Best Tips to Increase Instagram Followers

तुम्हाला जर तुमचे इंस्टाग्राम फॉलोवर्स वाढवायचे आहेत (Want to Increase Instagram Followers in Marathi) ,तर तुम्ही बरोबर जागेवर आले आहात. आम्ही तुम्हाला इंस्टाग्राम फॉलोवर्स वाढवण्याचे बेस्ट टिप्स सांगणार आहोत. सोशल मीडिया आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. आपण सोशल मीडिया वर आपले फोटो किंवा व्हिडिओस टाकत असतो. हे करत असताना आपल्याला किती लाईक्स भेटले किंवा आपले किती फॉलोवर्स वाढले हे बघत असतो.

सोशल मीडिया वर आपल्याला सोशल मीडिया पोस्टवर किती लाईक्स मिळत आहेत आणि किती फॉलोअर्स आहेत याचे खूपच महत्त्व आहे. आपल्या सर्वांनाच वाटत असते की, सोशल मीडिया अकाऊंटवर आपले जास्तीतजास्त फॉलोअर्स असावेत. आपले लाईक्स खूप वाढावेत. सोशल मीडियावर खूप अँप्स आहेत, पण सगळ्यात जास्त वेड ज्या अँप चा आहे तो आहे Instagram.

आज आपण इंस्टाग्राम वर आपले ऑरगॅनिक फॉलोवर्स कसे वाढवायचे How to Increase Instagram Followers Organically हे जाणून घेऊया.

इंस्टाग्राम फॉलोअर्स वाढवण्याचे 7 मार्ग । 7 ways to increase Instagram followers

आपण लेखामध्ये पुढे जाण्‍यापूर्वी सांगण्यात येते कि , ही पोस्‍ट ऑरगॅनिक फॉलोइंग तयार करण्‍याबद्दल आहे. अधिक इंस्टाग्राम फॉलोअर्स मिळविण्याचा प्रयत्न करताना काही ब्रँड शॉर्टकट घेऊ इच्छितात. पे-फॉर-प्ले साइट्स अस्तित्वात आहेत असे आम्ही भासवत नाही.

तर चला इंस्टाग्राम फॉलोवर्स Organically वाढवण्याचे टिप्स जाणून घेऊ या .

1. Optimize your Instagram account । इंस्टाग्राम अकाऊंट ऑप्टिमाईज करा

फॉलोअर्स कसे मिळवायचे याची चिंता करण्यापूर्वी, तुमचे इंस्टाग्राम खाते कसे सेट केले जावे याचा विचार करा.

  • तुमचा इंस्टाग्राम बायो (तुमचा स्लोगन, टॅगलाइन आणि/किंवा ब्रँडेड हॅशटॅगसह)
  • तुमचे प्रोफाइल पिक्चर
  • तुमची बायो लिंक

या सर्व गोष्टी योग्य बनवणे आवश्यक आहेत. इंस्टाग्राम बायो आणि प्रोफाइल पिक्चर आकर्षित असणे गरजेचे आहे कारण तुमच्या प्रोफाइल वर आल्यावर लोकांना प्रथम हेच दिसते. यामुळे फॉलोअर्स तुमच्याकडे अधिक आकर्षित होतील आणि तुम्हाला अधिक फॉलोवर्स मिळण्यास मदत होते.

2. Keep a consistent content calendar । कंसिस्टन्ट कन्टेन्ट वेळापत्रक बनवा

इन्स्टाग्रामवर मोमेंटम महत्त्वाचा आहे. दुसऱ्या शब्दांत, तुम्ही रॅन्डमली पोस्ट केल्यास तुम्हाला कदाचित Instagram वर फॉलोअर्स मिळणार नाहीत.

चांगले कन्टेन्ट तयार करणे आणि त्याच्यातून व्हॅल्यू प्रदान करणे ,हे आपले प्रेक्षक तयार करतात. असे सातत्याने केल्याने तुम्हाला ते ठेवण्यास मदत होते. तुमच्या Instagram खात्याला धूळ खात ठेवू नका.

म्हणूनच पोस्टिंगचे सातत्यपूर्ण वेळापत्रक असणे महत्त्वाचे आहे. किती वेळा पोस्ट करायचे याचा प्रश्न येतो, तेव्हा निश्चित संख्या फॉलो करण्याची गरज नाही. बरेच ब्रँड दररोज किंवा जवळजवळ दररोज पोस्ट करतात.

3. Schedule Instagram posts in advance । इन्स्टाग्राम पोस्ट आधीच शेड्युल करा

ब्रँड ची रिच वाढण्यासाठी त्यांना इंस्टाग्राम अल्गोरिदमची गरज लागते ,हे नाकारता येत नाही. तरीही, योग्य वेळी पोस्ट केल्याने तुमच्या पोस्टला अधिक दृश्यमानता मिळू शकते. एन्गेजमेन्ट वाढवण्यासाठी तुम्ही जे काही एक्सट्रा कराल , तेवढ चांगला आहे.

वेळेपूर्वी कन्टेन्टचे नियोजन आणि शेड्यूल केल्याने तुम्हाला नियंत्रण मिळते आणि तुम्हाला ऑर्गनाईझ्ड राहण्यास मदत होते. इंस्टाग्राम शेड्युलिंग टूल्स मार्केट मध्ये आहेत , ते वापरून तुम्हाला नियमित पोस्टिंगची लय राखण्यास मदत मिळिले. तुमचे फॉलोवर्स तुमची पोस्ट एखाद्या विशिष्ट वेळीच पाहणे पसंत करतात. तुम्हाला आधीपासून कंटेन्ट शेड्युल करून ठेवणे चांगले आहे , असे न केल्यास, तुमचे फॉलोअर्स कमी होऊ शकतात. इन्स्टाग्रामवर आधीपासून पोस्ट शेड्युल करण्याचा असा एक फायदा आहे की, एखाद्या वेळी तुम्ही जर पोस्ट टाकायला विसरलात तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही, शेड्युल केलेल्या वेळात तुमची पोस्ट शेअर केली जाईल. 

4. Engage with customers and influencers

तुम्हाला इंस्टाग्राम फॉलोवर्स वाढवायचे असल्यास , तुमच्या प्रेक्षकांबरोबर संवाद चालू ठेवा. प्रेक्षकांनी कमेंट केल्यास , त्या कमेंट ला उत्तर द्या.

तुम्ही दुसऱ्या कन्टेन्ट इन्फ्लुएन्सर बरोबर भागीदारी करू शकता आणि आपलं प्रेक्षकवर्ग वाढवू शकता. कन्टेन्ट इन्फ्लुएन्सर तुमचा प्रॉडक्ट ची ब्रॅण्डिंग करून , तुमच्या प्रेक्षकांची अवेअरनेस वाढवू शकतात.

5. Avoid fake Instagram followers । फेक फॉलोवर्स बनवू नका

फेक फॉलोवर्स आणि खरे फॉलोवर्स मध्ये खूप फरक असतो. कधी कधी फॉलोवर्स वाढवण्याच्या नादात आपण फेक फॉलोवर्स खरेदी करू शकतो, पण याचे परिणाम खूप वाईट आहेत. फेक फॉलोवर्स मुळे तुमचे ऑरगॅनिक फॉलोवर्स कन्फयुज्ड होऊ शकतात, कारण जर तुम्ही पोस्ट टाकली आणि एवढे जास्त फॉलोवर्स असताना पोस्ट वर एन्गेजमेन्ट नसेल तर तुमच्या रिअल फॉलोवर्स ना काही तरी विचित्र असल्याचा वाटेल.

खरे लोक तुमच्या Instagram पोस्ट शेअर करतात , लाईक करतात , टिप्पणी करतात आणि एन्गेग्ज पण होतात. याव्यतिरिक्त, वास्तविक अनुयायी आपण त्यांच्याशी संवाद साधण्यात घालवलेल्या वेळेची खरोखर प्रशंसा करतात.

6. Post content that followers actually want to see

तुमच्या फॉलोवर्स ना तेच शेअर करा , जे कॉन्टेन्ट बघून ते तुमचे फॉलोवर्स झाले आहेत, तुमचा कन्टेन्ट चा विषय सतत बदलू नका. आजकाल प्रेक्षक मोठमोठे विडिओ पाहण्याऐवजी शॉर्ट व्हिडिओस बगण्यास प्राधान्य देतात, म्हणून तुम्ही विडिओ नेहमी Shorts, Reels या मधेच टाकत जा.

7. Use Proper Hashtags । पोस्ट मध्ये हॅशटॅग वापरा

इंस्टाग्राम वर आपण जेव्हा पोस्ट टाकतो, तेव्हा त्याबरोबर त्यासंदर्भातील हॅशटॅग पण टाकत जा. काही ट्रेंडिंग हॅशटॅग वापरून आपण आपली पोस्ट ट्रेंडिंग मध्ये आणू शकतो. हॅशटॅग वापरून पोस्ट केल्यामुळे तुमची स्टोरी अथवा पोस्ट जास्तीजास्त लोकांपर्यंत पोहचते. तसंच यामुळे तुमचे फॉलोअर्स वाढण्यास खूप मदत मिळते. 

Conclusion

अशाप्रकारे तुम्ही वरील दिलेले टिप्स वापरून, तुमचे इंस्टग्राम फॉलोवर्स वाढू शकता. आम्हाला अशा आहे कि तुम्हाला 7 Best Tips to Increase Instagram Followers in Marathi हि पोस्ट आवडली असेल.

धन्यवाद !

FAQs

इंस्टाग्राम वर १ हजार फॉलोवर्स कशे भेटतील? How can I get 1K followers on Instagram?

तुमचा इंस्टाग्राम अकॉउंट आकर्षित बनवा, पोस्ट कंसिस्टंटली टाकत राहा , टेंडिंग हॅशटॅग वापरा , हे सर्व करत राहा तुम्हाला 1K फॉलोवर्स लवकर भेटतील

हे देखील वाचा

5 FACEBOOK SECRET TIPS AND TRICKS 2020

WHATSAPP TIPS AND TRICKS

काही GOOGLE TIPS AND TRICKS

Share and Enjoy !

Shares
Similar Posts

Leave a Reply