Best Wordpress blog themes

आपण आपल्या वेबसाइटसाठी एक विनामूल्य वर्डप्रेस ब्लॉग थीम शोधत आहात?

वेबसाइटवर वर्डप्रेस स्थापित केल्यानंतर, आपल्याला सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट लागते ती ब्लॉगची थीम. वर्डप्रेससाठी हजारो विनामूल्य ब्लॉग थीम आहेत, या हजारो भिन्न पर्यायांमधून थीम निवडणे कठिण असते. या लेखात ,आम्ही सर्वोत्कृष्ट १० WordPress Blog Themes निवडल्या आहेत,ज्या तुम्ही वर्डप्रेस वेबसाईट वर वापरू शकता.

अनुक्रमणिका

1.  Astra

2.  OceanWP

3.  Neve

4.  Poseidon

5.  Hestia

6.  Olsen Light

7.  Bento

8.  Fascinate

9.  Admiral

10. The Columnist

  1. Astra

अस्ट्रा ही एक सर्वात वेगवान,अत्यंत सानुकूल आणि विनामूल्य वर्डप्रेस ब्लॉग थीम आहे. तुम्ही अस्ट्रा थीम वापरून वैयक्तिक ब्लॉग,व्यवसाय ब्लॉग्ज आणि अगदी ईकॉमर्स वेबसाइट बनवू शकता. SEO लक्षात घेऊन तयार केलेले, Astra हे Schema.org कोड इंटिग्रेटेडसह येते, त्यामुळे सर्च इंजिनांना तुमची साइट आवडेल.

अस्ट्रा थीम मध्ये वू कॉमर्स साठी बिल्ट इन सपोर्ट असल्या कारणाने ,तुम्ही सहज ऑनलाईन स्टोर आपल्या वेबसाईट वर बनवू शकता.

2. OceanWP

OceanWP ही एक लोकप्रिय फ्री वर्डप्रेस थीम आहे. या थीम मध्ये खूप फीचर्स आहेत जे आपण केवळ प्रीमियम थीममध्ये पाहतो. ओशियनWP थीम ने तुम्ही कुठल्याही प्रकाराची वेबसाईट बनवू शकता,जसे ब्लॉग,मॅगझीन,इ-कॉमर्स, बिजिनेस वेबसाईट. OceanWP हि अतिशय वेगवान, प्रतिसादात्मक, सर्वोत्तम SEO पद्धती, अद्वितीय WooCommerce आणि बरेच वैशिष्ट्ये असलेली थीम आहे.

या थीम मध्ये अनेक प्रकारचे लेआऊट आहेत , जे तुम्ही फ्री मध्ये वापरू शकता.

3. Neve

नेवे थिम हि एक फ्री वर्डप्रेस ब्लॉग थिम आहे. या थिम चा वापर करून तुम्ही चांगली बिझिनेस आणि इ-कॉमर्स वेबसाईट सुद्धा बनवू शकता. नेवे थिम मध्ये तुम्ही विविध प्रकारचे पेज बिल्डर वापरू शकता, जसे Elementor पेज बिल्डर , Divi पेज बिल्डर आणि Beaver बिल्डर. Neve ही अतिशय जलद, सहज सानुकूल करण्यायोग्य, बहुउद्देशीय थीम आहे. हि ब्लॉग, छोटे व्यवसाय, स्टार्टअप्स, एजन्सी, फर्म, ई-कॉमर्स शॉप्स (WooCommerce स्टोअरफ्रंट) तसेच वैयक्तिक पोर्टफोलिओ साइट्स आणि बरेच प्रकारच्या प्रकल्पांसाठी वापरू शकता आहे.

जर तुम्हाला थीम चे प्रीमियम फीचर्स वापरायचे असतील तर , ते तुम्हाला फक्त $३९ ते $९९ वार्षिक च्या रेंज मध्ये भेटू शकतात.

4. Poseidon

पोसेडॉन एक उत्कृष्ट डिझाइन केलेली वर्डप्रेस थीम आहे ज्या मध्ये तुम्हाला प्रशस्त लेआउट, पूर्ण रूंदीचा स्लायडर आणि विविध पेज टेम्प्लेट्स भेटतात.

आपण हि थीम ब्लॉग म्हणून वापरू शकता किंवा विजेट-आधारित मॅगझिन होम पेज टेम्पलेट वापरून सहजपणे एक न्यूज वेबसाइट तयार करू शकता.

5. Hestia

हेस्टिया ही एक फ्लेक्सिबल आणि रिस्पोन्सिव्ह थीम आहे, जी तुम्ही सर्व प्रकारच्या वेबसाइट्ससाठी वापरू शकता. ह्या थीम सोबत कंपॅनिअन प्लगइन भेटते, ज्याच्यामध्ये तुम्हाला टेस्टमोनिअल आणि सर्विस सेकशन ऍड केलेले भेटतात.

