Computer in Marathi

मित्रांनो आज आपण Computer in Marathi याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. कम्प्युटर म्हणजेच संगणक मराठी मध्ये, आपल्या जीवनातला एक अविभाज्य भाग बनला आहे. संगणकाचा उपयोग सर्व क्षेत्रामध्ये होत असतो म्हणून गरिबांपासून ते श्रीमंता पर्यंत सगळ्यांनाच कम्प्युटरचा उपयोग कधी ना कधी करावाच लागतो. यासाठी कम्प्युटरची माहिती असणे अतिशय गरजेचे झाले आहेत.

म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी Computer Information in Marathi संपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत. ही माहिती छोट्या शालेय मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत उपयोगी पडेल. तर चला कशाची वाट बघतोय जाऊया संगणकाच्या दुनियेत.

संगणक माहिती | Computer Definition in Marathi

कम्प्युटर च्या सिस्टम मध्ये दोन भाग असतात हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. हार्डवेअर म्हणजेच बाहेरील भाग जसे कीबोर्ड माऊस मॉनिटर इत्यादी, आणि सॉफ्टवेअर म्हणजेच सूचना ज्या हार्डवेअरला काय करावं हे सांगतात. कम्प्युटरचा खरा शोध कॅल्क्युलेशन करण्यासाठी झाला होता पण आता सर्व क्षेत्रांमध्ये कॉम्प्युटरचा वापर होतो.

संगणकाचा इतिहास | History of Computer in Marathi

साल 1820 च्या सुरुवातीला चार्ल्स बॅबेज ने पहिला कम्प्युटर बनवला. त्याला डिफरेन्स मशीन म्हणून म्हटले जात, हे मशीन बेसिक कॅल्क्युलेशन करण्यासाठी वापरले जाई. नंतर 1830 मध्ये चार्ल्स बॅबेज यांनी अजून त्याच्यावर काम करून त्याचा विकसित वर्जन बनवला त्याला ॲनालिटी मशीन म्हणून नाव दिले. हे मशीन व्याक्युम ट्यूब द्वारे वाफेवर चालायचे. हे मशीन खूप मोठे व महाग असायचे.

१९४७ मध्ये जेव्हा ट्रांजिस्टर चा शोध लागला, तेव्हा संगणकाच्या इतिहासामध्ये एक प्राविण्यपूर्ण वळण होते. ट्रांजिस्टर हे छोटे इलेक्ट्रॉनिक उपकरण होते, जे इलेक्ट्रिक सिग्नल वाढवण्यासाठी किंवा स्विच करण्यासाठी वापरले जाऊ शकत होते. या ट्रांजिस्टरने, मोठे, जड, महाग व्हॅक्युम ट्यूब ची जागा घेतली. याच्याने कम्प्युटर छोटे झाले.

1970 च्या दशकात मायक्रोप्रोसेसर च्या शोधामुळे पर्सनल कम्प्युटर बनवणे शक्य झाले. मायक्रोप्रोसेसर हे सीपीयू आहेत ज्यांना एकत्रित करून एका छोट्या चीप मध्ये टाकले जाते. यामुळे छोटे, स्वस्त, वापरण्यास सोपे कम्प्युटर बनवणे शक्य झाले.

आता तर कृत्रिम बुद्धिमत्ता चा शोध लागल्यामुळे कम्प्युटरमध्ये खूपच बदल झाले आहेत. कम्प्युटर आता काही करू शकतो.

संगणकाचे प्रकार | Types of Computer in Marathi

संगणक त्यांच्या कम्प्युटिंग पावर, स्पीड, आकार आणि त्याच्या वापरा नुसार काही प्रकारांमध्ये विभाजले आहे, ते खालील दिल्याप्रमाणे आहेत:

पर्सनल कम्प्युटर : हे एक सिंगल यूजर कम्प्युटर आहे, ज्यामध्ये कमी शक्तिशाली मायक्रोप्रोसेसर वापरले जाते. या प्रकारचे कम्प्युटर हे घरी, शाळा, कॉलेजेस, इत्यादी जागी वापरले जातात.

