Money Transfer Apps

Money Transfer Apps in India : आताच्या काळात आपल्याकडे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी अँप्स आहे, पण काही वर्षांअगोदर पैसे ट्रान्सफर करणे खूप कठीण आणि वेळखाऊ प्रक्रिया होती, तासंतास बँकेच्या रांगेत राहून, कितीतरी फॉर्म भरायला लागायचे.

आता हे सर्व बदलले आहे, टेक्नॉलॉजी आणि इंटरनेट च्या साह्याने आपल्याला फोन द्वारे पैसे ट्रान्सफर करण्याचे जलद आणि सुरक्षित ऑप्शन्स निर्माण झाले आहेत.

या लेखा मध्ये तुमच्यासाठी घेऊन आलोय Top 10 Money Transfer Apps in India, ज्यांच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या मित्रांना, फॅमिली मेंबर्स, नातेवाईकांना किंवा ग्राहकांना सोप्या पद्धतीने पैसे ट्रान्सफर करू शकता.

Top 10 Money Transfer Apps in India

1. Bhim App

Money Transfer Apps - bhim

भारतीयांसाठी भारतातील कोणत्याही ठिकाणाहून पैसे हस्तांतरित करण्यासाठी हे, एक अतिशय चांगले ॲप आहे. शिवाय, BHIM ॲप वापरून तुम्ही तुमच्या मोबाईल फोनद्वारे जलद, सुरक्षित, विश्वासार्ह मनी ट्रान्सफर करू शकता.

BHIM अँप साठी लागणाऱ्या गोष्टी :

  • तुमच्या फोन मध्ये तुमच्या बँक खात्याशी लिंक असलेला सक्रिय सिम कार्ड असलं पाहिजे.
  • जर तुमचा फोन ड्युअल सिम असेल तर बँक बरोबर लिंक असलेला सिम निवडलेला असला पाहिजे.
  • व्यवहार मर्यादा रु. 20,000 प्रति व्यवहार आणि रु. 40,000 प्रतिदिन (1 बँक खात्यासाठी).

Play Store Ratings: 4.6

2. Google Pay

Money Transfer Apps - gpay

Google Pay हे मनी ट्रान्सफर ॲप्स श्रेणीतील सर्वात लोकप्रिय ॲप्सपैकी एक आहे. हे ॲप वापरून तुम्ही जवळपास सर्व बँक मनी ट्रान्सफर करू शकता. हे अँप तुम्ही केलेल्या प्रत्येक व्यवहारावर रिवॉर्ड्स देखील देते.

तुमच्या बँक खात्यातून थेट पैसे भरू आणि मिळवु शकता. वॉलेट मध्ये पैसे टाकण्याची गरज नाही आणि तुम्हाला अतिरिक्त KYC करण्याचीही गरज नाही.

कोणाचाही UPI आयडी किंवा बँक डिटेल्स प्रविष्ट करून, तुम्ही पैसे पाठवू शकता.

गुगल पे वापरून तुम्ही वीज, गॅस, पाणी, डीटीएच, मोबाईल आणि इतर अनेक गोष्टींची बिले सहज भरू शकता.

हे अँप जागतिक दर्जाच्या सुरक्षा प्रणालीसह तुमच्या पैशाचे संरक्षण करते आणि तुम्ही डिव्हाइस लॉक पद्धतीने तुमचे खाते सुरक्षित ठेऊ शकता.

ॲपमध्ये स्क्रॅच कार्ड मिळतो आणि प्रत्येक पात्र व्यवहारा वर ₹1,000 पर्यंत जिंकण्याची संधी मिळते. तसेच, तुमचे रिवॉर्ड्स थेट तुमच्या बँक खात्यात जमा केले जातात.

टीशॉप, रेस्टॉरंट, जनरल स्टोअर आणि तुमचे सलून देखील आता Google Pay वरून जागेवरच पेमेंट स्वीकारू शकतात.

