Marathi Story for Kids

आज आम्ही तुमच्यासाठी Marathi Story for Kids घेऊन आलो आहोत. आपण सर्वांना गोष्टी वाचायला व ऐकायला आवडतात खास करून छोट्या मुलांना मराठी गोष्टी ऐकायला आवडतात, म्हणून आज आम्ही तुमच्यासाठी खास करून छोट्या मुलांसाठी काही निवडक Short Stories for kids in Marathi | Moral Stories for kids in Marathi घेऊन आलो आहोत. तर चला मग कशाची वाट बघतोय मराठी गोष्टी वाचूया.

Table of Contents

छान छान गोष्टी, लहान मुलांच्या गोष्टी,

1. कावळा आणि गरुड – Kavla aani Garud – Marathi Story for Kids

Marathi Story for Kids 9

Kavla aani Garud :आज आम्ही तुम्हाला गरुड आणि कावळ्याची गोष्ट सांगणार आहोत. एका झाडावर एक कावळा राहत होता. तो रोज गरुडाला उडून, करामती करताना पहात असे.

गरुडाचे घरटे डोंगराच्या वरती टोकावर होते, तेथून तो खाली झेप घेत असे व चरणाऱ्या मेंढ्यातून एक मेंढी उचलून वर उडून जात असे.

कावळा गरुडाच्या करामतीने चकित झाला.

एक दिवस कावळा खूप उत्साहाने गरुडाची नक्कल करू लागला तो शक्य तितक्या उंच उडाला आणि त्याने वेगाने खाली झेप घेतली. पण त्याला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही तो जमिनीवर आढळला व त्याची मान मोडली.

तात्पर्य – अविचार नेहमी संकटात पाडतात

2. अननुभवी उंदीर – Story in Marathi for Child

Marathi Story for Kids 8

एकदा एक लहान उंदीर आपल्या आईला म्हणाला, ” मला बाहेर जाऊन जग पहायचे आहे.” आई म्हणाली, “ठीक आहे, पण जरा सांभाळून जा.”

उंदीर आपल्या बिळाच्या बाहेर आला आणि फिरू लागला. त्याने रंगीबिरंगी कोंबडा पाहिला. तो घाबरला कारण त्याने कधीच कोंबडा पाहिला नव्हता. त्याची टोकदार चोच रंगीबेरंगी पंख व लाल तुरा पाहून तो पळून गेला. तो विचार करू लागला, “हा कसला प्राणी आहे.”

थोड्यावेळाने त्याला मांजर दिसले त्याच्या मनात विचार आला, “किती मऊ प्राणी आहे हा ! केस छान आहेत व डोले चमकदार आहेत.”

जेव्हा उंदीर घरी परतला तेव्हा संपूर्ण दिवसाची हकीकत त्याने आईला सांगितली. आई म्हणाली, “कोंबडा निरुपद्रवी प्राणी आहे, पण मऊ मांजर आपला शत्रू आहे.”

तात्पर्य – दिसते तसे नसते

3. बेजबाबदार बैल – Marathi Story for Kids

Marathi Story for Kids 6

Moral Stories in Marathi : शूर सरदाराकडे घोडा व बैल होता. तो घोड्याला प्रवासासाठी नेत असे आणि बैलाचा वापर ओझे वाहण्यासाठी करत असे.

लढाई सुरू झाली आणि सरदारला खूप लांब जावे लागले. घोडा बैलाला म्हणाला, “मला मालकाला खूप दूर न्यायचे आहे.” बैलाने उत्तर दिले, “तू कमनशिबी आहेस. मी नशीबवान आहे मला ओझे व्हायचे नाही. मला काहीच काम नाही.”

पण अचानक असे झाले की सरदार प्रवासास निघण्यापूर्वीच शत्रू शरण आल्याने युद्ध संपले. आता सरदाराला घरीच खूप काम करावे लागले.

त्यासाठी बैलाला खूप राबवे लागले.