हि थीम क्रिएटिव्ह व्यवसाय, छोटे व्यवसाय (रेस्टॉरंट्स, वेडिंग प्लॅनर, स्पोर्ट/वैद्यकीय दुकाने), स्टार्टअप्स, कॉर्पोरेट व्यवसाय, ऑनलाइन एजन्सी आणि फर्म्स, पोर्टफोलिओ, ईकॉमर्स (WooCommerce) आणि फ्रीलान्सर वेबसाईट साठी उपयुक्त आहे .

6. Olsen Light

Olsen Light एक क्लीन आणि मोहक वर्डप्रेस ब्लॉग थीम आहे जी लाइफस्टाइल, फूड, फॅशन, प्रवास, हेल्थ आणि फिटनेस, फोटोग्राफी आणि ब्युटी ब्लॉगिंगसाठी परिपूर्ण आहे. नेवे थिम विविध प्रकारचे पेज बिल्डर वापरू शकता, जसे Elementor पेज बिल्डर, Divi पेज बिल्डर, Beaver बिल्डर, आणि Brizi बिल्डर सोबत सुसंगत आहे.

या थीम ची रिस्पोन्सिव्ह डिजाईन , तुमच्या व्हिसिटर्स ना बेस्ट मोबाईल ब्रावजींग एक्सपेरियन्स देते. हि थीम सिंगल आणि दोन कॉलम ब्लॉग लेआउट्स, कस्टमाइज्ड लोगो, होमपेज स्लाइडर, सोशल आयकॉन आणि सोशल शेअर , फुटर Instagram कॅरोसेल, कस्टमाइज्ड विजेट्स आणि बरेच काही सपोर्ट करते.

7. Bento

Bento एक प्रभावी,यूजर फ्रेंडली मोफत वर्डप्रेस थीम आहे. या थीम मध्ये तुम्हाला लाखो फीचर्स भेटतात,जे वापरून तुम्ही सुंदर वेबसाईट बनवू शकता. बेंटो मोबाइल-फ्रेंडली (रिस्पोन्सिव्ह), स्पीड ऑप्टिमाइज्ड आहे आणि SEO (शोध इंजिन ऑप्टिमायझेशन) सर्वोत्तम पद्धती लागू करते.

8. Fascinate

Fascinate एक गोंडस,मॉडर्न,सुंदर डिझाइन केलेले, गुटेनबर्ग कॅम्पॅटिबल वर्डप्रेस ब्लॉग थीम आहे. फॅसिनेट थीम हि खासकरून प्रोफेशनल लेखक , फ्रीलान्सर , लाइफस्टाइल ब्लॉगर साठी डिसाईन केली आहे .

फॅसिनेट ब्लॉग ही एक आदर्श आणि संपूर्ण वर्डप्रेस ब्लॉग थीम आहे जी वैयक्तिक किंवा व्यावसायिक ब्लॉगिंग वेबसाइट तयार करण्यासाठी आपले अनुभव, कथा प्रदर्शित करण्यासाठी किंवा फॅशन, प्रवास, जीवनशैली, गॉरमेट, व्यवसाय आणि अशा विविध नीच वर लिहिण्यासाठी आहे. Fascinate 100% मीडिया रिस्पॉन्सिव्ह आहे, याचा अर्थ असा आहे की Fascinate Blog डेस्कटॉप, टॅब्लेटपासून स्मार्टफोनपर्यंत सर्व उपकरणांसाठी सुसंगत आहे.

9. Admiral

अ‍ॅडमिरल एक सुंदर आणि स्टाइलिश मॅगझिन वर्डप्रेस थीम आहे ज्यात दोन रिस्पोन्सिव्ह साइडबार लेआउट आहे. हि थीम वापरून तुम्ही स्पोर्ट्स ब्लॉग , मॅगझीन आणि न्यूज वेबसाईट बनवू शकता.

10. The Columnist

The Columnist हि थीम एक क्वालिटी रिस्पोन्सिव्ह फ्री वर्डप्रेस ब्लॉग थिम आहे . हि थीम तुम्ही पर्सनल आणि मॅगझीन ब्लॉग साठी वापरू शकता.

हि थीम अत्यंत कस्टमाइझेबल आहे : तुम्ही होमपेज, संग्रहण, सिंगल पेज, bbPress आणि BuddyPress वर वेगवेगळे लेआउट स्वतंत्रपणे सेट करू शकता.

या काही निवडक वर्डप्रेस ब्लॉग थीम्स आहेत , या थीम्स वापरून तुम्ही तुमचा वर्डप्रेस ब्लॉग बनवू शकता.

हे देखील वाचा : वर्डप्रेस वेबसाईट कशी बनवावी ?

Share and Enjoy !

Shares
Similar Posts

3 Comments

  1. […] टॉप 10 सर्वोत्कृष्ठ Best WordPress Blog Themes […]

  2. […] हे देखील वाचा : टॉप 10 सर्वोत्कृष्ठ BEST WORDPRESS BLOG THEMES IN MARATHI […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *