Android वापरकर्त्यांसाठी खुश खबर, OpenAI लवकरच ChatGPT ची Android आवृत्ती आणणार आहे, ChatGPT coming to Android Users in Marathi.
आधी आपल्याला काही माहिती शोधायची असल्यास, आपल्या कडे एकाच पर्याय होतं , ते म्हणजे Google, पण आता काही तंत्रज्ञान आले आहेत जसे ChatGPT , Google Bard, Bing AI, ह्यांना काही प्रश्न विचारल्यास ते आपल्या प्रश्नांची उत्तरे लगेच लिहून देतात. या सर्व तंत्रज्ञानात सर्वात लोकप्रिय आहे तो म्हणजे ChatGPT. ChatGPT ने सर्वत्र धुमाकूळ करून ठेवला आहे, जिथे जावं तिथे ChatGPT ची चर्चा सुरु असते. लाँच झाल्यापासून ChatGPT आपल्या आश्चर्यकारक वापरासाठी लोकप्रिय आहे.
गेल्या नोव्हेंबर २०२२ ला ChatGPT लाँच झाले होते, सर्वजण हे AI समर्थित चाटबॉट फक्त PC किंवा लॅपटॉप द्वारे ऍक्सेस करत होते, पण यावर्षी मे २०२३ मध्ये याचा मोबाईल व्हर्जन IOS अँप लाँच केले गेले होते. IOS समर्थित अँप आल्यापासून सर्व या चाटबोट च्या Android व्हर्जन ची वाट पाहत होते. आता आपल्या वाट पाह्यची गरज नाही आहे कारण OpenAI लवकरच ChatGPT ची Android आवृत्ती पुढच्या आठवड्यात आणणार आहे आणि तुम्ही यासाठी SignUp आतापासून करू शकता.
After IOS व्हर्जन ChatGPT Coming to Android
AI पावर्ड चॅट बोट IOS अप्लिकेशन ला खूप प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. IOS अँप वाले खूपच खुश आहेत, कारण आता येताजाता ते चॅट बोट वर काहीही विचारू शकतात आणि त्याचे उत्तर त्यांना लगेच लिहून भेटतोय. पहिल्या आठवड्यात आयफोन वापरकर्त्यांनी हे अँप अर्धा दशलक्ष वेळा डाउनलोड केले. पण हे सर्व पाहून Android यूजर्स ला वेगळं वाटण्याचं गरज नाही , कारण त्यांच्यासाठी हि खुश खबर आहे. OpenAI ने जाहीर केले आहे की ते त्याच्या सर्वात लोकप्रिय निर्मितीच्या Android आवृत्तीसह ते तयार आहेत. अँपची आगामी अँड्रॉइड आवृत्ती जगभरातील लाखो फर्स्ट वापरकर्त्यांसाठी ऍक्सेसेबल असेल.
Open AI ट्विट
एआय पॉवरहाऊसने त्याच्या अधिकृत ट्विटर खात्यावर मोठी घोषणा केली. OpenAI ने सांगितले की हे अॅप पुढील आठवड्यात अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी आणले जाईल आणि आजपासून Google Play Store वर त्याची प्री-ऑर्डर करता येईल.
अँपची अँड्रॉइड आवृत्ती OpenAI च्या नवीनतम ऍडव्हान्स टेकनॉलॉजि जगभरातील लाखो वापरकर्त्यांच्या हाताच्या बोटांपर्यंत पोहोचवेल. अधिकृत अँप विनामूल्य आहे म्हणजेच फ्री टू यूज आहे आणि कंपनीनुसार ते सर्व डिव्हाइसेसवर हिस्टरी सिन्क करते. शिवाय, यामध्ये OpenAI कडून नवीनतम सुधारणा देखील केली आहेत.
iOS अँप लाँच करताना, OpenAI ने माहिती दिली होती की ते आधीपासूनच Android आवृत्तीवर काम करत आहे आणि वापरकर्त्यांसाठी लवकरच उपलब्द असेल. नवीनतम भिन्नतेसह, ChatGPT मोबाइल वापरकर्त्यांसाठी iOS आणि Android दोन्ही आवृत्त्या असलेल्या AI साधनांच्या सूचीमध्ये सामील झाले आहे. दुसरा अँप ज्यामध्ये iOS आणि Android दोन्ही आवृत्त्या आहेत तो मायक्रोसॉफ्ट बिंग आहे.
हे देखील वाचा आर्टिफिशिअल इंटेलिजन्स संपूर्ण माहिती । ARTIFICIAL INTELLIGENCE FULL INFORMATION IN MARATHI
ChatGPT प्रसिद्धी
ChatGPT लाँच झाल्यानंतर त्याच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. चॅटबॉट हा 100 दशलक्ष वापरकर्ते मिळवणारा सर्वात जलद ऍप्लिकेशन बनला आणि तोही लॉन्च झाल्यापासून अवघ्या चार महिन्यांत. त्याने फेसबुक, स्नॅपचॅट आणि मायस्पेसला मागे टाकले ज्यांना हा आकडा गाठण्यासाठी सुमारे चार वर्षे लागली. गेल्या काही महिन्यांत, ChatGPT जे OpenAI च्या GPT3.5 आणि GPT-4 लार्ज लँग्वेज मॉडेल्सवर चालते, जगभरातील लाखो कार्यरत व्यावसायिकांसाठी उपलब्ध साधन बनले आहे. कोड जनरेट करण्यापर्यंत मानवासारखा प्रतिसाद देण्यापासून, ChatGPT ला AI च्या क्षेत्रात मैलाचा दगड म्हणून पाहिले जाते.
[…] […]
[…] […]