मित्रांनो, आज आपण Share Market Information in Marathi | Share Market Mahiti Marathi बद्दल संपुर्ण माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या सर्वाना शेअर मार्केट बद्दल माहिती जाणून घेण्याची उत्सुकता असते. शेअर मार्केट मराठी माहिती तुमच्या कडे असेल तर, हे तुमचं पैसे कमवण्याचे चांगले साधन बानू शकते. आताच्या काळात एकपेक्षा जास्त इन्कम सोर्स असणे गरजेचे आहे, त्यासाठी तुम्ही Share Market मध्ये गुंतवणूक करून, एक इन्कम सोर्स वाढवू शकता.
म्हणूनच आम्ही Share Market Mhanje kay | Shear Market in Marathi | Share Market Book in Marathi PDF Download या लेखात शेअर मार्केट म्हणजे काय, शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी, learn share market in marathi, शेअर मार्केट मराठी पुस्तक pdf शेअर मार्केट चे प्रकार, शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे फायदे, अशी संपूर्ण माहिती दिली आहे.
Table of Contents
शेअर मार्केट म्हणजे काय ? Share Market Information in Marathi
शेअर मार्केट Share Market, ज्याला स्टॉक मार्केट किंवा इक्विटी मार्केट देखील म्हटले जाते, हे एक व्यासपीठ आहे जेथे खरेदीदार आणि विक्रेते सार्वजनिकरित्या सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्सचा व्यापार करू शकतात. शेअर्स चा अर्थ म्हणजे ‘भाग’ आणि जेव्हा तुम्ही कुठल्या कंपनीचे शेअर खरेदी करता तेव्हा तुम्ही त्या कंपनीचे शेअरहोल्डर बनता म्हणजेच त्या कंपनीचे भागीदार होता. शेअरहोल्डर म्हणून, तुम्ही कंपनीच्या नफा आणि मालमत्तेच्या काही भागासाठी पात्र होता.
सोप्या भाषेत समजूया, जर कुठल्या कंपीनीकडे 1000 शेअर्स असतील, आणि तुम्ही त्या कंपनीचा 10 शेअर खरेदी करता, तर तुम्ही त्या कंपनी मध्ये तुम्ही 1% चे भागीदार बनता. जेव्हा हि कंपनी नफा कमावते, तेव्हा त्यांच्या शेअर्स ची किंमत वाढते आणि त्यावेळी तुम्ही जर तुम्ही विकत घेतलेले शेअर्स विकले तर तुम्ही चांगला नफा कमवू शकता.
शेअर बाजार हा अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे, कारण ते कंपन्यांना त्यांच्या वाढीसाठी आणि विस्तारासाठी निधी उभारण्यासाठी एक प्लॅटफॉर्म आहे. हे गुंतवणूकदारांना अर्थव्यवस्थेच्या वाढीमध्ये सहभागी होण्याचा आणि त्यांच्या गुंतवणुकीवर परतावा मिळविण्याचा एक फायदेशीर मार्ग आहे.
हे देखील वाचा डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ? | DIGITAL MARKETING IN MARATHI 2023
शेअर मार्केट कसे काम करते? | Share Market Basic Knowledge in Marathi
सर्वात आधी Share Market Information in Marathi बद्दल अजून थोडी माहिती घेऊया. शेअर मार्केट म्हणजेच स्टॉक मार्केट मध्ये शेअर खरेदी किंवा विक्री करण्याचा काम Stock Exchange द्वारे केला जातो. आपल्या भारतात दोन Stock Exchange मार्केट आहेत,
BSE (Bombay Stock Exchange)
NSE (National Stock Exchange)
BSE चा इंडेक्स Sensex आहे आणि या मध्ये भारतातील 30 सुस्थापित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम कंपन्या असतात. NSE चा इंडेक्स Nifty आहे आणि या मध्ये भारतातील 50 सुस्थापित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम कंपन्या असतात.