Google Pay अँप साठी लागणाऱ्या गोष्टी :

  • भारतीय बँक खात्याबरोबर लिंक केलेला मोबाईल नंबर असणे गरजेचं आहे.
  • व्यवहार मर्यादा रु. 50,000 प्रति व्यवहार आणि रु. 1,00,000 प्रतिदिन.

3. Paytm

Money Transfer Apps - paytm

Paytm ग्राहकांसाठी आणि व्यापारासाठी खूप साऱ्या पेमेंट सर्व्हिसेस ऑफर करते. Paytm हा भारतामध्ये सर्वात जास्त वापरला जाणारा वॉल्लेट आणि पेमेंट अँप आहे.

तुम्ही हे ॲप मोबाइल रिचार्ज, पोस्टपेड आणि युटिलिटी बिल पेमेंट, UPI पेमेंट आणि मनी ट्रान्सफर, ऑनलाइन शॉपिंग, मूव्ही तिकीट, एलआयसी प्रीमियम पेमेंट, बिल पेमेंट, डीटीएच रिचार्ज, बस आणि फ्लाइट बुकिंग, ट्रेन तिकीट बुकिंग, मेट्रो कार्ड रिचार्ज, यासाठी वापरू शकता.

मोबाईल रिचार्जवर कॅशबॅक मिळतो.

IRCTC तिकीट बुकिंगवर कोणतेही सेवा शुल्क लागत नाही.

बस आणि फ्लाईट टिकेट्स चांगल्या रेट्स ने खरेदी करता येतात.

Paytm अँप साठी लागणाऱ्या गोष्टी :

  • तुम्हाला तुमचे बँक खाते लिंक करावे लागेल किंवा पेटीएम पेमेंट्स बँकेत बचत खाते उघडावे लागेल.
  • UPI शी लिंक करा किंवा वॉलेटमध्ये पैसे ऍड करा आणि पेमेंटसाठी जवळपासच्या स्टोअरमध्ये QR कोड स्कॅन करा.

4. PhonePe

Money Transfer Apps - PhonePe

PhonePe हे भारतात मोबाईल पेमेंट करण्यासाठी वारंवार वापरले जाणारे ॲप आहे. UPI पेमेंटपासून ते रिचार्ज, पैसे ट्रान्सफर ते ऑनलाइन बिल पेमेंटपर्यंत, तुम्ही हे सर्व PhonePe ॲप वापरून करू शकता.

हे ॲप NPCI द्वारे विकसित केलेल्या UPI प्लॅटफॉर्मवर कार्य करते आणि येस बँकेद्वारे समर्थित आहे.

तुम्ही कुठूनही पैसे पाठवू शकता आणि तुमच्या कॉन्टॅक्टस कडून पैशांची विनंती करू शकता.

इतर ॲप्सप्रमाणे या ॲपमध्येही तुम्ही प्रीपेड मोबाइल रिचार्ज, पोस्टपेड मोबाईल बिल, लाईट बिल, गॅस बिल भरू शकता.

तुम्ही या अँप मधून रु. 1 लाख पर्यंत व्यवहार करू शकता, 24*7.

5. PayZapp HDFC

Money Transfer Apps - payzapp

PayZapp हे एचडीएफसी बँक, आघाडीच्या खाजगी क्षेत्रातील बँकेचे सर्वोत्तम मनी ट्रान्सफर ॲप आहे. इतर ॲप्सप्रमाणे, यात रिचार्ज, ऑनलाइन बिल पेमेंट, भारतक्यूआर पेमेंट्स, प्रवास, खरेदी, चित्रपट आणि बरेच काही फक्त एका क्लिकवर करण्याची सुविधा आहे.

हे ॲप सोयीस्कर, जलद आणि सुरक्षित आहे. तुमचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड एकदा लिंक करा आणि पैसे पे करत जा.