तात्पर्य – जबाबदारी टाळल्यामुळे काम वाढतं

4. ससा आणि कासव – Sasa ani Kasav story

Marathi Story for Kids 15

Sasa ani Kasav story : सशाला आपल्या वेगाचा गर्व होता. तो कासवाच्या हळू चालण्याबद्दल नेहमी हसायचा. कासव कधी चिडत नसे. पण सशाने कासवाला चिडवणे चालूच ठेवले.

एके दिवशी कासवाने सशाची पळण्याची शर्यत लावली. ससा आश्चर्यचकित झाला त्याला वाटले, ‘हळू पाळणारा मला कसे आव्हान देत आहे?’ शर्यत सुरू झाली आणि क्षणात ससा खूप पुढे गेला.

ससा जिंकण्याच्या जागी जवळ आला. त्याने विचार केला, ‘आपण कासवासाठी थांबूया व कासव आल्यावर उडी मारून शर्यत जिंकू.’ ससा झोपी गेला.

थोड्यावेळाने त्याला जाग आली. त्याने पाहिले कासव शर्यत जिंकण्याची रेषा पार करत आहे. ससा शर्यत हरला.

तात्पर्य – जिंकण्यास सातत्य आवश्यक

5. शेतातला उंदीर व गावातला उंदीर – Marathi Story for Kids

Marathi Story for Kids 20

शेतातला उंदीर व गावातला उंदीर दोघे मित्र होते. शेतातल्या उंदराने गावातील उंदराला जेवणाचे आमंत्रण दिले. दोघे शेतात जेवणात बसले त्यांनी बोरे शेंगा आणि फळे खाल्ली. जेवण झाल्यावर गावातील उंदीर म्हणाला, ‘काय बेचव जेवण आहे. मला तुझ्याकडचे जेवण आवडले नाही. माझ्याबरोबर चल आणि चांगले अन्न कसे असते ते पहा. दोघेजण गावाकडे निघाले.

गावातला उंदीर एका घरात राहत असे. ते दोघे स्वयंपाक घरात जेवायला बसले. गावातील उंदराने केक, बिस्किटे आणि पाव खाण्यास दिला. ते खाण्यास सुरुवात करणार इतक्यात मांजराचा आवाज आला. ते बिळात पळाले. थोड्यावेळाने दोघे पुन्हा आले. परत मांजराचा आवाज आला. ते बिळात पळाले. अशाप्रकारे त्यांना जेवणातून अनेक वेळा जीव वाचवण्यासाठी बिळात पाळावे लागले.

शेतातील उंदीर म्हणाला, ‘किती दुखी जीवन आहे तुझे ! निदान मी माझ्या शेतात शांतपणे जगू शकतो’.

तात्पर्य – श्रीमंतीत सुख असतेच असे नाही

6. तहानलेला कावळा – Tahanlela Kavla Story

Marathi Story for Kids 21

Tahanlela Kavla Story : कडक उन्हाळ्याचे दिवस होते. एका कावळ्याला खूप तहान लागली होती. तो पाण्यासाठी इकडे तिकडे फिरत होता. पण काही केल्या त्याला पाणी मिळेना. उन्हाळा असल्यामुळे सर्व नद्या आणि तलाव कोरडे पडले होते.

शेवटी शोधता शोधता त्याला एका घराच्या बागेत रांजण दिसले. कावळ्याने त्या रांजणात डोकावून पाहिले. त्यात थोडे पाणी होते. त्याला खूप आनंद झाला. तो पाणी पिण्याचे प्रयत्न करू लागला. पाणी तळाशी असल्यामुळे त्याला पाणी पिता आले नाही.

कावळ्याच्या डोक्यात एक कल्पना आली. जमिनीवरील एक एक दगड उचलून तो रांजणात टाकू लागला. हळूहळू रांजणातील पाणी वर येऊ लागले. असे करता करता रांजणातील पाणी वर आले व कावळा ते पाणी प्यायला व आनंदाने उडून गेला.

तात्पर्य – इच्छा तेथे मार्ग

7. कोल्हा आणि कावळा – Kolha aani Kavla goshta

Marathi Story for Kids 19

Kolha aani Kavla goshta : एकदा, एक लहान मुलगा केकचा तुकडा खात होता. कावल्याने त्याच्या हातातून तुकडा पळवला व झाडावर जाऊन बसला. हे एका कोल्ह्याने पाहिले. त्याच्या तोंडाला पाणी सुटले.

कोल्हा गोड आवाजात म्हणाला, ‘नमस्कार! कावळे दादा.’ कावळ्याने तोंड उघडले नाही. कोल्हा पुढे काय बोलावे यावर विचार करू लागला.

कोल्हा म्हणाला, ‘वाह! तू किती सुंदर दिसतो आहेस, म्हणजे तुझा आवाज ही गोड असेल. कृपया मला एकदा तुझा आवाज ऐकू दे!’ कावळा त्याच्या बोलण्याला भाळला. त्याने गाण्यासाठी तोंड उघडले. तोंड उघडतास केक चा तुकडा खाली पडला. कोल्याने तो खाल्ला व निघून गेला.

तात्पर्य – फसू नका आणि फसवू नका

8. कोल्ह्याला द्राक्ष आंबट – Kolhyala Draksha Ambat Story

Marathi Story for Kids 18

Kolhyala Draksha Ambat Story : एकदा, एक कोल्हा फिरत फिरत द्राक्षाच्या मळ्यात आला. वेलीवर त्याला पिकलेल्या द्राक्षांचे घड दिसले. त्याच्या तोंडाला पाणी सुटले.

कोल्याने द्राक्ष मिळवण्यासाठी खूप उड्या मारल्या पण तो द्राक्षापर्यंत पोहोचू शकला नाही. द्राक्ष खूप उंच होते. तो मागील पायावर उभा राहिला तरी सुद्धा तो द्राक्षांपर्यंत पोहोचू शकला नाही.

शेवटी त्याने खूप उड्या मारल्या. परंतु काही उपयोग झाला नाही. अखेर तो दमला व तेथून निघाला. जाता जाता तो म्हणाला, ‘द्राक्ष आंबट आहेत ती कोण खाणार?’.

तात्पर्य – खेळाडू वृत्तीने पराभव स्वीकारा

9. कोल्हा आणि ससा – Kolha aani Sasa Marathi Story for Kids

Marathi Story for Kids 7

Kolha aani Sasa Marathi Story for Kids : ससा कोल्याकडे कौतुकाने पहात होता. कोल्हा म्हणाला, “तू माझ्याकडे का पाहतो आहेस?” ससा म्हणाला, “मला तुझे कुतूहल वाटते.” कोल्हा म्हणाला, “तुला माझ्यात कुतूहल वाटण्यासारखे काय आहे?” ससा म्हणाला, “लोक म्हणतात तसा तू खरंच चलाख आहेस का?”

कोल्ह्याने त्याच्याकडे विचारपूर्वक नजरेने पाहिले व म्हणाला, “ठीक आहे! तू असे कर, आज रात्री माझ्याकडे भोजनासाठी ये. आपण या विषयावर चर्चा करू.”

ससा रात्री कोल्याकडे गेला टेबलावर ताट ठेवले होते .परंतु ताटात अन्न नव्हते सशाने विचार केला, “मी किती मूर्ख आहे. कोल्ह्याने मला खाण्याच्या बेत आखला आहे.” आणि तो पळून गेला.

तात्पर्य – फसवे बोलणे विश्वासनीय नसतं

10. गाढवाचा मेंदू – छान छान गोष्टी

Marathi Story for Kids 5

छान छान गोष्टी : एका जंगलात एक सिंह राहत होता. कोल्हा त्याचा भागीदार होता. ते दोघे एकत्र शिकार करत असत. सिंह शिकार करत असे व खोल्याला शिकारी मध्ये मदत केल्याबद्दल हिस्सा देत असे.

एक दिवशी सिंह आजारी पडला. त्याला बाहेर जाता येईना. त्याला भूक लागली. त्याने कोल्ह्याला बोलावले व सांगितले, “मित्रा मी आजारी आहे. मला भूक लागली आहे. तू मला शिकार आणून दे .”

कोल्हा शिकार शोधायला गेला. त्याला एक गाढव दिसले. तो गाढवाला म्हणाला, “नमस्कार! जंगलाच्या राजाने तुला मंत्री करण्याचे ठरवले आहे.” मूर्ख गाढव खूप खुश झाले व ते कोल्ह्याच्या मागे गेले.

सिंहाने गाढवाला ठार केले. पण खाण्याआधी त्याला तहान लागली. तो कोल्ह्याला म्हणाला, “तू गाढवाची काळजी घे, मी लगेच परत येतो.”

सिंह जाताच कोल्ह्याने गाढवाचा मेंदू खाण्यास सुरुवात केली. सिंह परत आला तेव्हा त्याला गाढवाचा मेंदू गायब झाल्याचे दिसले.

त्याने कोल्ह्याला विचारले, “गाढवाचा मेंदू कोठे आहे?” कोल्याने हुशारीने उत्तर दिले, “त्याला मेंदू असतात तर तो येथे आला असता का?”

तात्पर्य – हुशारीचे उत्तर प्राण वाचवते

Motivational Story in Marathi

11. मुंगी आणि नाकतोडा – Mungi ani Naktoda Story in Marathi

Marathi Story for Kids 17

Mungi ani Naktoda Story in Marathi : उन्हाळ्याचे दिवस होते. वातावरण प्रसन्न होते. धान्य भरपूर पिकले होते. एक नाकतोडा गाण्यात रंगून गेला होता. त्याला खाण्यास भरपूर होते.

मुंग्या अन्नाचे कण गोळा करून बिळात नेत होत्या. नाकतोडा उपहासाने म्हणाला, ‘मला तुमची कीव वाटते, एवढ्या प्रसन्न दिवशी खेळायचे सोडून तुम्ही काम करत आहात.’ मुंग्या म्हणाल्या, ‘आम्ही हिवाळ्यासाठी अन्न साठा करत आहोत. तू सुद्धा अन्न साठव.’ परंतु नाग तोड्याने दुर्लक्ष केले.

लवकरच थंडीचे दिवस आले. सर्वत्र कडाक्याची थंडी पडली होती. अन्न कोठे मिळेनासे झाले. नाकतोड्याला उपाशी राहावे लागले. तो मुंग्याकडे अन्न मागावयास गेला. मुंग्या म्हणाल्या, ‘अरे आळशी नाकतोड्या! संपूर्ण उन्हाळा तू नाचण्या, गाण्यात घालवलास. तू भविष्याचा विचार केला नाहीस. आता जाऊन नाच कर. आम्ही तुला मदत करणार नाही.’

तात्पर्य – आजची बचत उद्याची गरज

12. लोभी कुत्रा – Lobhi Kutra Story in Marathi

Marathi Story for Kids 16

Lobhi Kutra Story in Marathi : एक दिवस एक कुत्रा अन्न शोधत फिरत होता. वाटेत त्याला एक हाड सापडले. ते हाड तोंडात धरून तो चालू लागला. वाटेत ओढ्यावर एक पूल होता.

फुल ओलांडताना त्याने पाण्यात पाहिले. त्याला पाण्यात आपली प्रतिमा दिसली. त्याला वाटले दुसरा कुत्रा हाड घेऊन उभा आहे. त्याला दुसरा हाड मिळवण्याची इच्छा झाली. दुसऱ्या कुत्र्यावर भुंकण्यासाठी त्याने तोंड उघडले, त्याच वेळी त्याच्या तोंडातील हाड पाण्यात पडले. अशाप्रकारे कुत्र्याने लोभा मुले आपले अन्न गमावले.

तात्पर्य – हावरटपणाचे फळ

13. चलाख विक्रेता

Marathi Story for Kids 14

एक चलाख विक्रेता होता. तो लोकांबरोबर हुशारीने वागायचा. एकदा छोट्या मुलाने त्याच्याकडून बोरे घेतली. विक्रेत्याने त्याला वजनापेक्षा कमी बोरे दिली.

मुलाने विचारले, ‘तुम्ही मला कमी बोरे का दिली?. विक्रेत्याने उत्तर दिले, ‘तुला कमी बोरे न्यायला सोपी पडतील. आता मला पैसे दे.’

मुलाने त्याच्या हातावर काही नाणी ठेवली. तो जाऊ लागला. विक्रेत्याने पैसे मोजले व ते कमी असल्याचे लक्षात आले.

विक्रेता ओरडला, ‘ए मुला! तू मला कमी पैसे दिले आहेत.’ त्यावर मुलगा म्हणाला, ‘कमी पैसे मोजायला सोपे जातील.’

तात्पर्य – शेरास सव्वाशेर

14. चतुर बिरबल – Akbar Birbal story in Marathi

Marathi Story for Kids 4

Akbar Birbal story in Marathi : अकबर बादशहाला त्याच्या दरबारातील लोकांनी कोडी व अजब प्रश्न विचारण्याची सवय होती. तो नेहमी विचित्र प्रश्न विचारत असे, त्याचे उत्तर देण्यास हुशारीची आवश्यकता असे.

एके दिवशी बादशहाने एक विचित्र प्रश्न विचारला. दरबारातील कोणास हि त्याचे उत्तर देता आले नाही.

दरबारातील सर्वांनी उत्तर न देता आल्यामुळे मानाखाली घातल्या. इतक्यात बिरबल दरबारात आला.

बिरबलाने पाहिले की सर्व दरबारी खाली मान घालून बसले आहेत. बिरबल अकबर बादशहा पुढे गेला व नम्रपणे विचारले, “महाराज! कृपया माझे सहकारी कसल्या विचारात आहेत? बादशहा म्हणाला, “मी त्यांना एक प्रश्न विचारला आहे. त्याचे ते उत्तर शोधत आहेत.”

बिरबलाला बादशहाचा स्वभाव माहित होता. त्याने त्वरेने बादशहाला विचारले, “मला जर प्रश्न कळला तर मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.” अकबराने विचारले, “या शहरात किती कावळे आहेत?” बिरबलाने क्षणात उत्तर दिले, “आपल्या शहरात 50 हजार 589 कावळे आहेत.”

अकबर म्हणाला, “तू एवढ्या खात्रीने कसे सांगू शकतोस?”

बिरबल म्हणाला, “आपल्या दरबारातील लोकांना कावळे मोजण्यास सांगावे. जर काही कावळे कमी भरले तर ते आपल्या नातेवाईकांना भेटायला शेजारच्या शहरात गेले असतील. व जास्त असतील तर काही पाहुणे कावळे आपल्या शहरात आले आहेत. बिरबलाच्या उत्तराने बादशाह खुश झाला.”

तात्पर्य – विचित्र प्रश्नात चतुर उत्तर

15. उंदीर आणि बैल – Moral Stories in Marathi

Marathi Story for Kids 13

उन्हाळ्याचे दिवस होते. एक बैल झाडाच्या सावलीत झोपला होता. तो जोरात घोरत होता. तेथून एक छोटा उंदीर जात होता. त्याला बैलाच्या घोरण्याबद्दल कुतूहल वाटले.

उंदीर बैलाच्या नाकावर चढला व मजा म्हणून हळू चावला. बैल जागा झाला आणि रागाने म्हणाला, “मला कोणी जागे केले आणि कोण चावले?” उंदीर म्हणाला, “मला क्षमा करा, मी तुमची मजा केली. पण तुला जागे करण्याचा माझा हेतू नव्हता.”

बैलाला राग आला त्याने छोट्या उंदराचा पाठलाग सुरू केला. उंदीर जीव वाचवण्यासाठी दगडी भिंतीच्या बिळात लपला, व बैल काय करतो आहे याची वाट पाहू लागला.