शेअर मार्केट मधून तुम्ही डायरेक्ट्ली शेअर खरेदी किंवा विक्री करू शकत नाही, तुम्हाला हा व्यवहार स्टॉक ब्रोकर (शेअरची खरेदी विक्री करणारा एजन्ट) च्या माध्यमातूनच करू शकता. स्टॉक ब्रोकर हे स्टॉक एक्सचेंज चे सदस्य असतात, म्हणूनच हे ब्रोकरच स्टॉक एक्सचेंज मधून शेअरची विक्री किंवा खरेदी करू शकतात. स्टॉक ब्रोकर त्यांचा कमिशन काढून, आपल्या शेअरच्या खरेदी-विक्री चे काम करतात.
शेअर मार्केट ही एक जटिल प्रणाली आहे, परंतु मूलभूत तत्त्व सोपे आहे: शेअर्सचे खरेदीदार आणि विक्रेते ब्रोकर्सद्वारे ऑर्डर देतात, जे नंतर ऑर्डर एकत्र करतात. शेअरची किंमत मागणी आणि पुरवठा यानुसार ठरते. विक्रेत्यांपेक्षा अधिक खरेदीदार असल्यास, शेअरची किंमत वाढेल. याउलट, खरेदीदारांपेक्षा अधिक विक्रेते असल्यास, शेअरची किंमत खाली जाईल.
शेअर्स विक्री व खरेदी करण्याचे काम, दोन्ही ऑफलाइन किंवा ऑनलाईन पद्धतीने केला जाऊ शकतो.
शेअर मार्केटचे प्रकार । Types of Share Market in Marathi
शेअर मार्केटचे दोन मुख्य प्रकार आहेत: प्राथमिक आणि दुय्यम. प्राथमिक बाजार म्हणजे जेथे नवीन शेअर्स Issue केले जातात आणि दुय्यम बाजार हे आहे जेथे विद्यमान शेअर्सचे व्यवहार केले जातात.
- प्राथमिक बाजार म्हणजे जिथे कंपन्या प्रथमच लोकांना शेअर्स विकून भांडवल उभारतात. याला प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) म्हणून देखील ओळखले जाते.
- दुय्यम बाजार हे आहे जेथे गुंतवणूकदार एकमेकांकडून शेअर्स खरेदी आणि विक्री करतात. या ठिकाणी सर्वाधिक शेअर ट्रेडिंग होते.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्या अगोदर लागणाऱ्या महत्वाच्या गोष्टी
शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी लागणारी महत्वाची गोष्ट म्हणजे ‘पैसा’, पण पैसे व्यतिरिक्त काही महत्वाच्या गोष्टी लागतात, त्या आपण जाणून घेऊया.
- तुमचा बँक मध्ये बचत खाता असणे गरजेचं आहे. (Bank Savings account)
- शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करण्यासाठी डिमॅट खाते असणे गरजेचं आहे. (Trading and Demat account)
- शेअर मार्केट मध्ये तुम्ही गुंतवणूक ऑफलाईन आणि ऑनलाईन करू शकता. ऑनलाईन साठी तुमच्याकडे संगणक, लॅपटॉप, मोबाइल असणे गरजेचं आहे.
- ऑनलाईन साठी अजून आवश्यक गोष्ट म्हणजे इंटरनेट कनेक्शन असायला पाहिजे.
शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करण्यासाठी लागणाऱ्या डिमॅट खाते उघडण्यासाठी, खालील कागदपत्रे गरजेचे आहेत.
- पॅन कार्ड | PAN Card (Identity Proof)
- आधार कार्ड (अॅड्रेस प्रूफसाठी) | Aadhar card (Address Proof)
- रद्द केलेला चेक, बँक स्टेटमेंट, पासबुक | Canceled cheque, Bank Statement, Bank Passbook
- पासपोर्ट साईझ फोटो
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी । How to invest in the Share Market Information in Marathi
जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला काही गोष्टी करणे आवश्यक आहे:
- शेअर ट्रेडिंग खाते उघडा: तुम्ही ब्रोकरकडे शेअर ट्रेडिंग खाते उघडू शकता, जसे की बँक किंवा वित्तीय संस्था.
- तुमचे संशोधन करा: तुम्ही कोणत्याही कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी, तुम्हाला तुमचे संशोधन करणे आवश्यक आहे आणि तुम्हाला कंपनीचे व्यवसाय मॉडेल आणि तिची आर्थिक स्थिती समजून घेणे आवश्यक आहे.
- छोट्या रकमेपासून सुरुवात करा: तुम्ही गमावू शकता त्यापेक्षा जास्त पैसे गुंतवू नका.
- तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणा: तुमची जोखीम कमी करण्यासाठी विविध क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करा.
- धीर धरा: शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही दीर्घकालीन गुंतवणूक आहे, त्यामुळे धीर धरा आणि लवकर श्रीमंत होण्याची अपेक्षा करू नका.
वर दिलेली प्रोसेस तुम्ही ऑफलाईन किंवा ऑनलाईन वापरू शकता. ऑफलाईन प्रोसेस मध्ये तुम्हाला स्वतः शेअर ब्रोकरच्या ऑफिस मध्ये जावं लागते. तिथे ब्रोकर तुम्हाला अकाउंट उघडून देईल आणि तुम्हाला शेअर्स मध्ये ट्रेडिंग करायला मदत करेल.
ऑनलाईन प्रोसेस मध्ये तुम्ही वेबसाईट किंवा मोबाईल अँप द्वारे ट्रेडिंग करू शकता. बाजारामध्ये खूप वेबसाईट्स आहेत, ज्यांच्या द्वारे तुम्ही ट्रेडिंग करू शकता. वेबसाईट्स जशा,
- https://www.investing.com
- https://economictimes.indiatimes.com
- https://www.moneycontrol.com
भारतीय बाजारामध्ये अनेक मोबाईल अँप आहेत, ज्यांच्या द्वारे तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करू शकता, जसे zerodha, upstox, Groww, angel One. या अँप द्वारे शेअर बाजारात तुमचा अकाउंट ओपन केला जातॊ, नंतर बाकीची प्रोसेस सेम आहे.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे फायदे । The Benefits of investing in the share market
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक संभाव्य फायदे आहेत. यात समाविष्ट:
- उच्च परताव्याची क्षमता: शेअर बाजारात गुंतवणूक करून तुम्ही मोठी रक्कम कमवू शकता.
- तुमच्या पोर्टफोलिओमध्ये वैविध्य आणण्याची क्षमता: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये वैविध्य आणण्यास आणि तुमची जोखीम कमी करण्यास मदत होऊ शकते.
- डिविडेंड चा परतावा : अनेक कंपन्या त्यांच्या भागधारकांना डिविडेंड देतात, ज्यामुळे तुम्हाला नियमित उत्पन्नाचा प्रवाह मिळू शकतो.
शेअर मार्केटमधील गुंतवणुकीचे धोके । Risks of investing in the share market
शेअर मार्केटमधील गुंतवणुकीशी संबंधित अनेक धोके देखील आहेत. यात समाविष्ट:
- नुकसान होण्याची शक्यता: शेअर मार्केट अस्थिर आहे आणि तुम्ही पैसे कमवाल याची कोणतीही हमी नाही.
- कंपनीच्या अपयशाचा धोका: एखादी कंपनी दिवाळखोर झाल्यास, तुम्ही तुमची संपूर्ण गुंतवणूक गमावू शकता.
- फसवणुकीचा धोका: शेअर मार्केटमध्ये फसवणुकीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत, त्यामुळे कोणत्याही कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमचे संशोधन करणे महत्त्वाचे आहे.
शेअर बाजारा मधील ट्रेडिंग चे प्रकार – Types of Trading in Share Market Information in Marathi
शेअर बाजारा मधील ट्रेडिंग चे प्रकार त्यांच्या ट्रेडिंग करण्याच्या पद्धतीनुसार खाली दिले आहेत:
इंट्रा डे ट्रेडिंग (Intraday Trading in marathi)
इंट्रा डे ट्रेडिंग हा ट्रेडिंग चा एक प्रकार आहे ज्या मध्ये ज्या दिवशी शेअर खरेदी केला असतो, त्याच दिवशी मार्केट बंद होईपर्यंत ते विकून दिले जातात.
स्कॅल्पर ट्रेडिंग (Scalper Trading)
स्कॅलपर ट्रेडिंग हा ट्रेडिंग चा एक प्रकार आहे ज्या मध्ये शेअर खरेदी केल्याच्या 5-10 मिनिटांच्या आत विकून टाकले जातात. शेअर बाजारा मधील हा प्रकार सर्वात जोखमीचा प्रकार आहे.
स्विंग ट्रेडिंग (Swing trading)/ शॉर्ट टर्म ट्रेडिंग(Short Term)
स्विंग ट्रेडिंग हा ट्रेडिंग चा एक प्रकार आहे ज्या मध्ये शेअर विकत घेऊन त्यांची डिलिव्हरी आपल्या अकाउंट मध्ये करून घेतली जाते. मग काही कालावधी शेअर्सची किंमत वाढीची वाट बघत, शेअर्स आपल्या अकाउंट मध्ये ठेवले जातात आणि शेअरची योग्य किंमत आल्यास Stocks विकून नफा मिळवला जातो. हा प्रकार खूप सुरक्षित आहे.
लाँग टर्म ट्रेडिंग (Long term trading)
टेडिंग च्या या प्रकारात, शेअर्स विकत घेऊन जास्त काळापर्यंत आपल्या जवळ ठेवले जातात. यात गुंतवणूकदार सहा महिन्यांपासून ते दहा वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी साठी शेअर आपल्या अकाउंट मध्ये ठेवले जातात. Long term trading मध्ये जोखीम अतिशय कमी असते.
Share Market information in Marathi pdf
Conclusion
शेअर मार्केट हा तुमची संपत्ती वाढवण्याचा एक उत्तम मार्ग असू शकतो, परंतु तुम्ही गुंतवणूक करण्यापूर्वी त्यातील जोखीम समजून घेणे महत्त्वाचे आहे. तुमचे संशोधन करून आणि तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणून तुम्ही तुमची जोखीम कमी करू शकता आणि तुमच्या यशाची शक्यता वाढवू शकता.
आम्हाला आशा आहे कि शेअर मार्केट म्हणजे काय, Share Market Information in Marathi हि पोस्ट आवडली असेल. या लेख वाचल्यानंतर तुमच्या Share market बद्दल च्या सर्व शंका दूर झाल्या असतील.
धन्यवाद !
Share Market information in Marathi Videos
FAQs
शेअर मार्केटमध्ये ब्रोकरची भूमिका काय आहे?
स्टॉक ब्रोकर हे स्टॉक एक्सचेंज चे सदस्य असतात, हे स्टॉक एक्सचेंज मधून शेअरची विक्री किंवा खरेदी करू शकतात.
सेबी म्हणजे काय? What is SEBI?
सेबी म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. SEBI चा मूलभूत उद्दिष्ट निवेशक स्वारस्य संरक्षित करणे, शेअर मार्केट विकसित करणे आणि त्याचे काम रेग्युलेट करणे आहे.
शेअर मार्केटमध्ये किमान इन्व्हेस्टमेंट किती करायची असते?
तुम्ही कुठल्याही कंपनीचा 1 शेअर सुद्धा खरेदी करू शकता म्हणून कोणत्याही किमान इन्व्हेस्टमेंटची गरज नाही.
शेअर कसे खरेदी करावे?
शेअर मार्केट मधून तुम्ही डायरेक्ट्ली शेअर खरेदी किंवा विक्री करू शकत नाही, तुम्हाला हा व्यवहार स्टॉक ब्रोकर (शेअरची खरेदी विक्री करणारा एजन्ट) च्या माध्यमातूनच करू शकता. स्टॉक ब्रोकर हे स्टॉक एक्सचेंज चे सदस्य असतात, म्हणूनच हे ब्रोकरच स्टॉक एक्सचेंज मधून शेअरची विक्री किंवा खरेदी करू शकतात. स्टॉक ब्रोकर त्यांचा कमिशन काढून, आपल्या शेअरच्या खरेदी-विक्री चे काम करतात.
हे देखील वाचा AFFILIATE MARKETING SE PAISE KAISE KAMAYE (रु.50000 से रु.100000 महीना) एफिलियेट मार्केटिंग से पैसे कैसे कमाए
[…] […]
[…] […]
[…] […]
[…] […]
[…] […]