PayZapp वापरून तुम्ही तुमचा मोबाईल, DTH आणि डेटा कार्डचे रिचार्ज करू शकता, तुमची युटिलिटी बिले भरू शकता, फ्लाइट तिकीट, बस आणि हॉटेल्स बुक करू शकता, खरेदी करू शकता, चित्रपटाची तिकिटे, संगीत आणि किराणा सामान खरेदी करू शकता, स्मार्ट बाय वर उत्तम ऑफर मिळवू शकता आणि तुम्ही तुमच्या फोन बुकमध्ये कोणालाही पैसे ट्रान्सफर करू शकता.

यामध्ये प्रत्येक व्यवहारासाठी तीन सेक्युरिटी तपासण्या केल्या जातात.

6. Jio Money

Money Transfer Apps - jio money

जिओ मनी हे तुमच्या मोबाईल ॲपद्वारे सोप्या मार्गाने पैसे ट्रान्सफर करणारे ॲप आहे. हे कॅशबॅक देखील प्रदान करते; Jio मनी ॲपवरून ऑनलाइन खरेदी करताना वापरकर्त्यांसाठी डिस्काउंट ऑफर. तसेच, या ॲपचा वापर करून तुम्ही कोणत्याही दुकानात सहजपणे खरेदी करू शकता, बिल भरू शकता, रिचार्ज करू शकता, तिकीट बुकिंग करू शकता आणि बरेच काही करू शकता.

तुम्ही Jio रिचार्ज करू शकता आणि तुमच्या Jio पेमेंटवर सर्वोत्तम ऑफर मिळवू शकता.

तुम्ही महाडिस्कॉम, महानगर गॅस, रिलायन्स लँडलाइन, एअरटेल, टाटा स्काय आणि इतर अनेक बिलर्सचे सुरक्षित बिल पेमेंट देखील करू शकता.

JioMoney च्या भागीदार ब्रँडकडून विशेष सूट आणि कूपनचा फायदा घ्या.

Amazon, Flipkart, AJIO, ABOF, Jabong आणि बरेच काही यांसारख्या तुमच्या आवडत्या शॉपिंग डेस्टिनेशनवर अतिरिक्त कॅशबॅक मिळवा.

सिद्धी विनायक ट्रस्ट सारख्या धर्मादाय ट्रस्टना थेट पैसे देण्याचे वैशिष्ट्य या अँप मध्ये आहे.

JioMoney वापरून, तुम्ही कोणत्याही रिलायन्स रिटेल आउटलेटवर पैसे भरण्याच्या सुविधेचा आनंद घेऊ शकता.

7. Yono SBI

Money Transfer Apps - yono sbi

Yono देखील भारतातील सर्वोत्तम मनी ट्रान्सफर ॲपच्या या श्रेणीमध्ये आहे. या ॲपची चांगली गोष्ट म्हणजे, हे ॲप भारतातील आघाडीची सार्वजनिक क्षेत्रातील बँक SBI ने विकसित केले आहे.

SBI ही भारतातील सर्वात सुरक्षित आणि विश्वासार्ह बँक आहे. हे ॲप वापरण्यासाठी मूलभूत गरजांपैकी एक म्हणजे भारतातील SBI बँक शाखेत तुमचे खाते असणे.

फ्लाइट आणि बस तिकीट बुकिंग, IRCTC द्वारे रेल्वे तिकीट बुकिंग, खाद्यपदार्थ वितरण आणि बरेच काही ऑफर करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या SBI ग्राहकांसाठी विशेष सवलती आणि ऑफर असतात.

तुम्ही तुमचं बॅलेन्स तपासू शकता, मुदत ठेव तयार करू शकता आणि लाभार्थी देखील जोडू शकता.

लिंक करून तुम्ही क्रेडिट कार्ड, लाइफ इन्शुरन्स, एसआयपी, म्युच्युअल फंड यांसारख्या सर्व स्टेट बँक संस्थांशी असलेले तुमचे संबंध एकाच ॲपमध्ये पाहू शकता.

8. Mobikwik

Money Transfer Apps - mobikwik

Mobikwik हा भारतातील प्रसिद्ध मनी ट्रान्सफर अँप आहे. Mobikwik मध्ये तुम्ही UPI वॉल्लेट किंवा Zip Pay Later या ऑप्शन द्वारे पेमेंट करू शकता.

