घरी बसल्या ऑनलाइन पैसे कमवा / Make Money Online from Home Information in Marathi.
मित्रांनो आज आपण ऑनलाइन ने पैसे कमवायचे मार्ग मराठी | How to Earn Money Online in Marathi या बद्दल जाणून घेणार आहोत.आपल्या सर्वाना घरी बसल्या ऑनलाईन पैसे कमवायची इच्छा असतेच. यासाठी कधी ना कधी इंटरनेट वर या बद्दल आपण सर्च केला असेल कि ऑनलाईन ने कुठकुठल्या मार्गाने पैसे कमवता येतील. म्हणून या पोस्ट मध्ये आम्ही ऑनलाईन पैसे कशे कमवायचे या गोष्टी बद्दल माहिती घेऊन आलो आहोत. तुम्ही कुठल्या हि क्षेत्रात काम करत असाल किंवा विध्यार्थी असाल किंवा गृहणी असाल, थोडा वेळ काढून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पैसे कमवू शकता.
Google किंवा Youtube वर सर्च करून या बद्दल माहिती घेऊ शकता, या ऑनलाईन पद्धतीच्या कामांसाठी जास्त High Skills किंवा High टेक्निकल knowledge ची गरज लागत नाही. तरीही खालील पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला Earn Money Online चे उत्कृष्ट मार्ग सांगणार आहोत.
Table of Contents
Best Ways to Earn Money Online for Students
1. फ्रिलांसींग FreeLancing
FreeLancing हा सर्वात पहिला पर्याय आहे, जेव्हा जो कोणी ऑनलाइन काम करण्याबद्दल बोलतो, तेव्हा आपल्या मनात येतो आणि त्याचे कारण पण अगदी स्पष्ट आहे,कारण फ्रीलान्सिंग Earn Money Online ची खूप यशस्वी पद्धत आहे. फ्रीलान्सिंग म्हणजे ज्या लोकांना त्यांच्या समस्या skills आणि expertise अभावी सोडवता येत नाही, त्या लोकांना तुमचे कौशल्य आणि Expertise प्रदान करणे. ही कौशल्ये काहीही असू शकतात, ती सामग्री लेखन, संपादन, वेब डिज़ाइनिंग किंवा कॉपीरायटिंग असू शकते. या सर्व कौशल्यांचा वापर करून, तुम्ही अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ग्राहक बनवू शकता आणि भारतात सहजतेने ऑनलाइन पैसे कमवू शकता.
Freelancing द्वारे पैसे कमावण्याचे स्टेप्स
- तुमच्याकडे असलेली कौशल्ये आणि सेवा देण्यासाठी तुमची इच्छा ओळखा.
- तुमच्या स्किल्स चा सराव करा आणि व्यावसायिक पोर्टफोलिओ तयार करा.
- Freelancer.com, UpWork, Fiverrr इत्यादी फ्रीलान्सिंग साइट्सवर स्वतःची नोंदणी करा.
- तुमच्या कौशल्यांशी जुळणारे आणि योग्य पैसे देणारे फ्रीलान्सिंग गिग शोधा.
- तुमचा दर Quote करा आणि ग्राहकाकडून काम घ्या.
- पूर्ण झाल्यावर, काम सबमिट करा आणि पैसे मिळवा.
2. ब्लॉगिंग । Blogging
घर बसल्या पैसे कमावण्याचा अजून एक प्रभावी मार्ग म्हणजे ब्लॉगिंग. जर तुम्हाला लेखनाची आवड असेल, तर ब्लॉगिंग ने तुम्ही पैसे कमवू शकता. ब्लॉगिंग तुम्ही अर्धवेळ किंवा पूर्णवेळ हि करु शकता. काही लोकांनी ब्लॉगिंग ला करीयर बनवून,त्या द्वारे लाखो रुपये कमवत आहेत. ब्लॉगिंग साठी तुम्हाला घरा बाहेर जाण्याची गरज नाही, घरीबसल्या संगणक किंवा मोबाईल द्वारे तुम्ही ब्लॉगिंग सुरु करू शकता.
कुठल्यातरी खूप जास्त सर्च केल्या गेलेल्या विषयवार ब्लॉग लिहून, तुम्ही तुमच्या ब्लॉग वर ट्रॅफिक आणून, गुगल ऍडसेन्स द्वारे पैसे कमवू शकता.
Blogging द्वारे पैसे कमावण्याचे स्टेप्स
- प्रथमतः तुम्हाला ब्लॉगिंग साठी प्लॅटफॉर्म निवडावं लागेल, Free किंवा Paid Platform उपलब्द आहेत
- Free प्लॅटफॉर्म मध्ये Blogger.com आहे, यावर रजिस्टर करून , इथे तुम्ही ब्लॉग लिहू शकता.
- Paid प्लॅटफॉर्म मध्ये WordPress.com आहे, या साठी तुम्हाला डोमेन नेम आणि वेब होस्टिंग विकत घेणे अनिर्वाय आहे, वर्डप्रेस वर वेबसाईट बनवून, तिथे तुम्ही ब्लॉग लिहणे सुरु करू शकता.
- एकदा कि तुमचा ब्लॉग प्रसिद्ध झालं, मग त्याच्यावर ऍडसेन्स लावून पैसे कमवू शकता.
टिप :- ब्लॉग सुरु करून, एका रात्रीत यश मिळत नाही, त्यासाठी तुम्हाला खूप मेहनत आणि संयम ची गरज लागते.
>>MONEY MAKING यशस्वी ब्लॉग कसा सुरू करायचा
3. Youtube चॅनेल सुरु करा
तुम्हाला जर विडिओ कन्टेन्ट बनवण्याची आवड असेल, तर Youtube हा तुमच्यासाठी ऑनलाईन पैसे कमवण्याचा उत्तम मार्ग आहे. YouTube चॅनेलद्वारे ऑनलाइन पैसे कमविण्याचे अनेक मार्ग आहेत. तुमच्या व्हिडिओंमध्ये AdSense जाहिराती लावून तुम्ही पैसे कमवू शकता. प्रत्येक वेळी कोणीतरी तुमच्या जाहिरातीवर क्लिक करेल तेव्हा तुम्हाला पैसे भेटतात.
तुम्ही तुमच्या व्हिडिओंमध्ये काही उत्पादने परिधान करून किंवा वापरून YouTube वर तुमच्या व्हिडिओंमध्ये उत्पादनांची जाहिरात करू शकता. लोक तुमच्या स्टोअरला भेट देण्यासाठी आणि तुमच्या आयटमची खरेदी करण्यासाठी तुमच्या ऑनलाइन स्टोअरची लिंक जोडा किंवा कंपनीच्या उत्पादनांचा प्रचार करण्यासाठी त्या कंपन्यांशी करार करा.
तुमच्या YouTube चॅनेलवर पैसे कमवण्याचा दुसरा मार्ग म्हणजे Sponsered Content तयार करणे. अशा प्रकारे, तुम्ही ब्रँडेड उत्पादनांचे समर्थन करून किंवा कन्टेन्ट मार्केटिंग व्हिडिओ तयार करून नफा कमवू शकता.
Youtube द्वारे पैसे कमावण्याचे स्टेप्स
- तुम्हाला Youtube.com वर साइन अप करून, अकाउंट बनवणे.
- मग तुम्ही तुमच्या युट्युब चॅनेल वर विडिओ अपलोड करू शकता.
- एकदा कि तुमच्या चॅनेल चे स्बस्क्राइबर वाढले, म्हणजेच चॅनेलवर 4000 तास Watch Time आणि 1000 Subscriber झाले कि मग तुम्ही चॅनेल मॉनिटाईझ करून पैसे कमवू शकता.
>>युट्युब चॅनेल कसे सुरु करायचे । HOW TO START YOUTUBE CHANNEL IN MARATHI
>>सर्वोत्तम टिप्स युट्युब वरून पैसे कमावण्याचे । BEST TIPS TO EARN MONEY FROM YOUTUBE IN MARATHI
4. Affiliate marketing
अफिलिएट मार्केटिंग म्हणजे एखाद्या कंपनीचे प्रॉडक्ट विकून त्याबदल्यात काही कमिशन मिळवणे. आपण वेबसाईट किंवा सोशल मीडिया द्वारे लोकांना प्रॉडक्ट घेण्यास आवाहन करू शकतो , जर त्यांनी जर तो प्रोडक्ट विकन घेतला, तर आपल्याला त्या प्रॉडक्ट च्या विक्री मधला कमिशन भेटतो.
बाजारामध्ये खूप मोठमोठ्या कंपन्यांचे Affiliate Program आहेत, ते जॉईन करून , तुम्ही त्यांच्या वस्तूंची अफिलिएट मार्केटिंग करू शकता.
Affiliate marketing द्वारे पैसे कमावण्याचे स्टेप्स
- प्रथमतः तुम्हाला कुठल्यातरी कंपनीचा अफिलिएट प्रोग्रॅम जॉईन करावा लागेल. बाजारात खूप अश्या कंपन्या आहेत जश्या Amazon , FlipKart , Snapdeal , Hostinger इत्यादी .
- यानंतर तुम्हाला वेबसाईट किंवा सोशल मीडिया द्वारे त्यांच्या प्रोडक्टस ची मार्केटिंग करण्यास सुरुवात करायची.