वर्क स्टेशन : हे पण एक सिंगल यूजर कम्प्युटर आहे ज्यामध्ये शक्तिशाली मायक्रोप्रोसेसर वापरले जाते. या प्रकारचे कम्प्युटर हे कंपनीमध्ये, बिझनेस मध्ये वापरले जातात.

मिनी कम्प्युटर : लघुसंगणक ही एक मध्यम आकाराची, मल्टी प्रोसेसिंग प्रणाली आहे. मिनी कम्प्युटर एकाच वेळी 250 यूजर्स ना सपोर्ट देण्यास सक्षम आहे. या प्रकारच्या कम्प्युटरमध्ये दोन किंवा अधिक प्रोसेसर असतात.

मेन फ्रेम : एक कम्प्युटर सिस्टम आहे जे मल्टिपल यूजर साठी वापरले जाते. मेन फ्रेम कम्प्युटर हे खूप महाग असतात. कम्प्युटर एका वेळी शंभर ते हजार यूजर ला सपोर्ट देण्यास सक्षम असतात. म्हणून हे मोठ्या टेलिकॉम कंपनीत किंवा बँकिंग सेक्टर मध्ये वापरले जातात.

सुपर कम्प्युटर : सुपर कम्प्युटर हे जगातील सर्वात फास्ट कम्प्युटर्स आहेत. हे कम्प्युटर एवढे फास्ट आहेत की प्रत्येक सेकंदाला ते हजारो लाखो इन्स्ट्रक्शन्स हँडल करू शकतात. सुपर कम्प्युटर वैज्ञानिक कॅल्क्युलेशन, हवामान रिपोर्ट, न्यूक्लिअर एनर्जी रिसर्च अशा मोठमोठ्या कामांसाठी वापरले जातात.

संगणकाच्या भागांची नावे | Name of Parts of Computer in Marathi

संगणक हा तीन भागांमध्ये विभाजलेला आहे. पहिला आहे इनपुट डिवाइस, दुसरा आहे आऊटपुट डिवाइस, आणि तिसरा आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट सीपीयू. हे तिन्ही भागांचे विस्तृत माहिती आपण घेऊया.

इनपुट डिव्हायसेस : यूजर जेव्हा इनपुट इन्स्ट्रक्शन देतो, तेव्हा संगणक त्याचे कार्य सुरू करून आउटपुट रिझल्ट देतो. असेच काही इनपुट डिव्हाइसेस खाली दिल्याप्रमाणे आहेत.

  • कीबोर्ड : कीबोर्ड वर वेगवेगळ्या प्रकारचे बटन असतात जसे की अल्फाबेट्स नंबर्स फंक्शन की इत्यादी. या सर्व बटन वापरून तुम्ही कम्प्युटरवर टायपिंग करू शकता व टाईप करून इन्स्ट्रक्शन देऊ शकता.
  • माऊस : माऊस हा संगणकाच्या ग्राफिकल इंटरफेस वर वापरला जातो. माऊसने फोल्डर ओपन करणे, फाईल ओपन करणे, एप्लीकेशन वर इन्स्ट्रक्शन्स क्लिक करणे, इत्यादी करू शकतो. माऊस ने टाईप न करता फक्त क्लिक करून आपण संगणकाला इनपुट इंस्ट्रक्शन देऊ शकतो.
  • स्कॅनर : स्कॅनर हे संगणकाचा एका प्रकारे इनपुट डिवाइस आहे. स्कॅनर ने आपण डॉक्युमेंट्स स्कॅन करून कम्प्युटरवर स्टोअर करू शकतो. जेव्हा कधी आपण कुठला ऑनलाईन फॉर्म भरत असतो तेव्हा लागणारे डॉक्युमेंट्स, इमेजेस स्कॅन करून अपलोड करू शकतो.
  • वेबकॅम : वेबकॅम ने इमेजेस किंवा व्हिडिओज काढून कम्प्युटरवर सेव्ह करून ठेवू शकतो. ऑनलाइन मीटिंग साठी वेबकॅम खूप उपयोगी पडतो. वेबकॅम द्वारे आपण व्हिडिओ कॉल करून एकमेकांशी संभाषण करू शकतो.
  • मायक्रोफोन : संगणकामध्ये व्हॉइस कमांड किंवा व्हॉइस इन्स्ट्रक्शन मायक्रोफोन द्वारे दिला जाऊ शकतो.

