Lease Agreement in Marathi

Share and Enjoy !

Shares

मित्रांनो आज आम्ही Lease Agreement in Marathi घेवून आलो आहोत. तुम्हाला कधीतरी काही भाड्याने घेयाचे असल्यास म्हणजेच जमीन, घर, रूम , गाळा काही भाड्याने घेयाचे असल्यास , या खाली दिलेल्या कराराचा वापर करू शकता. हाच करार तुम्ही वकीला द्वारे बनण्यास गेलास तर, वकील तुमच्याकडून रु. ५०००-६००० फी आकारतो.

तुम्ही या Lease Agreement in Marathi करार नाम्याची सोफ्त कॉपी डाउनलोड करून प्रिंट काढू शकत , ते पण मुफ्त. तुम्ही खाली दिलेल्या Download बटन वर क्लिक करून PDF Download करू शकता.

Lease Agreement in Marathi | भाडे करारनामा मराठी 2025

    भाडे करारनामा

हा भाडेकरार आज दिनांक………………………………..२०  भाडेकरार येथे ……….

श्री.—————————————–

वय ——–वर्षे, धंदा ———————

राहणार ————————————                   भाडे करार लिहून देणार  

———————————————                        (प्रथम पक्षी ) मालक

                           यांसी

श्री. —————————————–

वय ——– वर्षे, धंदा ———————-           

राहणार ————————————                  भाडे करार लिहून घेणार         

———————————————                     ( दुसरे पक्षी ) भाडेकरू         

कारणे ——– महिने मुदतीचा भाडे करार करतात कि ,

सदरचा करार लिहून देणार यांचे मालकीचा व ताबे कब्जात असलेला ———————————————————————————————————————–

सदर मिळकत असे संबोधण्यात येईल ह्या मिळकतीचा भाडेकरार.सदरची मिळकत लिहून घेणार ह्यांना भाडे तत्वावर घेण्याची आहे. व लिहून घेणार यांनी  लिहून देणार यांना सदर मिळकत राहण्यासाठी Leave and License तत्वावर भाड्याने राहण्यासाठी / धंद्यासाठी देण्याचे मान्य व कबूल केले आहे. सदर करारा मध्ये आपसात मान्य व कबूल करण्यात आलेल्या अटी व शर्ती, खालीलप्रमाणे :

