Rent Agreement Format in Marath

मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी Room Rent Agreement Format in Marathi घेऊन आलो आहोत. आपल्याला कधी ना कधी रूम रेंट अग्रीमेंट ची गरज लागलीच असेल. तुम्ही रूम मालक असाल किंवा तुम्हाला रूम भाड्याने घेयाची असल्यास, Rent Agreement ची गरज लागते. आपण जर बाहेरून अग्रीमेंट ची प्रिंट घेयला गेलो तर रु.३००-४०० घेतले जातात.

जर तुमच्याकडे रेंट अग्रीमेंट ची सॉफ्ट कॉपी असेल तर तुम्ही स्वतः स्टॅम्प पेपर विकत घेऊन, अग्रीमेंट ची प्रिंट काढू शकता. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी Stamp Paper Rent Agreement Format in Marathi घेऊन आलोय , तुम्ही खाली दिलेल्या डाउनलोड बटन ला क्लिक करून PDF फाईल डाउनलोड करू शकता.

Home Room Rent Agreement Format in Marathi । भाडे करारनामा नमुना मराठी

मुदतीचा भाडे पट्टा करार

हा करार आज दिनांक…………… रोजी, मौजे………………. ता.जी………….. येथे

श्री/सौ………………………………………………………)

पत्ता…………………………………………………………) प्रथम पक्षीय (मालक) लिहून देणार

……………………………………………………………….)

श्री/सौ……………………………………………………..)

पत्ता ……………………………………………………….) दुसरे पक्षीय (भाडेकरू) लिहून घेणार

………………………………………………………………)

कारणे भाडे करार करण्यात येतो की,

सदरचा करार लिहून देणार यांचे मालकीची व ताबे कब्जात असलेली घर/दुकान/गाळा ……………………………….. …………….. …………………………………………………………… …………………………………………………………………….. …………………………………….. …….. सदर मिळकत असे संबोधण्यात येईल या मिळकतीचा भाडे करा सदरची मिळकत लिहून घेणार यांना भाडेतत्त्वावर घेण्याची आहे व लिहून घेणाऱ्यांनी लिहून देणार यांना सदर मिळकत भाडेतत्त्वावर घेण्यासाठी विनंती केल्यावरून लिहून देणार यांना सदर मिळकत राहण्यासाठी धंद्यासाठी देण्याचे मान्य व कबूल केले आहे. सदर करारामध्ये आपसात मान्य व कबूल करण्यात आलेले अटी व शर्ती खालील प्रमाणे :-

१) सदरहु घर/दुकान/गाळा भाडे स्वरूपात आज दिनांक………………… पासून ते दिनांक…………………. पर्यंत दिल्याचे पोटी द्वितीय पक्ष यांनी मला आज रोजी अनामात रक्कम रुपये……………………/- (अक्षरी…………………………………………………………. ……………………………..) या करारावर सही करताना मिळावी असून करार संपताच मी त्यांना सदर रक्कम बिनव्याजी परत करीन.

२) आज पासून भाडे स्वरुपात द्वितीय पक्ष हे सदरहू घर/दुकान/गाळा उपयोग घेणार असल्याने त्या पोटी त्यांना मला दर महिन्याचे भाडे म्हणून रुपये रक्कम……………………../-(रु……………………………………………………………… …………………………. ……………………फक्त), मासिक भाडे दर महिन्याच्या ………….. तारखेच्या आत आगाऊ स्वरूपात देणेचे असून कोणत्याही महिन्याच्या भाडे थकवण्याचे नाही. तसेच कोणत्याही दोन महिन्याचे भाडे थकवल्यास हा करार रद्द करून सदरहू जागेचा ताबा मी घेण्यास बांधील आहे.

३) सदरहू घर/दुकान/गाळा वापर द्वितीय पक्ष यांनी फक्त राहण्यासाठी/व्यवसायासाठी म्हणून करायचा आहे त्याचा गैरवापर करायचा नाही. तसेच जागा अन्य कोणाची पोट भाड्याने व अन्य कोणत्याही प्रकाराने देण्याची नाही.

४) दुसरे पक्ष लिहून घेणार यांनी सदर जागेचा वापर चांगल्या प्रकारे करायचा आहे. त्याची कोणत्याही प्रकारची मोडतोड, फेररचना करवायची नाही व त्याचा वापर फक्त राहण्यासाठी/व्यवसायासाठी करायचा आहे व त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा बेकायदेशीर धंदा करायचा नाही.

५) भाड्याने दिलेली जागा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी लिहून घेणार याच्यावर आहे. व ती योग्य रीतीने पार पडणार त्याची मी हमी देत आहे. सदर मिळकतीची कोणतेही नुकसान करणार नाही. नुकसान झाल्यास मी भरण्याची जबाबदारी लिहून घेणर यांची आहे.

