ChatGPT in Marathi

संपूर्ण माहिती ChatGPT In Marathi– आपल्याला कधी कुठली माहिती हवी असल्यास , आपण गुगल वर जाऊन सर्च करतो. पण आता इंटरनेटवर असा तंत्रज्ञान आलं आहे , त्याला काही प्रश्न विचारलं कि त्याचे उत्तर लिहून देतो . या तंत्रज्ञानाचा नाव ChatGPT आहे. ChatGPT सध्या ईंटरनेट वर खूप जास्त सर्च केला जाणारा विषय आहे . आज आपण ChatGPT म्हणजे काय व ते कसे कार्य करते ? हे जाणून घेऊया.

ChatGPT म्हणजे काय ? What is ChatGPT In Marathi ?

ChatGPT AI

ChatGPT – चॅट जनरेटिव्ह प्रीट्रेंड ट्रान्सफॉर्मर (Chat Generative Pretrained Transformer), हे Open AI ने विकसित केलेले नैसर्गिक लँग्वेज टूल आहे , जे चॅटबॉट बरोबर तुम्हाला मानवासारखं संभाषण आणि बरेच काही करून घेतो . हे लँग्वेज टूल तुमच्या प्रश्नांचे उत्तरं देतोच , पण अजून बरेच काही जसे, ई-मेल लिहिणे, निबंध लिहिणे, कोड लिहिणे इत्यादी, अश्या बऱ्याच गोष्टी मध्ये मदत करतो.

सध्या ChatGPT संशोधन आणि फीडबॅक फेज मध्ये असल्याकारणाने , हे लोकांसाठी विनामूल्य वापरासाठी उपलब्ध आहे. हे सध्या ChatGPT फक्त इंग्रजी भाषेत वापरण्यासाठी उपलब्ध आहे. मात्र, पुढे अजून विकसित झाल्यावर इतर भाषांनाही जोडण्याची तरतूद करण्यात येईल. फेब्रुवारी २०२३ च्या सुरुवातीला ChatGPT चे पेड व्हर्जन ChatGPT Plus हे लाँच केले गेले होते.

ChatGPT कोणी बनवले ? Who Made ChatGPT ? Who is the founder of ChatGPT?

चॅट जीपीटी ला सुरु करणारे संस्थापक, सॅम ऑल्टमन आणि एलन मस्क होते , या दोघांनी २०१५ मध्ये याची सुरुवात केली. एलन मस्कने सुरुवातीच्या काळातच यातून माघार घेतली. त्यानंतर बिल गेट्सच्या मायक्रोसॉफ्टने यात गुंतवणूक केली आणि ३० नोव्हेंबर २०२२ रोजी प्रोटोटाइप म्हणून लाँच केले.

OpenAI चे प्रमुख सॅम ऑल्टमन यांनी ट्विटरवर सांगितले होते की, ChatGPT लाँच झाल्यानंतर पहिल्या पाच दिवसांत त्याचे दहा लाखांहून अधिक वापरकर्ते झाले होते. लॉन्च च्या दोन महिन्यानंतर , एका Analysis नुसार ChatGPT चे १०० लाखांहून अधिक ऍक्टिव्ह यूजर्स झाले होते.

तुम्ही ChatGPT कसे वापरू शकता ? How can you access ChatGPT?

ChatGPT Login

ChatGPT चा वापर करण्यासाठी तुम्हाला त्यांच्या वेबसाईट वर तुमचा अकाउंट असणे गरजेचं आहे. सध्या ChatGPT चा वापर करणे किंवा अकाउंट उघडणे हे विनामूल्य आहे , कारण हे अजून रिसर्च स्टेज मध्ये आहे. पण भविष्यात यासाठी फी आकारली जाऊ शकते.

chatgpt

प्रथमतः chat.OpenAi.com वर जा आणि Try ChatGPT या टॅब वर क्लीक करा, यानंतर तुम्ही ईमेल ऍड्रेस ने किंवा Google किंवा Microsoft खात्या ने खात्यासाठी नोंदणी करा. लॉग इन करण्यासाठी आणि ChatGPT मध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्हाला OpenAI वेबसाइटवर खाते असणे गरजेचं आहे.

ChatGPT account

जर तुम्ही यापूर्वी कधीही खाते तयार केले नसेल तर, साइन अप वर क्लिक करा आणि तुमची माहिती प्रविष्ट करण्यासाठी सूचनांचे अनुसरण करा. OpenAI ला खाते तयार करण्यासाठी फोन नंबर आवश्यक आहे. तुमच्या फोन नंबर Verify केल्यावरच तुमचा खाते उघडण्यात येईल.