  • सदरचा भाडे करार दिनांक ————– रोजी पासून सुरु होणार व पुढील दिनांक ——— पर्यंत अशी ——– महिन्यांसाठी राहण्यासाठी/धंद्यासाठी देत आहे. शिवाय या घरामध्ये / दुकानामध्ये फक्त ——– व्यक्तीच राहतील ——— जणापेक्षा जास्त व्यक्ती राहण्यास मनाई आहे. व ——— महिन्याचा करार संपताच त्यानंतर एकमेकांच्या विचाराने सदरची मुदत वाढविण्याविषयी विचारणा करण्यात येईल.  
  • भाड्याने दिलेली जागा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी लिहून घेणार यांचेवर आहे. व ती योग्य रीतीने पार पाडतील याची मी हमी देत आहे. सदर मिळकतीची कोणतेही नुकसान करणार नाही., नुकसान झाल्यास ती भरणे ची जबाबदारी लिहून घेणार यांची आहे. सदर मिळकतीचा नुकसानी / खराब होणार नाही याची हमी म्हणून लिहून घेणार हे रक्कम रु.—————-/- ( अक्षरी रु.———————————————मात्र ) डिपॉजिट म्हणून लिहून देणार यांना देत आहे. सदर डिपॉजिट ची रक्कम मिळकतीचा ताबा कब्जा सोडतेवेळी लिहून घेणार हे लिहून देणार यांना परत करतील. ( ज्यावेळेस मालकास गरज पडल्यास संबधित भाडोत्रीस नोटीस दिल्यानंतर ३० दिवसांच्या आत खोली रिकामी कारणे हे बंधनकारक राहील. )
  • सदर मिळकतीच्य वापराबद्दल दरमहा रक्कम रु.——————/- (अक्षरी रु.—————————————-मात्र ) दुसरे पक्षी यांनी भाडे दिनांक.————— तारखे पर्यंत दयावयाचे आहे. या भाड्याशिवाय वीज बिल व पाणी बिल लिहून घेणार दुसरेपक्षी यांनी भरणे आवश्यक आहे.
  • लिहून घेणार यांनी ठरलेले भाडे ————- दिवस / महिन्यांपर्यंत जर वेळेवर दिले नाही तर लिहून देणार यांना संपूर्ण अधिकार आहे कि ते सदर करार रद्द करू शकतात.
  • लिहून देणार हे सदर मिळकतीचा सोसायटी चार्जेस ( सेवा शुल्क ) तसेच कोणत्याही प्रकारचे येणारे शुल्क लिहून देणार यांनी भरवायचे आहे.
  • लिहून देणार मालक यांना संपूर्ण अधिकार आहे कि ते सदर मिळकतीमध्ये कधीही देखरेखीसाठी प्रवेश करू शकतात या गोष्टीवर लिहून घेणार यांची कुठल्याही प्रकारची तक्रार हरकत नाही संपूर्ण संमती आहे.
  • सदरची मिळकत लिहून घेणार यांना राहण्यासाठी दिली आहे. या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही कामासाठी लिहून घेणार यांना हि मिळकत वापरता येणार नाही. तसेच सदर मिळकत पोट भाड्याने देता येणार नाही. तसे झाल्यास सदरचा करार त्यावेळी रद्द झाला असे समजून मिळकतीचा खुला ताबा कब्जा लिहून देणार यांस घेणेच अधिकार आहे.
  • सदर मिळकतीच्या बाबतीत जर हा भाडेकरार पुढील कालावधीसाठी वाढवावयाचा असल्यास त्यामध्ये लिहून देणार हे प्रती वर्षी भाड्याच्या रक्कमेत १० टक्के वाढ करू शकतात.
  • सदर करारावर मुदत संपताच लिहून घेणार सदर मिळकतीचा खुला ताबा कब्जा लिहून देणार मालक परत करतील व लिहून देणार मालक त्यांना त्यांनी डिपॉजिट ची रक्कम परत करतील.

सदर भाडेकरार पत्र उभयपक्षी यांनी कोणच्याही दडपणाला बळी न पडता पूर्ण अक्कल हुशारीने लिहिला आहे. यातील संपूर्ण मजकूर माझ्या माहिती व समजुतीप्रमाणे खरा आहे.

येणेप्रमाणे सदर भाडे करारच्या अटी व शर्ती आम्हाला मान्य व कबूल आहेत याचे सत्यतेसाठी आम्ही साक्षीदार समक्ष साक्षांकित करीत आहोत.

                                                                             सह्या / अंगठा

                                                          श्री/श्रीमती ————————————–                                                            भाडेकरार लिहून देणार मालक

                                                           श्री/श्रीमती ————————————–                                              भाडेकरार लिहून घेणार भाडेकरू  

साक्षीदार :

१)——————————————

२)——————————————

पावती

आज दिनांक.——————–रोजीला लिहून घेणार (भाडेकरू) यांचे कडून सदर मिळकतीची डिपॉजिट रोख / धनादेश्द्वारे धनादेश क्र.——————— बँक——————-,शाखा—————————–दिनांक——————- रोजी, रक्कम रु.——————-/- (अक्षरी ————————————————–मात्र) मिळाली आहे व सदर रक्कम मिळालेची मी मालक पावती देत आहे.          

                                                                             सह्या / अंगठा

                                                          श्री/श्रीमती ————————————–                                                            भाडेकरार लिहून देणार मालक

साक्षीदार :

१)——————————————

२)——————————————

Lease Agreement in Marathi

आम्हाला आशा आहे कि Lease Agreement in Marathi | भाडे करारनामा मराठी 2025 हा लेख तुम्हाला आवडला असेल !

धन्यवाद !

Rent Agreement Format in Marathi | घर भाडे करारनामा नमुना मराठी 2025

Share and Enjoy !

Shares
Similar Posts