what is SEO in Marathi

मित्रांनो आज आपण What is SEO in Marathi या बद्दल जाणून घेणार आहोत. SEO (सर्च इंजिन ऑप्टिमाइजेशन) हा कोणत्याही डिजिटल मार्केटिंग strategy चा एक महत्त्वाचा घटक आहे. आपण कधी विचार केला आहे का, जेव्हा आपल्याला कुठलीतरी माहिती हवी असते , तेव्हा आपण Google किंवा दुसऱ्या अन्य सर्च इंजिन वर शोधतो आणि आपल्याला ती पूर्ण माहिती लगेच काही सेकेंद मध्ये भेटते. त्या माहिती related सर्व वेबसाईट चे रिझल्ट आपल्या समोर येतात, पण आपण कधी विचार केला आहे का, कि हे रिझल्ट कसे? आले असतील, हे सर्व SEO मुळे होते .

तर चला या ब्लॉगमध्ये, आपण SEO च्या काही प्रमुख पैलूंचा समावेश करू, ज्यामध्ये SEO म्हणजे काय ? What is  SEO In Marathi ?, SEO महत्त्वाचे का आहे. , ते कसे कार्य करते आणि तुमच्या वेबसाइटचे रँकिंग सुधारण्यासाठी काही सर्वोत्तम पद्धती.. जाणून घेऊया.

सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन SEO म्हणजे काय ? What is SEO in Marathi ?

SEO म्हणजे Search Engine Optimization हि एक अशी टेक्नोलोजी आहे जिचा वापर करून आपन आपल्या वेबसाइटला किंवा ब्लॉगला सर्च इंजिन मध्ये रँक करतो. SEO मध्ये Google, Bing, Yahoo, इ. सारख्या सर्च इंजिन रिझल्ट पेज (SERPs) वर आपली रँकिंग सुधारण्यासाठी, आपल्या वेबसाइट आणि कंटेंट ऑप्टिमाइझ करणे गरजेचे असते.

SEO महत्वाचे का आहे ? Why is SEO Important?

आजच्या डिजिटल युगात, बहुतेक लोक त्यांना आवश्यक असलेली माहिती शोधण्यासाठी सर्च इंजिनचा वापर करतात. दररोज ३.५ अब्ज पेक्षा जास्त सर्च करून , Google सारखी सर्च  इंजिन प्रमुख माहितीचे स्रोत बनले आहे. जो पर्यंत तुमची वेबसाइट Google मध्ये पहिल्या पेज वर  rank होत  नाही तोपर्यंत तुमच्या वेबसाइट वर लोक येणार नाही आणि तुम्ही संभाव्य ग्राहक आणि कमाई गमवू शकता म्हणून गूगल मध्ये आपल्या वेबसाइटला चांगल्या क्रमांकावर आनण्यासाठी आपल्याला SEO ची गरज असते. SEO मध्ये तुमची वेबसाइट आणि कंटेंट ऑप्टिमाइझ करून, सर्च इंजिनमध्ये  तुम्ही तुमच्या वेबसाइटची रँकिंग आणि Visibility सुधारू शकता, ज्यामुळे संभाव्य ग्राहकांना तुम्हाला ऑनलाइन शोधणे सोपे होईल.

SEO कसे कार्य करते ? How Does SEO Work?

दिलेल्या सर्च क्वेरीसाठी, सर्च  इंजिन रिझल्टच्या पहिल्या पेजवर कोणती वेबसाइट आणि पेजेस  दिसावीत हे निर्धारित करण्यासाठी सर्च इंजिन Complex अल्गोरिदम वापरतात.

SEO चे प्रकार – Types Of SEO in Marathi

SEO चे तिन महत्वपूर्ण प्रकार आहेत.

ON-Page SEO

on page seo

On Page SEO म्हणजे “ऑन साईट ऑप्टिमायझेशन”. आपल्या वेबसाईट ला गुगलवर रँक मिळवण्यासाठी जे काही बदल आपण आपल्या वेबसाईटवर करतो  त्याला ऑन-साईट” (On Site) एसइओ ON-Page SEO  म्हणतात.

ऑन-पेज SEO चे काही घटक, ज्यांच्यामुळे तुमची वेबसाईट रँक करू शकते :

Keyword research आणि उपयोग : कीवर्ड रिसर्च ही कीवर्ड ओळखण्याची आणि विश्लेषण करण्याची प्रक्रिया आहे जी लोक Google सारख्या सर्च  इंजिनवर माहिती शोधण्यासाठी वापरतात. कीवर्ड शोधण्यासाठी तुम्ही Google कीवर्ड प्लॅनर किंवा ahrefs सारखी साधने वापरा.

Content Quality : कंटेंट हा तुमच्या पोस्ट चा main part असतो. जेवढी तुम्ही Unique, Informative Quality माहीती द्याल तेवढी तुमची रँकिंग लवकर वरती येईल. कीवर्डचा Strategically वापर करा आणि कीवर्ड स्टफिंग टाळा, ज्यामुळे तुमच्या वेबसाइटच्या रँकिंगला हानी पोहोचू शकते.

  Title tag : शीर्षक Tag आकर्षक असावे, जेणेकरून ते वाचकांना आकर्षित करू शकेल. माझ्या माहितीनुसार Title Tag मध्ये मुख्य Keyword चा वापर केला पाहिजे.

  Meta Description : मेटा Description हे Easy आणि Simple असलं पाहिजे. हे वाचल्यावर प्रेक्षकांना कल्पना आली पाहिजे की आपल्या लेखामध्ये काय लिहलं आहे.