तुम्ही या अँप द्वारे मोबाईल रिचार्ज, लाईट बिल, क्रेडिट कार्ड बिल, रेंट, Loan EMI, गॅस बुकिंग, LIC प्रीमियम पेमेंट करू शकता.

Mobikwik मध्ये Zip Pay Later ऑप्शन भेटतो, ज्यामध्ये तुम्हाला काही रक्कम दिली जाते, ज्याद्वारे तुम्ही बिल पेमेंट करू शकता आणि नंतर तुम्ही ते पैसे Mobikwik ला परत करू शकता.

9. FreeCharge

Money Transfer Apps - freecharge

Freecharge ॲपमध्ये भारतात कुठेही पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा आहे.

फ्रीचार्ज वापरून वापरकर्ता मोबाईल, गॅस, वीज, लँडलाइन, ब्रॉडबँड बिल, रिचार्ज, धर्मादाय देणगी, म्युच्युअल फंडात गुंतवणूक, तुमच्या आवडत्या ब्रँडमधून खरेदी करू शकतो आणि चित्रपट, मनोरंजन, खाद्यपदार्थ, खरेदी, प्रवास यासारख्या श्रेणींमध्ये फ्रीचार्जसह पेमेंट करू शकतो.

तसेच, फ्रीचार्ज वापरून तुम्ही टॅक्स सेविंग म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकता.

10. Airtel Thanks

Money Transfer Apps - airtel

Airtel Thanks हे एक सुलभ मनी ट्रान्सफर ॲप आहे जे तुम्हाला कुठूनही आणि कधीही पेमेंट करण्यास सक्षम बनवते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, UPI ला तिच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर समाकलित करणारी ही भारतातील पहिली पेमेंट बँक आहे, Airtel Thanks आपल्या मोबाइल प्लॅटफॉर्मवर दोन बँक खात्यांमध्ये त्वरित निधी हस्तांतरणाची सुविधा देऊ शकते.

एअरटेल थँक्स ॲप वापरून तुम्ही अप्रतिम रिवॉर्ड्स आणि रिचार्ज ऑफरचा आनंद घेऊ शकता. तसेच, तुम्हाला Airtel ऑनलाइन रिचार्ज जसे की, DTH रिचार्ज, इझी ऑनलाइन मोबाइल प्रीपेड रिचार्ज, पोस्टपेड बिल पेमेंट, Airtel UPI, BHIM, आणि बरेच काही फायदे मिळतात.

एअरटेल मनी वॉलेट तयार करून तुम्हाला पहिल्या व्यवहारावर त्वरित कॅशबॅकची हमी मिळते.

तुम्ही तुमचे इन्शुरन्स प्रीमियम आणि कर्ज EMI सहज भरू शकता.

Aitel Thanks सह बचत बँक खाते उघडल्यावर तुम्हाला ₹1 लाखांचा मोफत वैयक्तिक अपघात विमा मिळतो.

बिल, युटिलिटी आणि रिचार्जवर त्वरित कॅशबॅक मिळतो.

तुम्ही IRCTC, OYO रूम, OLA कॅब, आणि ट्रेनची तिकिटे बुक करू शकता आणि बँक किंवा वॉलेट बॅलन्सद्वारे पेमेंट करू शकता.

Conclusion – Money Transfer Apps in India

या लेखा मध्ये आम्ही तुम्हाला Top 10 Money Transfer Apps in India बद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. हे वापरून तुम्ही पैसे पाठवणे, पैसे रिसिव्ह करणे, मोबाईल रिचार्ज करणे, तिकीट बुक करणे, लाईट बिल भरणे इ. असे खूप साऱ्या सुविधांचा फायदा घेऊ शकता.

आम्हाला आशा आहे कि Top 10 Money Transfer Apps in India हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल.

हे देखील वाचा डिजिटल मार्केटिंग संपूर्ण माहिती । DIGITAL MARKETING INFORMATION IN MARATHI

Share and Enjoy !

Shares
Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *