what is google adsense in marathi

आज आपण गुगल ऍडसेन्स म्हणजे काय ? What is Google Adsense in Marathi? जाणून घेण्याचा प्रयत्न करू या. जगात खूप सारे ब्लॉगर आहेत. काही ब्लॉगर्स आपला लिहिण्याचं छंद जोपासण्यासाठी ब्लॉगिंग करतात, तर काही आपल्या ब्लॉग ने पैसे कमवण्यासाठी ब्लॉग लिहितात. पण ब्लॉग ने पैसे कसे कमवायचे , हे खूप जणांना माहित नसते. म्हणून आज आम्ही तुम्हाला ब्लॉग ने पैसे कमवण्याचा चांगला आणि महत्वाचा मार्ग सांगणार आहोत. Google Adsense हा ब्लॉग किंवा वेबसाईट ने पैसे कमवण्याचा सर्वात लोकप्रिय मार्ग आहे.

या ब्लॉग पोस्ट मध्ये आम्ही Google AdSense म्हणजे काय? गूगल ऍडसेन्स मधून पैसे कसे कमवायचे या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया मराठीतून . 

गूगल ऍडसेन्स बद्दल संपूर्ण माहिती | What is Google AdSense in Marathi?

Google AdSense हा एक Advertising प्लॅटफॉर्म आहे, जो ब्लॉगर्स ना त्यांच्या ब्लॉग किंवा वेबसाईट वर Google जाहिराती प्रदर्शित करून पैसे कमविण्याची परवानगी देतो.

जगातील विविध व्यापारी आपला बिजिनेस ची जहिरात करण्यासाठी ऍडसेन्स ला पैसे देतात. आपल्या ब्लॉग च्या ट्रॅफिक नुसार गूगल आपल्या ब्लॉग वर जाहिरात दाखवत असतो. जेव्हा आपल्या ब्लॉग किंवा वेबसाइट वरील व्हिसिटर्स त्या ऍड ला क्लिक करतात, त्यानुसार तुम्हाला पैसे भेटतात.

Google Ads आपल्या ब्लॉग किंवा वेबसाइट वर अश्याप्रकारे दिसतात .

Google Adsense Ads

गूगल ऍडसेन्स कसे कार्य करते? How Does Google AdSense Work?

गुगल ऍडसेन्स खालील दिलेल्या स्टेप्स नुसार कार्य करतो

गूगल ऍडसेन्स वर अकाउंट बनवणे

तुमची वेबसाईट तयार झाल्यावर , तुम्हाला जर त्यावर गूगल Ads धाकवायचा असतील तर , प्रथमतः तुम्हाला Google Adsense वर अकाउंट बनवायला लागतो. ते बनवल्यावर Google आपली वेबसाईट ला Review करतो , जर सर्व काही आपल्या वेबसाईट वर Google च्या पोलिसी नुसार असेल तर आल्याला Approval भेटतो.

त्यानंतर तुम्हाला एक कोड दिला जातो, तो कोड वेबसाईट मध्ये Add करून , तुम्ही तुमच्या वेबसाईट वर व्हिसिटर्स ला जाहिराती दाखवू शकता.

जाहिरातदार व लिलाव

एकदा तुमच्या वेबसाईट ला गूगल ऍडसेन्स चे अप्रूव्हल मिळाले कि, AdSense तुमच्या वेबसाइटवर दिसणाऱ्या जाहिराती निवडण्यासाठी लिलाव करतो. जो जास्त बोली लावतो तो जाहिरातदार जिंकतो.

तुमची कमाई

तुमच्या वेबसाईट किंवा ब्लॉग वर जाहिराती गूगल कडून तुमच्या वेबसाईट मध्ये ब्लॉग च्या टॉपिक नुसार जाहिराती दाखवतो . जेव्हा पण तुमच्या वेबसाईट वर येणारे व्हिसिटर्स त्या जाहिराती वर क्लिक करतील त्यानुसार तुम्हाला पैसे मिळतील. 

तुम्हाला तुमचे पैसे भेटण्यासाठी , गुगल तुम्हाला तुमची वयक्तिक माहिती व Payment Method ऍड करायला सांगतो.

एकदा तुम्ही ते केल्यावर, Google तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या शेवटी क्लिक, इंप्रेशन नुसार पैसे देईल.

गूगल अ‍ॅडसेन्स ची मान्यता कशी मिळवायची? How to get Google Adsense Approval ?

गूगल अ‍ॅडसेन्स चे Approval मिळवण्यासाठी प्रथमतः तुमच्या वेबसाईट वरील कन्टेन्ट युनिक असणे अत्यंत महत्वाचे असते. त्याचबरोबर वेबसाईट मध्ये About Us, Contact Us, Privacy Policy, Disclaimer आणि Terms and Condition हे सर्व पेजेस असणे गरजेचे असते.

हे झाल्यानंतर आपल्याला गूगल अ‍ॅडसेन्स च्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन आपला अकाउंट तयार करून त्यामध्ये तुमच्या बद्दल विचारलेली सर्व माहिती व तुमच्या वेबसाईट बद्दल संपूर्ण माहिती एंटर करावी लागते. तुमची माहिती एंटर केल्यानंतर गूगल ची टीम तुमची वेबसाईट Crawl करून चेक करते आणि त्यांच्या पात्रतेनुसार तुमची वेबसाईट त्यांच्या नियम व अटी मध्ये बसत असेल तर तुम्हाला गूगल ऍडसेन्स चे अपृवल मिळेल. त्याअगोदर तुम्हाला एक व्हेरिफिकेशन कोड तुम्हाला पत्राद्वारे पाठवण्यात येतो, तो कोड तुम्हाला गुगल ऍडसेन्स च्या वेबसाईट वर टाकावा लागतो, तेव्हा हि प्रक्रिया पूर्ण होते.

ऍडसेन्स ची Approval मिळाल्यानंतर तुम्हाला एक कोड देण्यात येईल तो कोड तुम्हाला तुमच्या वेबसाईट च्या हेडर पार्ट मध्ये टाकावा लागेल त्यानंतर वेबसाईट मध्ये जाहिराती दिसायला चालू होतील . 

गूगल ऍडसेन्स मधून किती पैसे कमावू शकतो? | How Much Can You Earn With AdSense?

google adsense in marathi

तुम्ही गुगल ऍडसेन्सवरून किती पैसे कमावणार यावर मर्यादा नाही. किती कमाई होईल हे कोणीच सांगू शकत नाही

काही घटक आहेत ज्यांच्यावर तुमची कमाई अवलंबून असते , जसे तुमच्या वेबसाईट वर किती ट्रॅफिक येते , तुमचा ब्लॉग चा कन्टेन्ट, तुमच्या वेबसाईट वर Ads कुठे दाखवल्या जातात., इत्यादी .

खालील दिलेल्या दोन प्रकारे ऍडसेन्स आपल्याला पैसे देते,

1. Per-Click Commissions : आपल्या वेबसाईट मध्ये किती व्हिसिटर येतात आणि किती व्हिसिटर आपल्या जाहिराती वर क्लिक करतात. त्यानुसार ऍडसेन्स आपल्याला Pay करतो ,म्हणजेच आपण कॉस्ट पर क्लिक(CPC) नुसार पैसे कमाऊ शकतो. 

2. Per-Impression Commissions : आपल्या वेबसाईट वरील ऍड व्हिसिटर्स किती वेळा बघतात, त्यानुसार हि ऍडसेन्स आपल्याला पाय करतो , म्हणजेच CPM नुसार , म्हणजेच ऍड चे 1000 views नुसार.

AdSense Revenue Calculator तुम्हाला AdSense वर तुम्ही किती कमवू शकता याची कल्पना देऊ शकतो .

adsense revenue calculator

Conclusion

या लेखामध्ये आपण मराठीमध्ये गूगल ऍडसेन्स म्हणजे काय? What is Google Adsense in Marathi, What is Google Adsense meaning in Marathi, गूगल ऍडसेन्स बद्दल संपूर्ण माहिती, याबद्दल संपूर्ण माहिती बघितली आहे तर तुम्हाला या लेखामध्ये काही अडचण आली असेल तर आम्हाला नक्की कळवा. 

तसेच तुम्हाला लेख कसा वाटला कंमेंट मध्ये सांगा आणि पोस्ट शेयर करायला विसरू नका. 

धन्यवाद !!!

FAQs – Google Adsense in Marathi

Google Adsense चा अर्थ काय आहे?

Google AdSense हा एक Advertising प्लॅटफॉर्म आहे, जो ब्लॉगर्स ना त्यांच्या ब्लॉग किंवा वेबसाईट वर Google जाहिराती प्रदर्शित करून पैसे कमविण्याची परवानगी देतो.


Google Adsense भारतात किती पैसे देतात?

भारतात PER 1,000 व्ह्यूज तुम्ही $0.5 – $2 USD दरम्यान , तुमच्या Niche वर अवलंबून.

हे देखील वाचा : 6 स्टेप्स मध्ये यशस्वी ब्लॉग कसा सुरू करायचा 

Share and Enjoy !

Shares
Similar Posts

Leave a Reply