एकदा तुम्ही साइन इन केल्यानंतर, तुम्ही ChatGPT वर चॅटिंग सुरू करू शकता. NEW CHAT बटण वर क्लीक करून , तुमचे chatting सुरू करा. ChatGPT अजूनही त्याच्या रिसर्च स्टेज मध्ये असल्याकारणाने , ते वापरण्यासाठी विनामूल्य आहे आणि तुम्ही इथे, तुम्हाला हवे तितके प्रश्न विचारू शकता.

New Chat ChatGPT

ChatGPT कसे कार्य करते? How does ChatGPT work?

OpenAI ने विकसित केलेल्या लँग्वेज टूल म्हणजेच GPT (Generative Pretrained Transformer), या द्वारे ChatGPT काम करतो. OpenAI नुसार, ChatGPT मध्ये जो विशिष्ट GPT वापरलेला आहे , तो GPT-3.5 सिरीज मधला आहे.

चॅट जीपीटी हा एक आर्टिफिसिअल बुद्धिमत्ता बॉट आहे जो तुम्ही विचारलेली प्रश्नांची उत्तरे विविध स्रोतांमधून शोधून तुमच्या पर्यंत आणून देतो. ChatGPT विचारलेली प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी रिइन्फोर्समेंट लर्निंग फ्रॉम ह्युमन फीडबॅक (RLHF) चा वापर करतो. हेच ChatGPT ला युनिक बनवते.

ChatGPT मध्ये जो जनरेटिव्ह एआय(AI ) मॉडेल वापरलेला आहे, त्या जनरेटिव्ह एआय मॉडेल्सना वेबसाईट, पुस्तके, वृत्त लेख आणि बरेच काही यासह इंटरनेटवरील मोठ्या प्रमाणात माहितीवर प्रशिक्षण दिले आहे , या माहितीद्वारे ChatGPT , आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लगेच लिहून देतो.

Chat GPT चे फायदे |What are the Benefits Of ChatGPT In Marathi

ChatGPT चे खूप सारे फायदे आहेत, त्यापैकी काही फायदे जाणून घेऊया.

ChatGPT चा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते सध्या विनामूल्य आहे. फीडबॅक स्टेज मध्ये असल्याकारणाने तुम्ही ChatGPT विनाशुल्क वापरू शकता.

तुम्ही चॅट GPT ला काही हि विचारू शकता, तो त्याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती लिहून देईल.

या ChatGPT द्वारे तुम्हाला गणित , निबंध, रेझ्युमे, यूट्यूब व्हिडिओ स्क्रिप्ट, कव्हर लेटर, बायोग्राफी, अँप कोड ,ब्लॉग कन्टेन्ट , या रिलेटेड कोणत्याही प्रकारचे प्रश्नांचे उत्तर तुम्हाला काही क्षणात उपलब्ध करून देईल.

आपल्याला इंटरनेट वरून काही माहिती हवी असल्यास , सर्च इंजिन आपल्या त्याला माहिती रेलटेड वेब पेजेस उपलब्द करू देतात, पण ChatGPT आपल्याला त्या विषयाबद्दल संपूर्ण माहिती उपलब्द करून देतो.

ChatGPT हे ग्राहक सेवेसाठी गेम चेंजर आहे. हे त्वरित प्रतिसाद आणि समर्थन प्रदान करून, ग्राहकांच्या प्रश्नांची विस्तृत श्रेणी हाताळू शकते.

ChatGPT च्या मर्यादा काय आहेत? । What are ChatGPT’s limitations?

आता आपण चॅट जीपीटीचे लिमिटेशन काय आहेत याचीही माहिती घेऊ या.

ChatGPT तुम्ही विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर फक्त English मध्येच देतो. पण भविष्यात दुसऱ्या भाषा उपलब्द होऊ शकतात.

चॅट GPT आपल्या कुठलीही माहिती देण्यासाठी इंटरनेट चा वापर नाही करू शकत, ChatGPT फक्त तीच माहिती देतो , जी त्याला डेटा प्रशिक्षणाद्वारे दिलेली असते.

अजून एक मोठा लिमिटेशन असं आहे कि ChatGPT आपल्याला माहिती फक्त साल २०२१ पर्यंतची देतो, कारण त्याला डेटा प्रशिक्षण फक्त साल २०२१ पर्यंत दिलाय. तुम्ही जर त्याला २०२२ साल चे प्रश्न विचारले तर तो नाही देऊ शकत .

