Marathi Stories For Kids

आपण सर्वांना छान छान गोष्टी वाचायला किंवा ऐकायला आवडतात. म्हणून आम्ही लहान मुलांसाठी काही गोष्टी Marathi Stories For Kids, Both Katha Marathi  घेऊन आलोय. तुम्हा सर्वांना ह्या गोष्टी वाचण्यात खूपच आनंद येईल आणि या गोष्टी तुम्हाला नक्कीच आवडतील.

Marathi Stories For Kids । छान छान गोष्टी मुलांसाठी

1. रानमांजर, कोल्हा आणि ससा (Kolha, Ranmanjar, aani Sasa)

Marathi Stories For Kids

एक जंगल होता, त्यात एक लहानसा ससा राहत होता. तो खूप भित्र्या स्वभावाचा होता. तो भित्रा ससा एका छोट्या बिळात रहात असे. त्याने एके दिवशी आपल्या बिळाच्या बाहेर एका कोल्ह्याला बसलेले पाहिले, तो खूप घाबरला. पण नंतर त्याने विचार केला की, बिळाचे तोंड खूप लहान आहे. त्यातून कोल्हा काही आत येऊ शकणार नाही. मग त्याची भीति थोडी कमी झाली.

असेच थोडे दिवस निघून जातात. नंतर, एक दिवस त्याने कोल्हा आणि रानमांजर गप्पा मारीत आहेत असे पाहिले. हे काही बरे नाही असे त्याला वाटले. थोड्या वेळाने ते रानमांजर सशाच्या बिळात शिरले आणि त्याला आपल्या पंजानी ओरबाडू लागले. ससा भिऊन बाहेर पळाला. जसा ससा बाहेर आला , तोच कोल्ह्याने त्याच्यावर झडप घातली आणि दोघांनी मिळून त्याच्यावर ताव मारण्यास सुरुवात केली.

मरता मरता ससा म्हणाला, ‘तुमच्या दोघांची मैत्री झाली तेव्हाच मी ओळखलं की आता आपली काही धडगत नाही.’

तात्पर्य – Marathi Stories For Kids with Moral

एकमेकांशी सतत भांडणाऱ्या  दोन माणसांची एकी झाली की एखादा गरीब संकटात सापडतो.

2. सिंह आणि उंदीर (Lion and Rat)

Marathi Stories For Kids १

उन्हाळ्याच्या दिवस होते, गरमी वाढल्यामुळे जंगलाचा राजा सिंह झाडाच्या सावलीत आरामात झोपला होता. तिथे एक खोडकर उंदीर येतो. तो उंदीर सिंहला खूप त्रास देतो. तो उंदीर सिंहाच्या अंगावर खेळू लागतो. त्यामुळे जागा होऊन, सिंहने पंजात उंदीरला धरला. उंदीर घाबरला आणि थरथरू लागला. सिंह त्यास आता फाडून टाकणार इतक्यात, त्या उंदराने त्याची प्रार्थना केली, ‘महाराज, मला माफ कर. माझ्याकडून मोठी चूक झाली. आपण थोर, सर्व जंगलाचे राजे, मी आपल्यापुढे केवळ रंक, माझ्या रक्ताने आपले हात विटाळू नयेत. मला जीवदान दयावे, कृपया मला सोडा. मी एक दिवस तुमच्या नक्की कमी येईन.’ ते ऐकून सिंहाला त्याची दया आली आणि त्याने त्यास सोडून दिले. 

पुढे एके दिवशी सिंह अरण्यात फिरत असताना एका झाडाजवळ जातो, त्याच झाडाजवळ शिकाऱ्याने जाळे मांडले होते, त्यात सिंह सापडतो. त्यावेळी त्याने आपले सगळे बळ खर्चून फार धडपड केली. पण त्याची सुटका होईना. तेव्हा तो निराश झाला आणि मोठमोठयाने ओरडू लागला. सिंहाची गर्जना ऐकून तो उंदीर त्या ठिकाणी आला आणि सिंहास म्हणाला, ‘राजा, भिऊ नको, स्वस्थ रहा. ’ इतके बोलून, त्याने आपल्या दातांनी ते जाळे कुरतडले व सिंह मोकळा झाला.

