samsung smartphones

मित्रांनो, आज आम्ही घेऊन आलोय, Samsung Smartphones बद्दल संपूर्ण माहिती. या लेखा मध्ये आम्ही तुम्हाला सॅमसंग च्या सर्व सिरीज बद्दल माहिती देऊ, जेणे करून तुम्हाला सॅमसंग चा उत्तम फोन निवडता यावा. सॅमसंग ने या वर्षी २०२४ मध्ये ज्याला आता फक्त ४-५ महिने झाल्यात, या मध्ये ७-८ फोन लाँच केल्यात.

सॅमसंग ने M Series, F Series, A Series आणि S Series , या सर्व Samsung Galaxy सिरीज मध्ये फोन लाँच केले आहेत. तर तुम्ही कुठला फोन घेतला पाहिजे आणि कुठला फोन तुमच्यासाठी अगदी बरोबर आहे, हे तुम्हाला या लेखा मध्ये Samsung Smartphones full Information सांगणार आहोत, म्हणून संपूर्ण पोस्ट शेवट पर्यंत वाचा.

Samsung Smartphones full Information in marathi

एक गोष्ट चांगली सुद्द्धा केली आहे सॅमसंग ने, आणि थोडी कन्फ्युजिंग सुद्दा केली आहे. म्हणजेच M Series का F Series का, आणि ते सेम प्राइसिंग मध्ये येतात, फक्त थोडी रीब्रांडिंग केलेली असते. यानंतर A Series आहे, ज्या मध्ये भरपूर सेम स्पेसिफिकेशन्स आहेत, पण त्याच्या मध्ये प्राईस खूप जास्त असते. त्यानंतर S Series येतो, त्या आधी FE Series सुद्धा आहे, सर्व काही कन्फ्युजिंग आहे. म्हणून आम्ही सर्व काही सांगणार आहोत, सर्व सिरीज बद्दल.

Samsung Galaxy M Series

samsung smartphones M series

एम सिरीज म्हणजे काय, एम सिरीज चे मोबाईल बेसिकली बजेट फोन, कमी किमतीतले फोन. पण एम सिरीज मध्ये स्पेशिअल असते ते म्हणजे त्याची मोठी बॅटरी असते, बाकीचे फीचर्स सेम असतात, पण बॅटरी जबरदस्त असते 6000mAh. बॅटरी मोठी दिली म्हणजे बाकीच्या गोष्टी वाईट दिल्या असतात असं नाही. Amoled डिस्प्ले, Exynos 1280 प्रोसेसर काही मध्ये Snapdragon 7 gen 1 पण असतो. एम सिरीज हि बजेट सिरीज आहे. एम सिरीज हि Amazon वर भेटते.

Samsung Galaxy F Series

samsung smartphones F series

एम सिरीज आणि एफ सिरीज दोन्ही सेम आहेत, functionality पण सेम आहे. दोंघांमध्ये फरक आहे ते दिसण्या मध्ये. एफ सिरीज चे फोन दिसायला खूप चांगले असतात. उदाहरणार्थ बघितलं तर M55 आणि F55 दोन्ही सेम स्पेसिफिकेशन, पण लुक मध्ये F55 बेस्ट आहे, त्याला वेगन लेदर डिजाईन लूक दिला आहे. एफ सिरीज हि तुम्हाला फ्लिपकार्ट वर भेटते. एफ सिरीज लूक्स मध्ये एम सिरीज च्या तुलनेत वरचढ आहे.

