard in Marathi

गुगल बार्ड मराठीत उपलब्ध आहे का? Is Google Bard available in Marathi ?

हो, गुगल बर्ड मराठीत उपलब्द आहे. गुगल ने बार्ड एआय चॅटबॉटमध्ये 40 हून अधिक भाषा जोडल्या आहेत.

गुगल बार्ड एआय लॉगिन कसे करावे ? How to do Google Bard AI Login ?

तुम्ही तुमच्या Google अकाउंट मध्ये लॉगिन करा, या नंतर गुगल बार्डच्या bard.google.com ह्या आॅफिशिअल वेबसाईटवर जावे लागेल. यानंतर आपल्यासमोर गुगल बार्डचे पेज ओपन होईल.थोड स्क्रोल करून खाली आल्यावर खाली उजव्या कोपऱ्यात आपणास ट्राय बार्ड नावाचे आॅप्शन दिसुन येईल, त्याला क्लिक करा.

हे देखील वाचा : CHATGPT म्हणजे काय ? CHATGPT कसे कार्य करते ? 

Share and Enjoy !

Shares
Similar Posts

Leave a Reply