तात्पर्य – Marathi Stories For Kids with Moral

कधीही कोणाला कमी लेखू नये, वेळ पडल्यास कोणीही मदतीला येऊ शकतो.

stories for kids in marathi || Moral stories in Marathi || story marathi

3. उंदराची टोपी । Undarachi Topi

Marathi Stories For Kids 2

एक उंदिरमामा होता. तो असाच रस्त्यात फिरत होता. रस्त्याने जाताना त्याला एक फडके मिळाले. ते फडके घेऊन तो धोब्याकडे गेला. धोब्याला म्हणाला ‘धोबीदादा,धोबीदादा माझे फडके धुवून द्या. धोब्याने फडके धुवून दिले. धुतलेला फडका घेऊन उंदिरमामा शिंप्याकडे गेला. शिंप्याला म्हणाला ‘शिंपीदादा, ‘शिंपीदादा मला एक छानशी टोपी शिवून द्या, आणि त्या टोपीला रंगीत गोंडेही लावा. शिंप्याने उंदिरमामाला टोपी शिवून दिली. 

उंदिरमामा ने टोपी डोक्यावर घातली आणि एक ढोलके घेतले. ते वाजवत तो गाणे गाऊ लागला ‘ राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी छान. ढुम,ढुम,ढुमक !’ राजाने हे सर्व ऐकले . तो शिपायांना म्हणाला ‘ जा रे, त्या उंदराला पकडून दरबारात आणा.   

शिपायांनी उंदिरमामाला पकडून दरबारात आणले. त्याची टोपी काढून राजाकडे दिली. मग उंदिरमामा म्हणाला ‘राजा भिकारी, माझी टोपी घेतली. ढुम,ढुम,ढुमक !’ 

हे ऐकून राजा खूपच संतापला. त्याने उंदराकडे टोपी फेकून दिली. उंदिरमामाने टोपी पुन्हा डोक्यावर घातली व तो गाणे गाऊ लागला ‘राजा मला भ्याला. माझी टोपी दिली. ढुम,ढुम,ढुमक !’ हे गाणे गात गात तो राजवाडयातून निघून गेला.

तात्पर्य – Marathi Stories For Kids with Moral

शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ

4. बुडबुड घागरी Bud Bud Ghagri

Marathi Stories For Kids 3

एक होता उंदीर, तो फिरत फिरत जंगलात गेला. तिथे त्याला एक माकड आणि मांजर भेटले. त्या तिघांची चांगली मैत्री जमली. एक दिवस त्यांनी काहीतरी चांगला बेत करण्याचे ठरवले. सर्व बोलणी करून झाल्यावर त्यांनी खीर बनविण्याचे ठरवले. माकड म्हणाले ‘मी साखर आणतो’. मांजर म्हणाले ‘मी दूध आणते’. उंदीर म्हणाला ‘मी शेवया आणतो’. तिघे निघून गेले आणि आपापले सामान घेऊन आले. तिघांनी मिळून पातेलेभर खीर केली. 

मग माकड म्हणाले ‘चला आपण आंघोळ करून येऊ आणि मगच खीर खाऊ’. इकडे मांजराच्या तोंडाला पाणी सुटले होते. मांजर म्हणाली तुम्ही जा मी खीर शिजवत बसते. माकड आणि उंदीर म्हणाले, ठीक आहे आणि हे बोलून ते दोघे आंघोळ करण्यासाठी निघून जातात.

मांजरीच्या तोंडाला आधीच पाणी सुटले होते, ते गेले आहेत हे बघताच मांजराने विचार केला थोडी खीर खाऊन बघते. तेवढी खाऊन झाली पण तिलाआणखी खावी वाटली. पुन्हा थोडी घेतली असे करत करत तिने सगळी खीर खाऊन टाकली . थोडया वेळाने माकड व उंदीर आले. पहातात तो काय, खिरीचे पातेले रिकामे ! त्यांनी मांजराला विचारले ‘खीर कोणी खाल्ली?’ मांजर म्हणाले, ‘मला नाही माहीत, तुम्ही गेल्यावर मी थोडा वेळ झोपले होते.’ 

मग माकडाने एक घागर घेतली व सर्वजण नदीवर गेले. माकडाने घागर पाण्यात पालथी घातली. त्यावर उभे राहून माकड म्हणाले ‘ हुप हुप करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी’. पण घागर काही बुडाली नाही. मग उंदीर घागरीवर उभा राहिला व म्हणाला ‘चूं चूं करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी’. पण घागर काही बुडाली नाही. आता मांजराची पाळी आली.

मांजर खरे तर घाबरले होते. कसेबसे ते घागरीवर उभे राहिले व म्हणाले ‘ म्यांव म्यांव करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी’. अन काय आश्चर्य, घागर पाण्यात बुडाली. चोरून खीर खाल्ल्याची मांजराला शिक्षा मिळाली.

