Redmi Note 13 Series

मित्रांनो आज आपण Redmi ची नवीन सिरीज Redmi Note 13 Series बाजारात येत आहे, याबद्दल जाणून घेणार आहोत. Redmi हि स्वस्त दरात प्रीमियम फोन बनवण्यास ओळखली जाते. Redmi कंपनीला मोबाईल बनवण्याचा प्रदिर्ग अनुभव आहे. Redmi कंपनीने आतापर्यंत अनेक प्रकारचे मोबाईल बनवले आहेत. Redmi कंपनीचा जागतिक बाजारपेठेत वेगळ्या प्रकारचा प्रभाव आहे. Redmi कंपनीचं फोन वापरणारे या जगात खुप लोक आहेत.

Redmi Note 13 Series

Redmi चा नवीन 200MP वाला स्मार्टफोन बाजारात झिंगाट करायला तयार आहे. Redmi आपल्या नवीन Redmi Note 13 Series वर काम करत आहे. सर्वात आधी हि सिरीज चीन मध्ये लाँच केली जाईल असा म्हटलं जातंय. काही रिपोर्ट नुसार असं म्हटलं जातंय कि हा स्मार्टफोन चीन मध्ये येत्या ऑक्टोबर मध्ये अनंत आहे. हि सिरीज लाँच करणार आहेत, या मध्ये तीन प्रकारचे स्मार्टफोन असतील, ते म्हणजे Redmi Note 13, Redmi Note 13 Pro, Redmi Note 13 Pro+ असतील. टिप्सटर डिजिटल चॅट स्टेशन द्वारे Redmi Note 13 Pro+ चे काही स्पेसिफिकेशन लीक केले होते, त्याबद्दल आपण जाणून घेऊ या.

Redmi Note 13 Pro+ चे स्पेसिफिकेशन (संभावित)

टिप्सटर डिजिटल चॅट स्टेशन ने जे काही स्पेसिफिकेशन लीक केले होते त्याबद्दल चर्चा करूया, पण स्पेसिफिकेशन सांगताना टिप्सटर ने कुठल्या कंपनीचा नाव नव्हता घेतला.

कॅमेरा , Display

स्किम्यंटिक्स च्या माहिती नुसार, या स्मार्टफोन मध्ये फ्लॅगशिप शाओमी 12 सिरीज स्मार्टफोन च्या सारखा कॅमेरा कटआऊट असणार आहे. नवीन स्मार्टफोन मध्ये रियर ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल, त्याबरोबर LED फ्लॅश असणार आहे. टिप्सटर चा बोलणं असं आहे कि, Redmi 12 सिरीज सारखा या मध्ये हि 200MP चा प्रायमरी कॅमेरा असेल. या फोन मध्ये 4x इन सेन्सर झूम भेटेल. या स्मार्टफोन मध्ये समोरच्या बाजूस सेण्टर्ड सिंगल पंच होल बरोबर 6.7 इंच OLED डिस्प्ले असणार आहे. शाओमी या डिस्प्ले मध्ये 1.5K रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट देणार आहे.

बॅटरी , सॉफ्टवेअर

माहिती नुसार Redmi Note मध्ये 120W TurboPower चार्जिंग सपोर्ट आणि 5000mAh बॅटरी असणार आहे. या फोन मध्ये Android OS-आधारित MIUI 15 आउट-ऑफ-द-बॉक्स, बूट करेल. या सॉफ्टवेअर ची टेस्टिंग चीन मध्ये सुरु आहे . प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर ते MediaTek Dimensity 1080 प्रोसेसरने सुसज्ज असेल. यात 12GB पर्यंत रॅम असणार आहे.

लवकरच हा आपल्या साठी उपलब्द असेल , अशी आशा करू या.

हे देखील वाचा जगातील सर्वात STYLISH DASHING फोन : MOTOROLA RAZR 40 ULTRA स्मार्टफोन 

Share and Enjoy !

Shares
Similar Posts

Leave a Reply