आउटपुट डिव्हायसेस : युजर जेव्हा इनपुट इन्स्ट्रक्शन देतो तेव्हा त्याचा रिझल्ट, आउटपुट डिव्हाइसेस वर दिसतो. खाली काही आउटपुट डिव्हाइसेस ची माहिती दिली आहे.

  • मॉनिटर : जे काही टाईप करतो किंवा इन्स्ट्रक्शन देतो ते सर्व मॉनिटरवर दिसतं. मॉनिटर हा संगणकाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. संगणक हा टीव्ही सारखा दिसतो म्हणजेच डिस्प्ले युनिट आहे.
  • प्रिंटर : प्रिंटर हा संगणकाचा एक आऊटपुट डिवाइस आहे. जे काही मॉनिटरवर दिसतं जसे की इमेजेस, वर्ड डॉक्युमेंट इत्यादी यांची प्रिंट कागदावर प्रिंटर द्वारे घेतली जाते. प्रिंटर हे कलर किंवा ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट करून देतात.
  • स्पीकर : स्पीकर हा एक आऊटपुट डिव्हाइस आहे ज्याच्याने आपल्याला संगणकामधील साऊंड ऐकू येतो.

सेंट्रल प्रोसेसिंग युनिट (CPU) : सेंट्रल प्रोसेसिंग युनिटला संगणकाचा मेंदू म्हटलं जातं, कारण जेवढ्या पण इन्स्ट्रक्शन इनपुट केल्या जातात त्या सीपीयू च्या माध्यमातून पुढे आउटपुट डिवाइस वर दाखवल्या जातात. इनपुट डेटा सीपीयू द्वारे प्रोसेस केला जातो. सीपीयू हा कम्प्युटरचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे, याच्याशिवाय कम्प्युटर चालू शकत नाही. सीपीयू मधील काही भाग खाली दिले आहेत.

  • मदरबोर्ड : मदरबोर्ड एक प्रकारे इंटिग्रेटेड सर्किट बोर्ड आहे, ज्यामध्ये चालवणारे महत्त्वाचे पार्ट्स जसे की प्रोसेसर, रॅम स्लॉट, पावर कनेक्शन इत्यादी असतात. सीपीयू मधील सर्व इतर पार्ट्स मदरबोर्ड द्वारे जोडलेले असतात.
  • रॅम : रॅम चा फुल फॉर्म एक्सेस मेमरी. संगणकाचे हे टेम्पररी मेमरी असते.
  • हार्ड डिस्क : संगणकामध्ये ज्या फाइल्स, इमेजेस, सॉफ्टवेअर, एप्लीकेशन स्टोअर हार्ड डिस्क मध्ये केल्या जातात. हार्ड डिस्क हे कम्प्युटरचे परमनंट स्टोरेज डिवाइस असते.
  • SMPS : SMPS हा संगणकाचा पावर सप्लाय युनिट असतो. संगणकातील सर्व पार्ट्स ला याच्याद्वारे पावर दिली जाते.
  • ग्राफिक कार्ड : ग्राफिक कार्ड हा मदर व बोर्डवर इन्स्टॉल केला जातो, ज्याद्वारे संगणकामध्ये ग्राफिक कॉलिटी वाढवली जाते.
  • लॅन कार्ड : लॅन कार्ड हा मदरबोर्ड सी कनेक्टेड असतो, याच्याद्वारे संगणक इंटरनेट किंवा दुसऱ्या संगणकाशी जोडला जातो.

संगणक कसे कार्य करते? । How Does a Computer Work?

आता तुम्हाला कम्प्युटरच्या पार्टस बद्दल सर्व माहिती भेटलेली आहे, तर आता जाणून घेऊया संगणक कसं कार्य करतो.

  • इनपुट : यूजर द्वारे इनपुट इन्स्ट्रक्शन दिले जातात, कीबोर्ड किंवा माऊस द्वारे.
  • प्रोसेसिंग : सीपीयू युजर्सने दिलेल्या इन्स्ट्रक्शन घेतो आणि त्यांना प्रोसेस करतो. सीपीयू रॅम आणि स्टोरेज मेमरी द्वारे प्रोसेस केलेला डेटा स्टोअर करतो.
  • आउटपुट : सीपीयू प्रोसेस केलेला रिझल्ट आपल्याला आउटपुट डिवाइस द्वारे दाखवतो.