- त्या प्रोडक्ट बरोबर अफिलिएट लिंक असेल, त्या लिंक वर क्लिक करून, जर कोणी तो प्रोडक्ट विकत घेतला तर आपल्याला कमिशन भेटेल. अशाप्रकारे तुम्ही Affiliate marketing द्वारे पैसे कमवू शकता.
5. Earn Money Online – Instagram इंस्टाग्राम
ऑनलाईन पैसे कमावण्याचा इंस्टाग्राम हा चांगला पर्याय असू शकतो. तुम्ही फोटो टाकून किंवा रिल्स बनवून पैसे कमवू शकता. तुम्ही विचारात पडले असाल कि फोटो किंवा रिल्स टाकून कसे पैसे भेटतील, तर ते असे आहे कि तुम्हला पैसे तेव्हाच भेटतील जर तुमचे इंस्टाग्राम फॉलोवर्स दहा हजार ते वीस हजार असतील.
तुमचे इंस्टाग्राम फॉलोवर्स बघून बाजारातील कंपन्या तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील , आणि त्यांच्या प्रोडक्ट चे फोटो किंवा रिल्स बनवून, तुमच्या अकाउंट मधून शेअर करण्यास सांगतील. हे करण्याचे त्या कंपन्या तुम्हाला पैसे देतील. अशा प्रकारे तुम्ही इंस्टाग्राम ने पैसे कमवू शकता.
6. Online Course विकणे
आपल्या भारतात ऑनलाइन पैसे कमविण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे ऑनलाइन कोर्स तयार करणे आणि विकणे. तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात, किंवा विषयात प्राविण्य असल्यास किंवा कोणतेही सॉफ्टवेअर कसे वापरायचे हे माहित असल्यास, तुम्ही ऑनलाइन कोर्स तयार करून इतरांना मदत करू शकता. या बदल्यात तुम्हाला आर्थिक निधी मिळेल, कारण तुम्ही तुमचे अभ्यासक्रम विकू शकता आणि उत्तम उत्पन्न मिळवू शकता. ऑनलाइन पैसे कमविण्याची ही पद्धत विशेषतः उद्योग तज्ञ, प्राध्यापक आणि अनुभवी कार्यरत व्यावसायिकांसाठी सर्वोत्तम आहे. हे लोक कोर्स तयार करू शकतात आणि तो एकदा अपलोड करू शकतात आणि प्रत्येक वेळी कोणीतरी त्यांचा कोर्स विकत घेतल्यानंतर उत्पन्न मिळवू शकतात.
Online Course द्वारे पैसे कमावण्याचे स्टेप्स
- तुम्हाला ज्या विषयावर कोर्स करायचा आहे तो विषय निवडा
- तुम्हाला विडिओ रेकॉर्डिंग साठी कॅमेरा आणि साउंड सिस्टम लागेल , ती तयार ठेवा.
- कोर्सचे व्हिडिओ रेकॉर्ड करणे सुरू करा आणि कोर्ससाठी शिकण्याचे साहित्य तयार करा.
- तुमच्या कोर्सचा प्रचार सोशल मीडिया द्वारे सुरू करा
- तुमचा कोर्स तुमच्या आवडीच्या कोर्स सेलिंग प्लॅटफॉर्मवर ठेवा म्हणजे; Coursera, Udemy इ. आणि प्रत्येक विक्रीनंतर कमाई होईल.
7. मोबाईल अँप डेव्हलपमेंट Mobile App Development
आजकाल सर्व गोष्टींसाठी मार्केट मध्ये अँप आहेत , जसे Online शॉपिंग, Online फूड अँप , Online क्लास , Online गेमिंग ई. तुमच्याकडे जर सॉफ्टवेअर प्रोग्रँमिंग आणि कोडिंगचे चांगले नाँलेज असेल तर अँड्राईड अँप किंवा IOS अँप तयार करून, तुम्ही अँप डेव्हलपमेंटदवारे चांगली कमाई करू शकतात.
मार्केट मध्ये अश्या खूप कंपन्या आहेत ज्यांना त्यांचा प्रॉडक्ट सेल करण्यासाठी e-कॉमर्स अँप ची गरज असते , त्यांना तुम्ही अँप बनवून subscription बेस वर किंवा डायरेक्ट अँप सेल करू शकता. यातून तुम्हाला मोठी रक्कम भेटू शकते.
तुम्ही वेगवेगळे अँप बनवून Google Play Store वर टाकू शकता. तुम्ही ते अँप वर monthly / Yearly Subscription ठेवू शकता. तुम्ही तुमच्या अँप वर Google Adsense लावून जाहिरातीद्वारे पण पैसे कमवू शकता.
अशाप्रकारे तुम्ही मोबाईल अँप डेव्हलोपमेंट द्वारे घरी बसून पैसे कमवू शकता.