ChatGPT चे उपयोग । Use of ChatGPT in Marathi

ग्राहक सेवा । Customer Support

ChatGPT चा एक प्राथमिक वापर ग्राहक समर्थनामध्ये आहे. हे ग्राहकांच्या प्रश्नांची विस्तृत श्रेणी हाताळू शकते, त्वरित निराकरणे प्रदान करते आणि समस्यांचे प्रभावीपणे निराकरण करते.

वर्चुअल असिस्टंट

ChatGPT ला वर्चुअल असिस्टंट म्हणून नियुक्त केले जाऊ शकते, वापरकर्त्यांना भेटींचे वेळापत्रक, रिमाइंडर्स सेट करणे आणि प्रश्नांची उत्तरे देणे यासारख्या विविध कामांमध्ये मदत करते.

कन्टेन्ट निर्मिती

ChatGPT कल्पना निर्माण करून, सुधारणा सुचवून आणि लेख किंवा ब्लॉग पोस्टचे मसुदे लिहून सामग्री निर्मात्यांना मदत करू शकते.

भाषा अनुवाद

ChatGpt ला सध्या ५० पेक्षा जास्त भाषेमध्ये प्रशिक्षण दिले आहे, तर या भाषांमध्ये ते कुठल्याही भाषेमध्ये अनुवाद करून देऊ शकतो. या सर्व भाषांमधील मजकूर समजून घेण्याच्या आणि निर्माण करण्याच्या प्रवीणतेसह, ChatGPT हे लँग्वेज ट्रान्सलेशन टूल म्हणून वापरले जाऊ शकते.

ChatGPT म्हणजे काय ? ChatGPT कसे कार्य करते ?

Conclusion

आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचे ChatGPT काय आहे? आणि ते कसे कार्य करते? ही पोस्ट आवडली असेल.

तुम्हाला सदर दिलेल्या माहिती मुळे नक्कीच फायदा होईल अशी अपेक्षा आम्ही करतो. जर तुम्हाला आमची पोस्ट आवडली असेल तर आम्हाला कंमेंट द्वारे सांगा, आणि ChatGPT पोस्ट आपल्या इतर मित्रांना देखील शेअर करा.

धन्यवाद.

FAQs

Chat GPT चा फुल फॉर्म काय आहे ?

चॅट जनरेटिव्ह प्रीट्रेंड ट्रान्सफॉर्मर (Chat Generative Pretrained Transformer)

ChatGPT चे प्रतिसाद कितपत अचूक असतात ?

ज्या गोष्टींमध्ये ChatGPT ला प्रशिक्षण दिले आहे , त्या गोष्टींचे ते अचूक उत्तरे देतो. जरी ते अनेक प्रकरणांमध्ये अचूक प्रतिसाद देऊ शकते, ते कधीकधी चुकीची किंवा निरर्थक उत्तरे देऊ शकते.

ChatGPT एकाधिक भाषा समजू शकते?

होय, ChatGPT ला ५० पेक्षा जास्त भाषांमध्ये प्रशिक्षित केले गेले आहे, म्हणून ते विविध भाषांमधील मजकूर समजून ,तयार करू शकते.

ChatGPT व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध आहे का?

होय, OpenAI व्यावसायिक वापरासाठी ChatGPT अनुमती देते, व्यवसायांना ते त्यांच्या ऍप्लिकेशन्स किंवा प्लॅटफॉर्ममध्ये वापर करू देते.

Chat GPT ची अधिकृत वेबसाइट कुठली आहे?

Chat GPT ची अधिकृत वेबसाइट www.chat.openai.com आहे

Chat GPT कधी लाँच करण्यात आले?

चॅट GPT 30 नोव्हेंबर 2022 रोजी लाँच करण्यात आले.

ChatGPT कोणी तयार केले?

सॅम ऑल्टमन आणि इलॉन मस्क या दोघांनी 2015 मध्ये OpenAI ही स्वतंत्र संशोधन संस्था स्थापन केली, ज्याचा एक भाग चॅट GPT होते.

हे देखील वाचा : सर्वोत्तम एसइओ टिप्स | BEST SEO TIPS FOR BLOGGERS IN MARATHI

Share and Enjoy !

Shares
Similar Posts

5 Comments

  1. […] काय? What is Google Bard in Marathi ? हे जाणून घेणार आहोत. ChatGPT ची चर्चा सुरु असताना ,अल्फाबेटची […]

  2. […] हे देखील वाचा : CHATGPT म्हणजे काय ? CHATGPT कसे कार्य करते ?  […]

  3. […] ChatGPT, एक OpenAI सॉफ्टवेअर ज्याने अलिकडच्या […]

Leave a Reply