तात्पर्य – Marathi Stories For Kids with Moral

नेहमी खरे बोलावे.

5. ससा आणि कासवाची गोष्ट Sasa ani Kasav goshta

Marathi Stories For Kids 4

आज आपण वाचणार आहोत गोष्ट, ससा आणि कासवाची. एक ससा होता. गोरा गोबरा, मऊ, लांब कानांचा, मण्यासारख्या लालचुटुक डोळ्यांचा आणि लांब उड्या मारत झटकन पसार होणारा. एकदा एका कासवाशी त्याची मैत्री झाली. पण कासव होतं हळू, जसं नेहमी असतं तसचं. 

दोघेही एकाच गाजराच्या मळ्यात कोवळा गाजर खायला जायचे. ससा कासवाला म्हणाला,”किती रे तु हळू” ” कासव म्हणालं, ”पण तुला माहिती आहे का, सगळ्या गोष्टींमध्ये ना मीच शर्यत जिंकतो.

सशाला त्याचं हे म्हणणं जरा आवडलं नाही. नाक मुरडत ससा म्हणाला ”मग काय भाऊ लावायची का शर्यत परत एकदा? या समोरच्या डोंगरावरच्या त्या आंब्याच्या झाडापर्यंत”  कासवं म्हणालं ” हो पण जरा मला सराव करायला दोन दिवसांचा वेळ लागेल. तुला चालेल का?” ससोबा म्हणाला, ” ठीक आहे मग रविवारी सकाळी नऊ वाजता इथेच भेटूया.”

शर्यत ठरल्यानंतर ससा तडक त्याच्या आजोबांकडे गेला. त्यांना म्हणाला,” हे काय हो आजोबा प्रत्येक गोष्टीत कासवंच शर्यत का जिंकतं. मला ही गोष्ट खोटी पाडायची आहे. आता काय काय करु ते सांगा.” ससोबाचे आजोबा त्याला म्हणाले,” बाळा, जर न थांबता धावलं ना तरच जिंकता येईल शर्यत आणि झोप तर अगदी वर्ज्य. मी झोपल्यामुळेच शर्यत हारलो होतो. ” ससा म्हणाला,” ठीक आहे मी लक्षात ठेवीन आणि शर्यत जिंकूनच दाखवीन.”

रविवारी सकाळी ठरलेल्या वेळेवर कासव आणि ससा यांची शर्यत सुरु झाली. ससोबा अगदी वेगाने धावत सुटले. कासवही निरनिराळ्या युक्त्या लढवत कधी घरंगळत तर कधी वेगाने चालण्याचा प्रयत्न करत निघाले होते. अर्ध्या रस्त्यात ससोबांना एक मोठी टोपली दिसली त्यातून कोवळा पाला, गाजरं आणि मुळे डोकावत होते. ससोबांनी अदमास घेतला. 

कासव अजून किमान दोन तास तरी त्यांच्या आसपास फिरकू शकणार नव्हते. ससोबा झाडाच्या सावलीत बसले आणि टोपलीतला पाला, गाजरं खाऊ लागले. टोपलीतल्या वस्तू संपत असताना ससोबांना एक छानशी गोल चमकणारी वस्तू दिसली. ससोबांनी ती आपल्या चेहर्या समोर धरली. तो एक आरसा होता. त्यांनी यापूर्वी ही वस्तू कधी पाहिलीच नव्हती. 

पाण्यात अस्पष्ट दिसणारं त्यांचं रुपडं इतकं स्पष्ट दिसत होतं की ससोबा हरखले. ते त्या आरशात स्वत:ला न्याहाळू लागले, लांबलांब कान, छानदार डोळे, मिष्कील मिशा. आपल्या चेहर्याच्या विविध मुद्रा पहाण्यात ते इतके रमले की शर्यत बिर्यत साफ विसरले. संध्याकाळी घरी जाणार्या सूर्याचे किरण आरशात दिसल्यानंतर ससोबांना शर्यतीची आठवण झाली.

ते वेगाने टुण्ण टुण्ण उड्या मारत आंब्याच्या झाडापर्यंत पोहोचले, कासव तिथे त्यांची वाट पहात होते. ससोबा स्वत:शीच तणतणू लागले ” पण मी तर खूप पुढे होतो आणि आजोबांनी सांगितल्याप्रमाणे झोपलो पण नाही तरी कसा शर्यत हारलो.” कासव म्हणाले,” ससोबा मला सुद्धा आजोबा आहेत. तु जसं तुझ्या आजोबांना विचारलंस ना तसचं मी सुद्धा विचारलं आणि आम्ही दोघे ती भाज्यांची टोपली आणि आरसा कालच रस्त्यात ठेवून आलो होतो.” खरोखर न थांबता पोहोचण्याचा प्रयत्न केला ना तरचं शर्यत जिंकता येते.