  Image Alt tag : इमेजेस मध्ये वापरलेल्या Alt tag ने Google ला माहिती भेटते की इमेज कशाची आहे. म्हणून पोस्ट मध्ये वापरलेल्या प्रत्येक Image ला Alt Tag वापरायचं.

  Internal links : आपल्या ब्लॉग च्या कोणत्याही पोस्ट मध्ये त्या ब्लॉग च्या दुसऱ्या पोस्ट ची लिंक  एड करने म्हणजे इंटर्नल लिंक करणे.

URL Optimisation : आपल्या URL मध्ये Main किवर्ड चा वापर झाला पाहिजे .

OFF-Page SEO

OFF PAGE SEO

Off-Page SEO म्हणजे आपल्या वेबसाईट ला प्रोमोट करणे , जसे कि बॅकलिंक्स बनवणे (इतर वेबसाइटवरून तुमच्या वेबसाइटवरील लिंक्स) आणि सोशल सिग्नल्स (सोशल मीडियावरील लाईक्स, शेअर्स आणि टिप्पण्या) ,करणे यालाच आपण ऑफ पेज एसइओ म्हणतात.

Technical-SEO

technical seo

टेकनिकल एसईओ म्हणजे आपल्या वेबसाइट चे टेक्निकल Points (वेबसाईट स्पीड , वेबसाइट Structure, SSL, Broken लिंक्स, Mobile फ्रेंडली)  चेक करणे होय  आणि त्या मदतीने आपण आपल्या वेबसाइटला अधिक चांगल्या प्रकारे  Optimize करू शकतो.

CONCLUSION । What is SEO in Marathi ?

SEO कोणत्याही डिजिटल मार्केटिंग धोरणाचा एक महत्त्वाचा घटक आहे. सर्च इंजिनसाठी तुमची वेबसाइट आणि कंटेंट ऑप्टिमाइझ करून, तुम्ही तुमच्या वेबसाइटची रँकिंग आणि Visibility सुधारू शकता, अधिक Traffic आकर्षित करू शकता आणि तुमच्या उद्योगात तुमचा ब्रँड स्थापित करू शकता. तुमची वेबसाइट स्पर्धेच्या पुढे राहते याची खात्री करण्यासाठी नवीनतम SEO ट्रेंड आणि सर्वोत्तम पद्धतींसह अद्ययावत राहण्याचे लक्षात ठेवा.

SEO म्हणजे काय ? What is SEO in Marathi ? या पोस्ट बद्दल तुम्हाला काही अडचण असेल किंवा तुमच्या काही सूचना असतील तर नक्कीच कंमेंट करा. तसेच तुम्हाला हि पोस्ट कशी वाटली हे सुद्धा सांगा आणि शेयर करायला विसरू नका. 

धन्यवाद !

FAQs

SEO चे Full-Form काय आहे?

SEO चे Full-Form “Search Engine Optimization” असे होते.

SEO मध्ये External Backlink म्हणजे काय?

जेव्हा वेबसाइटला बाहेरील (किंवा अन्य) वेब साईट वरून लिंक मिळते तेव्हा त्यास External बॅकलिंक असे म्हणतात.

SEO मध्ये Do follow बॅकलिंक काय आहे?

Dofollow Backlink ला लिंक जूस असेहि म्हटले जाते. या मध्ये एका वेबसाईट वरून दुसऱ्या वेबसाईट मध्ये लिंक ज्युस पास केला जातो, या लिंक च्या साहाय्याने सर्च इंजिनवर आपल्या वेबसाईट ची रँकिंग वाढू शकते.

SEO मध्ये No Follow बॅकलिंक काय आहे?

No Follow लिंक च्या मदतीने आपल्या वेबसाईटवर Traffic वाढवण्यात मदत भेटते. पण या लिंक चा सर्च इंजिन च्या रँकिंग वर काहीही परिणाम होत नाही.

What is Local SEO in Marathi ?

Local SEO म्हणजेच आपल्या किंवा कलाइन्टच्या बिजनेस वेबसाईट ला एका स्पेसिफिक लोकल एरिया किंवा लोकेशन साठी टार्गेट करणे जसे कि Store , Restaurant, Travel Agency, या सर्व बिजनेस वेब पेज लोकेशन ला लोकल एरिया मधील लोकांपर्यंत पोहचवता येईल.

What is White Hat SEO in Marathi ?

Google Algorithm च्या सर्व नियम व अटींचे पालन करून मिळवलेली रँकिंग म्हणजे व्हाईट हॅट एसईओ (White Hat SEO) होय.

What is ब्लॅक Hat SEO in Marathi ?

Black Hat हे असे SEO तंत्र आहे जे Google Algorithm च्या नियम व अटींचे पालन न करता म्हणजेच काही अनैतिक क्रिया करून रँकिंग मिळवणे म्हणजे ब्लॅक हॅट एसईओ होय.

हे देखील वाचा : वर्डप्रेस वेबसाईट कशी बनवावी ?

Share and Enjoy !

Shares
Similar Posts

5 Comments

  1. […] हे देखील वाचा : SEO म्हणजे काय ? WHAT IS SEO IN MARATHI ? […]

  2. […] चॅनेल ची Visibility वाढवण्यासाठी सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO) टेक्निक चा वापर करा. सर्च रिजल्ट […]

  3. […] Also Read SEO म्हणजे काय ? WHAT IS SEO IN MARATHI ? […]

Leave a Reply