8. ऑनलाईन टिचिंग / कलासेस
तुम्ही अभ्यासात हुशार असाल किंवा कुठल्यातरी विषयात तुम्हाला खूप ज्ञान असेल, तुम्ही ज्या विषयात एक्स्पर्ट असाल , त्या विषयाचा तुम्ही ऑनलाईन क्लास सुरु करू शकता. तुम्ही शालेय तसेच महाविद्यालयीन विदयार्थ्यांना कॉन्टॅक्ट करून, त्यांना आँनलाईन टिच करू शकतो. तुम्ही त्यांच्या कडून फी घेऊन , घरी बसल्या कमाई करू शकता.
आजकाल ऑनलाईन टिचिंग खूप प्रसिद्ध होत चालले आहे. ऑनलाईन टिचिंग करणारे अँप पण आहेत, त्यांना तम्ही कॉन्टॅक्ट करून, तुमचा एखाद्या विषयाचा क्लास त्याच्यवर तुम्ही शिकवू शकता.
9. Online ट्रेडिंग आणि गुंतवणुक
तुम्हाला शेअर मार्केट चा चांगला ज्ञान असेल तर ट्रेडिंग तसेच शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक हा देखील आज आँनलाईन कमाईचा एक उत्तम ऑप्शन बनला आहे. तुम्हाला ट्रेडिंग येत नसेल तर ते शिकून ,तुम्ही ऑनलाईन करून पैसे कमवू शकता.
यात तुम्ही शॉर्ट टर्म किंवा लॉन्ग टर्म साठी गुंतवणुक करून काही काळाने एक चांगली रक्कम रिटर्न मध्ये मिळवू शकतो. ट्रेडिंग मध्ये थोडी रिस्क देखील असते. म्हणून शेअर मार्केट चा पूर्ण knowledge झाल्यावर तुम्ही यातून अफाट पैसे कामू शकता.
मार्केट मध्ये खूप ट्रेडिंग अँप आहेत जसे Upstox, Zerodha , AngelOne इ. यांच्यावर रजिस्टर करून, त्तुम्ही इथे ऑनलाईन ट्रेडिंग सुरु करू शकता.
10. वेब डेव्हलपमेंट
तुम्ही जर वेब डेव्हलपर असाल तर तुम्ही वेब डेव्हलपमेंट ची कामे घरी बसल्या ऑनलाईन ने करू शकता. तुम्ही कलाईन्ट ला नवीन वेबसाईट बनवून देऊ शकता , कोणाला आपल्या वेबसाईट मध्ये चेंजेस करायचे असल्यास ते पण तुम्ही घरी बसल्या त्यांना करून देऊ शकता.
अशा प्रकारे तुम्ही Online वेब डिज़ाइनिंग किंवा डेव्हलोपमेंट करून खूप पैसे कमवू शकता.
ऑनलाईन पैसे कमावण्याचे फायदे । Benefits of Earning Money Online
वर्क फ्लेक्सिबलिटी : तुम्ही आपल्या इच्छेनुसार कुठल्याहि वेळेला काम करू शकता.
काम आणि जीवनामध्ये संतुलन : तुम्ही ऑनलाईन काम केल्यामुळे, तुम्हाला घरासाठी पण चांगला वेळ देता येऊ.
अमर्याद कमाईची क्षमता : तुम्ही जर नीट मेहनत घेतली तर ऑनलाईन पद्धतीने अमर्यादित पैसे कमवू शकता.
Conclusion
अशाप्रकारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने खूप पैसे कमवू शकता आणि तुमचे जीवन चांगल्या प्रकारे जगू शकता. आम्ही अशा करतो कि How to Earn Money Online in Marathi हि पोस्ट तुम्हाला आवडली असेल .
धन्यवाद !
FAQs
विद्यार्थ्यांसाठी गुंतवणूक न करता ऑनलाइन पैसे कसे कमवायचे? How to earn money online without investment for students?
विद्यार्थ्यांसाठी गुंतवणूक न करता ऑनलाइन पैसे कसे कमवायचे खूप पद्धती आहे जश्या ब्लॉगिंग, फ्रिलांसींग , इंस्टाग्राम, युट्युब , अफिलिएट मार्केटिंग, ऑनलाईन कोर्से.
मी ऑनलाइन पैसे कमवू शकतो का?
हो, तुम्ही ऑनलाइन पैसे कमवू शकता . खरं तर, ऑनलाइन पैसे कमविणे हा अतिरिक्त उत्पन्न मिळविण्याचा किंवा Full Time जीवन जगण्याचा एक उत्तम लोकप्रिय मार्ग आहे.
[…] ऑनलाइन ने पैसे कमवायचे मार्ग मराठी | How t… […]