तात्पर्य -Marathi Stories For Kids with Moral

प्रयत्न केला तर यश मिळते.

6. देवा , एवढे मला दे !

ब्रह्मदेवाने पशु-पक्षी निर्माण करून त्यांना पृथ्वीवर पाठवताना प्रत्येकाला काहीतरी वैशिष्टय दिले. कोकिळेला गोड गळा, मोराला रूप, तर सिंहाला शौर्य दिले. माणसाला देवाने असामान्य बुद्धिमत्ता दिले. पण तेवढ्याने संतुष्ट न होता तो ब्रह्मदेवाला म्हणाला, “देवा, मला दोन अदृश्य झोळ्या दे. मी त्या माझ्या गळ्यात अशी अडकवीन कि, त्यातली एक माझ्या छातीवर विसावेल, तर दुसरी पाठीवर.” “दोन झोळ्या कशासाठी ?” असा प्रश्न ब्रह्मदेवाने मोठ्या उथकंठेने विचारले असता , माणूस त्यांना म्हणाला, “पाठीवरच्या झोळीत मी माझे दोष ठेवून देईन, तर छातीवरच्या झोळीत मी दुसऱ्यांचे दोष ठेवत जाईन.” ब्रह्मदेवाने ‘ तथास्तु ‘ म्हणताच, मनुष्य त्या दोन अदृश्य झोळयांसह पृथ्वीवर आला.

तात्पर्य

तेव्हापासून माणसाला स्वतःचे मोठे दोषसुद्धा दिसेनासे झाले, पण दुसऱ्यांचे बारीकसारीक दोष मात्र स्पष्ट्पणे दिसू लागले.

7. धूर्त वटवाघूळ

एक वट वटवाघूळ एका रानमांजराच्या तावडीत सापडले. आता ते रानमांजर त्याला ठार मारणार, एवढ्यात ते वटवाघूळ त्या रानमांजराकडे दयेची याचना करू लागले. पण ते रानमांजर त्याला म्हणाले, ” तावडीत सापडलेल्या कुठल्याही पक्ष्याला मी आजवर जिवंत सोडलेलं नाही.” यावर ते धूर्त वटवाघूळ त्याला म्हणाला म्हणाले, ” तर मग तू मला दया दाखवणे जरूर आहे, कारण माझा तोंड पहा. आहे ना हुबेहूब उंदरासारखं ? मग उंदरासारखं तोंड असलेला मी पक्षी कसा असेन ? मी पशुच आहे.” त्याचं म्हणणं पातुनं त्या रानमांजराने त्याला जिवंत सोडून दिले.

थोड्या दिवसांनी तेच वटवाघूळ दुसऱ्या एका रानमांजराच्या तडाख्यात सापडले. ते आता ठार मारणार, एवढ्यात ते वटवाघूळ त्या रानमांजराकडे दयेची याचना करू लागले. पण ते रानमांजर त्याला म्हणाले, ” तावडीत सापडलेल्या कुठल्याही पशूला मी आजवर कधीही जिवंत सोडलेलं नाही. ” यावर ते धूर्त वटवाघूळ त्या रानमांजराला म्हणाले, ” असं असेल, तर तू मला अवश्य जिवंत जाऊ दिलं पाहिजेस, कारण माझे पंख पहा. आहेत ना पक्ष्यासारखे ? मग पंख असलेला मी पशु कसा असेन ? मी पक्षीच आहे. ” त्याचं म्हणणं पटून, त्या रानमांजराने त्याला जिवंत सोडून दिले.

तात्पर्य

धूर्त माणसे परस्परविरोधी गटातील लोकांकडे जातात आणि ‘ आपण तुमचेच आहोत, ‘ असे त्यांना भासवून, आपली कामे साधून घेतात.

तुम्हाला जर ह्या लहान मुलांच्या मराठी गोष्टी (Marathi Stories For Kids With Moral)  आवडल्या असतील तर आम्हाला कंमेंट मध्ये कळवा आणि आपल्या मित्रां सोबत share करा.

हे देखील वाचा BEST 100+ FRIENDSHIP STATUS IN MARATHI | फ्रेंडशिप स्टेटस मराठी मध्ये

Best 10+Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी Quotes मराठी मध्ये

Share and Enjoy !

Shares
Similar Posts

Leave a Reply