Heart Touching Birthday Wishes for Mother in Marathi

Birthday Wishes in Marathi for Mother | Happy Birthday wishes for mother in Marathi

Heart touching Birthday Wishes for Mother in Marathi: “आई” हा केवळ दोन अक्षरी शब्दच नाही, या दोन अक्षरात आपला सगळं जग सामावलेलं आहे. ज्या आईच्या उदरी आपण जन्म घेतो आणि नवे जग पाहतो. ती आईच आपल्या सुखदु:खात कायम आपल्या पाठीशी असते. चुकल्यावर मारते पण मारल्यानंतर जवळ घ्यायलाही विसरत नाही.  तिच्या समोर जेवणाचे भरलेले ताट वाढले असले तरी तुम्ही खाईपर्यंत तिच्या पोटात अन्नाचा एकही कण जात नाही. तुम्हाला कोणी बोलले तर ते आईला कधीच चालत नाही. 

त्या आईचा वाढदिवस साजरा करून, आपण आपल्या आईला आपले प्रेम आणि तिच्याबद्दलचा आदर दाखवू शकतो, म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी Birthday wishes for mother in marathi घेऊन आलो आहोत, या मधील मेसेजचा वापर करून तुम्ही तुमच्या आईचा वाढदिवस अधिक खास बनवू शकता, तुम्हाला फक्त तिच्या वाढदिवसाची तयारी करायची आहे. आपण शुभेच्छा म्हणून त्यांच्यासाठी चांगले प्रेमळ कोट लिहू शकता. याशिवाय, आम्ही तुमच्यासाठी या पोस्टमध्ये Birthday wishes for mother in Marathi चा संग्रह तयार केला आहे.

Mother birthday wishes in Marathi | आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी

Heart touching birthday wishes for mother in Marathi

प्रत्येक जन्मी मला मिळावा तुझ्या पोटी जन्म,
तुझ्याच असण्याने मला मिळाल जीवनाचा खरा अर्थ
आई वाढदिवसाच्या शुभेच्छा!

स्वतःला विसरुन घरातील
सर्वांसाठी सर्व करणाऱ्या
माझ्या प्रेमळ आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

येणारा प्रत्येक क्षण तुझ्या आयुष्यात केवळ आनंद घेऊन यावा,
यासाठी मी कायम प्रयत्नशील असेल,
तुझ्या सगळ्या कष्टांचे मी चीज करेन, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

माझ्या आयुष्यातील यशाच्या
शिड्या जिने माझ्यासाठी बनवल्या,
अशा माझ्या कष्टाळू आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

स्वतःचे दुःख न दाखवता
आमच्या सुखासाठी सदैव
प्रयत्न करणाऱ्या माझ्या आईस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आमच्यावर निस्वार्थ प्रेम करणाऱ्या माझ्या
आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Aai Birthday wishes in Marathi | आई वाढदिवस शुभेच्छा मराठी

Heart touching birthday wishes for mother in Marathi 2

मी कलेकलेने वाढताना,
तू कधीही केलास नाही तुझा विचार,
आई आज आहे तुझा वाढदिवस,
आता तरी स्वत:साठी थोडा वेळ काढ

जगातले सर्व सुख एकीकडे
आणि आईच्या कुशीत
झोपण्याचा आनंद एकीकडे
वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा आई.

व्हावीस तू शतायुषी,
व्हावीस तू दीर्घायुषी,
ही एकच माझी इच्छा
आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

माझ्यात असणाऱ्या
सर्व चांगल्या गोष्टींची
जननी माझ्या आईस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

माझ्या मनात असणाऱ्या
गोष्टी क्षणात ओळखणाऱ्या
माझ्या आईस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

हे देखील वाचा : 25 MARATHI STORY FOR KIDS | MARATHI SHORT STORIES FOR KIDS IN MARATHI | लहान मुलांच्या मराठी गोष्टी

Mom Birthday Wishes in Marathi

Heart touching birthday wishes for mother in Marathi 3

जगासाठी तू एक व्यक्ती आहेस,
पण माझ्यासाठी तू  माझं जग आहेस
आई, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

जसा सूर्य प्रकाशविना व्यर्थ
तसेच आईच्या प्रेमाशिवाय हे जीवन व्यर्थ.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.

जगातली सारी सुखं तुझ्या पायाशी लोळू देत,
तुझ्या असण्याने माझे जग कायम बहरलेले असू देत
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

माझ्या प्रेमळ, समजदार,
सर्वांना सांभाळून घेणाऱ्या
आईला कशाचीच कमी पडू नये
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Birthday wishes for mom in Marathi | आईसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Heart touching birthday wishes for mother in Marathi 4

आई तुझ्या मूर्तीवाणी,
या जगात मूर्ती नाही,
अनमोल जन्म दिला तू आई,
तुझे उपकार काही या जन्मात फिटणार नाही

प्रत्येक येणारा क्षण तुझ्यासाठी
फक्त आनंद घेऊनच यावा
यासाठीच मी पूर्ण प्रयत्न करेल.
वाढदिवसाच्या खुप खूप शुभेच्छा आई.

आई तू माझ्या आयुष्यात आहेस
हेच माझ्यासाठी सर्वकाही आहे
तुला आयुष्यात जे पाहिजे ते
भरभरून मिळत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.

हे देखील वाचा : 200+ NEW BUSINESS IDEAS IN MARATHI | 200+ नवीन उद्योग व्यवसायांची यादी 2023 ( LOW INVESTMENT, HIGH PROFIT )

Birthday Wishes for Aai in Marathi

Heart touching birthday wishes for mother in Marathi 5

आई म्हणजे मायेचा पाझर,
आईची माया एक आनंदाचा सागर,
आई म्हणजे घराचा आधार,
आईविना ते गजबजलेलं घरचं निराधार,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

जिथं पोरांचे सर्व गुन्हे माफ
आणि हट्ट पूर्ण केले जातात
ती जागा म्हणजे आई.
आई तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

या विश्वात असं कुणीच नाही
जे माझ्या हृदयात तुझी जागा घेतील.
आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Happy Birthday Aai Wishes in Marathi

इंद्रधनुष्याप्रमाणे तुझेही आयुष्य रंगीत असावे,
तू सदैव आनंदी असावे, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

जेवढं तडकाफडकी ने मला
तू शाळेत पाठवते व त्यानंतर
त्यापेक्षा जास्त आतुरतेने माझी वाट
पाहणाऱ्या माझ्या आईला
वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा.

तिच्या जवळ जेवढं आहे
त्यापेक्षा नेहमीच जास्त प्रेम
देणाऱ्या माझ्या प्रेमळ आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Happy Birthday Aai | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आईसाहेब

लहानपणापासून
मला चांगल काय वाईट काय
याची शिकवण देणाऱ्या माझ्या
आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

हे देवा सदैव आनंदी ठेव
तीला जीने जन्म दिलाय मला.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.

आई देवाने दिलेली एक भेटवस्तू आहेस तू,
माझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात आहेस तू,
तू सोबत असताना सर्व दुःख दूर होतात
नेहमी अशीच सावली प्रमाणेमाझ्या सोबत रहा.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई.

माझ्या अंधारलेल्या आयुष्यात
यशाचा प्रकाश आणण्यासाठी
रात्रंदिवस वात म्हणून जळत
असणाऱ्या माझ्या आईस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

स्वतः उन्हाचे चटके सोसून
मला सावलीत ठेवणाऱ्या माझ्या
आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

सर्व कुटुंबाला एका मायेच्या
बंधनात बांधून ठेवणाऱ्या
सर्वांवर प्रेम आणि सर्वांची
काळजी करणाऱ्या
माझ्या आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

आम्हाला आशा कि Birthday Wishes for Mother in marathi ही पोस्ट तुम्हाला आवडली असेलच. या लेखा मध्ये आम्ही Birthday messages for Mother in Marathi, Birthday wishes for Mom in Marathi, Happy Birthday Aai, Birthday messages for mother in Marathi, Aai Birthday Wishes in Marathi, Mom Birthday Wishes in Marathi चा देखील समावेश केलेला आहे. या शुभेच्छा Wishes बद्दल तुमचे मत कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा.

हे देखील वाचा

LOVE BIRTHDAY WISHES IN MARATHI | BIRTHDAY WISHES FOR LOVE IN MARATHI । लव्ह वाढदिवसाच्या शुभेच्छा 2023

YOUTUBE CHANNEL GROW KAISE KARE | BEST TIPS यूट्यूब चैनल ग्रो कैसे करे 2023

WHAT IS MILLET IN MARATHI? TYPES OF MILLETS IN MARATHI | मिल्लेट्स म्हणजे काय आणि त्यांचे प्रकार ?

Share and Enjoy !

Shares
Similar Posts

Leave a Reply