Samsung Galaxy A Series

samsung smartphones A series

आता एम सिरीज आणि एफ सिरीज झाली, तर ए सिरीज का काढली. एम सिरीज आणि एफ सिरीज दोन्ही मिळून ज्या Qualities, ए सिरीज मध्ये भेटतात. ए सिरीज मध्ये ग्लास बॅक दिला आहे, आणि साईड फ्रेम मेटॅलिक दिली आहे. एम सिरीज आणि एफ सिरीज मध्ये बॅक कव्हर आणि साईड फ्रेम प्लास्टिक ची दिली आहे. वापरायला खूप स्मूथ, IP67 certified आहे. पण ४-५ हजारांनी महाग पण आहे. एक महत्वाची गोष्ट म्हणजे ए सिरीज दोन्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन भेटतो. ऑफलाईन भेटल्या मुले थोडा महाग आहे, पण जास्त ऑफलाईन विकला जातो. कारण भारतात अजून ऑफलाईन खरेदी जास्त केली जाते. ए सिरीज ३८००० ते ४०००० ला भेटतो.

Samsung Galaxy FE Series

samsung smartphones FE series

एफ इ सिरीज आल्यामुळे अजून कन्फयुजन झालं आहे. एफ इ सिरीज ३४००० ते ३६००० ला भेटतो, आणि या मध्ये एस सिरीज चे ८०-८५% फीचर्स भेटतात, जसे वायरलेस चार्जिंग, कॅमेरा हि चांगला भेटतो. हा एस सिरीज चा फॅन एडिशन फोन आहे.

Samsung Galaxy S Series

samsung smartphones S series

एस सिरीज म्हणजे फ्लॅगशिप सिरीज, या मध्ये तुम्हाला सर्व काही भेटून जातो म्हणजे लूक पासून स्पेसिफिकेशन्स बेस्ट आहेत. Samsung Galaxy S23, Samsung Galaxy S24, Samsung Galaxy S23 Ultra , Samsung Galaxy S24 Ultra हे फोन या सिरीज मध्ये येतात. या सिरीज मधला Samsung Galaxy S23 आता खूप स्वस्त भेटतो फक्त ४५००० ला. बाकीचे फोन या सिरीज मधले खूप महाग आहेत.

Samsung Galaxy Z Series

samsung smartphones Z series

अजून एक सिरीज आहे, ती म्हणजे Z सिरीज, या मध्ये फोल्डेड फोन येतात. या सिरीज मध्ये Samsung Galaxy Z fold 4, Samsung Galaxy Z flip 4 येतात.

Conclusion

तर हे झाले सर्व सिरीज बद्दल माहिती. पहिला सॅमसंग फक्त महाग फोन काढायचा, पण या सिरीज आल्यामुळे १२००० पासून लाखापर्यंत सॅमसंग चे फोन भेटतात. अजून एक चांगली गोष्ट म्हणजे सॅमसंग ने आता ४-५ वर्षाचे अपडेट्स देयाला चालू केले आहे. पण एक वाईट गोष्ट पण आहे कि सॅमसंग चे फोन छोट्या बॉक्स मध्ये येतात, ज्यामध्ये चार्जर नसतो, फक्त चार्जिंग केबल असते. तर कसा वाटलं Samsung Smartphones full Information हा लेख, हे नक्की कंमेंट मध्ये सांगा आणि तुम्ही कुठला ब्रँड वापरता ते हि कंमेंट मध्ये सांगा.

धन्यवाद !

FAQs

Samsung Galaxy S23 महाग का आहे?

Samsung S23 हा सॅमसंग चा फ्लॅगशिप सिरीज मधला फोन आहे. S23 सुरुवातीला Rs.65000 ला भेटायचा, पण आता Rs.45000 भेटतो.

सॅमसंग 2024 मध्ये नवीन फोन घेऊन येत आहे का?

Samsung Galaxy S24 Ultra, Galaxy S24 Plus आणि Galaxy S24 यासह Galaxy Unpacked 2024 इव्हेंटमध्ये 17 जानेवारी 2024 रोजी लाँच झालेली त्याची फ्लॅगशिप Galaxy S24 सिरीज आली आहे.

हे देखील वाचा BEST 5G SMARTPHONE UNDER 12000: 12 हज़ार च्या बजट मध्ये धमाकेदार परफॉरमेंस देणारे 5G SMARTPHONE

Share and Enjoy !

Shares
Similar Posts

Leave a Reply