६) दुसरे पक्षीय केवल लायसनसी असल्याचे त्यास कबूल व मान्य आहे व त्यांनी सदर ब्लॉकचे संबंधात कोणत्याही प्रकारचे भाडे करूचे हक्क निर्माण होणार नाहीत व तशा स्वरूपाचे हक्क दुसरे पक्ष सांगणार नाही. या स्पष्ट अटीवर पहिले पक्ष यांनी केवळ दुसरे पक्ष यास जागा लिव्ह अँड लायसन्स ने दिली आहे.

७) या कराराची मुदत संपताबरोबर दुसरे पक्ष यांनी संपूर्ण घराचा खुला कब्जा पहिले पक्ष यास देण्याचा आहे. व त्याचा कब्जा दिल्यावर पहिले पक्षाने करारा सोबत दिलेले डिपॉझिटची रक्कम दुसरे पक्षी यास परत करायची आहे. मात्र त्यावेळी रॉयल्टी काही रक्कम येणे बाकी असल्यास ती कापून घेण्याचे हक्क पहिले पक्ष यास आहे.

८) पहिले पक्ष यांची परवानगी शिवाय दुसरे पक्ष यांना सदरचे घर दुसरे पक्षीय/लिहून घेणार कोणतेही प्रकार तबदील करणार नाही.

९) प्रथम पक्षीय यांस जर काही कारणास्तव सदरहू घराची जरुरी असल्यास, तर त्यांनी दुसरे पक्षीय यांस………. महिने अगोदर लेखी नोटीस देऊन कळवायचे आहे. तसे दुसरे पक्षीय यांस जर काही कारणास्तव सदरहू घर/दुकान/गाळा कराराचे अगोदर सोडायचे असल्यास तरी त्याने प्रथम पक्षीय यांना……… महिना अगोदर लेखी नोटीस देऊन कळवायचे आहे.

१०) सदर मिळकतीच्या बाबतीत जर हा भाडे करार पुढील कालावधीसाठी वाढवायचा असल्यास त्यामध्ये लिहून देणार हे प्रतिवर्षी भाड्याचे रकमेत…………….% टक्के वाढ करू शकतात.

११) सदरहू घर/दुकान/गाळा चा वापर करताना वीजबिल व पाणी बिल दुसरे पक्ष लिहून घेणार त्यांना भरणे आवश्यक आहे. लिहून देणार हे सदर मिळकतीची सोसायटी चार्जेस (सेवा शुल्क तसेच अन्य कोणत्याही प्रकारचे येणारे शुल्क लिहून देणार यांनी भरवायचे आहे)

१२) सदर करारावर मुदत संपतात लिहून घेणार सदर मिळकतीचा खुळा ताबा लिहून देणार मालक परत करतील व लिहून देणार मालक त्यांना त्यांची डिपॉझिटची रक्कम परत करतील.

सदर रूम मध्ये राहणारे व्यक्तींचे नावे खालील प्रमाणे

नाव वय नाते

येणे प्रमाणे हा सदर भाडे करार उभय पक्षीय यांनी कोणाच्याही दडपणाला बळी न पडता राजी खुशीने व अक्कल हुशारीने केला आहे. तो आपणास तसेच आपले वालीवारस बंधनकारक आहे वर राहील या गोष्टीचे साक्षी करता आपण आपल्या सह्या त्या करारावर साक्षीदार समक्ष करून तो आज रोजी पुरा केला.

श्री/सौ………………………………………………………….. सही………………….. ……… फोटो

( पहिले पक्षीय / लिहून देणार )

साक्षीदार :-

१)

२)

श्री/सौ………………………………………………………….. सही………………………. ……. फोटो

( द्वितीय पक्षीय / लिहून घेणार )

साक्षीदार :-

१)

२)

घर भाडे पावती नमुना मराठी | Room Rent Receipt format in marathi

पावती

सदर करारातील दुसरे पक्षीय / लिहून घेणार श्री/सौ……………………………………………………………………………………….. यांच्या कडून रुपये………………………./-(अक्षरी……………………………………………………………………………………………….मात्र) आज दिनांक……………… रोजी रोख / धनादेशाद्वारे धनादेश क्र. ………………………… बँक………………………………………… सदर करारातील घराचे डिपॉजिट म्हणून मिळाले.

मला मिळाले.

रुपये…………………………./-

श्री/सौ……………………………………………..

(पहिले पक्षीय / लिहून देणार)

साक्षीदार :-

१)

२)

Room Rent Agreement format in Marathi Pdf Download

वरील भाडे करार तुम्ही Room Rent Agreement Format in MarathiShop Rent Agreement Format in Marathi Pdf download साठी पण वापरू शकता, फक्त रूम च्या जागी Shop लिहा.

आम्हाला आशा आहे कि Room Rent Agreement Format in Marathi | Marathi Language Rent Agreement format in Marathi हि पोस्ट नक्कीच आवडली असेल.

धन्यवाद!

Also Read 200+ NEW BUSINESS IDEAS IN MARATHI | 200+ नवीन उद्योग व्यवसायांची यादी 2023 ( LOW INVESTMENT, HIGH PROFIT )

Share and Enjoy !

Shares
Similar Posts

Leave a Reply