संगणकाचे उपयोग | Uses of Computer in Marathi

संगणकाचा उपयोग सर्व क्षेत्रात केला जातो. असं कुठलाही क्षेत्र नाही जिथे कम्प्युटर वापरला जात नाही. आम्ही खाली काही महत्त्वाचे क्षेत्रांबद्दल सांगत आहोत जिथे संगणकाचा उपयोग केला जातो.

  • आरोग्य विभाग : पेशंट्स चे रेकॉर्डस ठेवणे, इमेजिंग सॉफ्टवेअर, इत्यादीसाठी संगणकाचा उपयोग आरोग्य विभागात होतो.
  • शिक्षण विभाग : सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे रेकॉर्ड ठेवण्यासाठी, ऑनलाईन टीचिंग साठी संगणकाचा उपयोग शिक्षण विभागात होतो.
  • मनोरंजन : ऑनलाइन स्ट्रीमिंग, ऑनलाईन गेमिंग, चित्रपट, संगीत इत्यादीसाठी कम्प्युटरचा मनोरंजनासाठी उपयोग होतो.
  • संशोधन : संशोधनांना मधील कॅल्क्युलेशन्स, एनालिसिस, आउटपुट रिझल्ट, संगणकाच्या द्वारे केला जातो.
  • व्यवसाय : व्यवसायामध्ये स्टाफ चा रेकॉर्ड, स्टॉक इन्व्हेंटरी, ऑनलाईन ऑर्डरिंग सिस्टम, बिजनेस रिपोर्ट इत्यादीसाठी संगणकाचा उपयोग होतो.
  • ऑफिस : ऑफिसेस मध्ये ऑफिसचा रेकॉर्ड स्टोअर करणे, इंटर डिपार्टमेंटल कम्युनिकेशन साठी इत्यादीसाठी संगणकाचा उपयोग होतो.

संगणकाची वैशिष्ट्ये | Features of Computer in Marathi

बघायला गेलं तर संगणकाचे खूप वैशिष्ट्य आहेत, त्यामधील काही वैशिष्ट्ये आम्ही खाली दिलेल्या आहेत.

  • गती
  • ऍक्युरसी
  • परिश्रम
  • विश्वसनीयता
  • मेमरी
  • तार्किक
  • अष्टपैलुत्व
  • ऑटोमेशन
  • कन्सिस्टन्सी
  • स्मरणशक्ती

Conclusion

संगणक हे आपल्या स्मार्ट फ्रेंड्स सारखे असतात जे आपले आयुष्य फास्ट आणि सोपे बनवतात. संगणक हे विसाव्या शतकातील महत्वपूर्ण इन्वेंशन आहे. या लेखात आम्ही तुम्हाला Computer in Marathi संगणकाबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. हे माहिती छोट्यांपासून ते मोठ्यांपर्यंत नक्कीच उपयोगी पडेल.

धन्यवाद!

FAQs

संगणकाची व्याख्या काय आहे?

संगणक हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे जे वापरकर्त्याचे इनपुट प्राप्त करते आणि आपल्याला माहिती देते.

संगणकाचा शोध कोणी लावला ?

संगणकाचा शोध चार्ल्स बॅबेज ने लावला.

कम्प्युटर चा फुल फॉर्म काय आहे? Computer Full form ?

कंप्यूटर चा फुल फॉर्म – C: commonly O: operated M: machine P: particularly U: used for T: technical and E: educational R: research

हे देखील वाचा

संगणकाच्या पिढ्या संपूर्ण माहिती | GENERATION OF COMPUTER IN MARATHI

HOSTING MEANING IN MARATHI | होस्टिंग म्हणजे काय?

SWITCH IN HINDI | स्विच क्या है और यह कैसे कार्य करता है?

Share and Enjoy !

Shares
Similar Posts

2 Comments

  1. […] संगणक म्हणजे काय? संपूर्ण माहिती | Computer in… […]

Leave a Reply