बैल पळत भिंतीपर्यंत आला. परंतु तो उंदराला पकडू शकला नाही. तो ओरडला, “हे शूद्र प्राण्या, मी तुला धडा शिकवीन.” त्याने भिंतीला धडक मारली. भिंत खूप मजबूत होती.

उंदीर बैलाला म्हणाला, “एवढ्या लहान गोष्टीसाठी तू आपले डोके का फोडून घेतोस?” बैल तिथून निघून गेला.

तात्पर्य – प्रत्येक वेळेस शक्ती कामास येते असे नाही

16. गाढव आणि कुत्रा – Marathi Story for Kids

Marathi Story for Kids 12

Gadhav Ani Kutra : एक लहान खेड्यात एक कुंभार राहत होता. त्याने एक कुत्रा राखण करण्यासाठी व एक गाढव ओझे वाहण्यासाठी ठेवले होते.

मालक बाहेरून आल्यावर कुत्रा हळूच भुंकून त्याचे स्वागत करत असे. कुत्रा पळत जाऊन आपले पाय मळकाच्या अंगावर ठेवीत असे. मालक कुत्र्याचे लाड करून त्याला चांगले जेवण देत असे.

गाढव दुरून असे रोज पाहत असे. त्याला कुत्र्याचा हेवा वाटू लागला. तो मनात म्हणत असे कुत्र्याचे जीवन किती सुखी आहे. नुसती राखण करायची व अनोळखी माणसावर भुंकायचे, हेच त्याचे काम. तरी मालक त्याच्यावर प्रेम करतो. माझ्याकडे पहा! मी सर्व ओझे वाहतो, तरीपण मला पाठीवर पटके आणि उरलेले खायला मिळते.

गाढवाने ठरवले आपण कुत्र्यासारखे वागायचे. म्हणजे मालक आपल्याला चांगली वागणूक देईल. तो इकडे तिकडे फिरू लागला. अनोळखी माणसावर ओढू लागला. मालक आलेला पाहिल्यावर गाढव त्याच्या स्वागतासाठी ओरडले आणि पुढचे दोन पाय मालकाच्या अंगावर ठेवले.

मालकाला खूप राग आला. त्याने एक मोठी काठी घेऊन गाढवाला खूप मारले. बिचारे गाढव!

तात्पर्य – दुसऱ्याचा द्वेष करू नये

17. माकडाचा न्याय – Makdacha Nyay Story in Marathi

Marathi Story for Kids 10

Makdacha Nyay : सणाचे दिवस होते. दोन मांजरे एकत्र फिरत होते. एक मांजराला मोठा केक दिसला आणि तो मांजर ओरडले. इतक्यात दुसऱ्या मांजराने उडी मारली व केक उचलला. पहिले मांजर म्हणाले, “मला केक दे, कारण मी तो प्रथम पाहिला आहे.”

दुसरे मांजर म्हणाले, “त्यापासून दूर राहा. कारण मी तो घेतला आहे.” ते खूप भांडू लागले, परंतु काही निर्णय झाला नाही. तेथून एक माकड जात होता. त्याने विचार केला, ‘काय मूर्ख मांजरे आहेत. मला यांचा फायदा उठविला पाहिजे.

तो मांजराकडे आला आणि जोरात ओरडला, ‘भांडू नका मी याची समान वाटणी करतो.’ दोघांनी केक माकडाकडे दिला.

माकडाने केकचे दोन तुकडे केले. तो मान हळवून म्हणाला, ‘अरे! एक तुकडा मोठा झाला.’ असे म्हणून त्याने त्या तुकड्यातील काही भाग खाल्ला. नंतर म्हणाला, ‘अरे! हा तर छोटा झाला.’ त्याने दुसऱ्या केकचा तुकड्यातील भाग खाल्ला. असे करत त्याने सर्व केक खाल्ला. बिचारी मांजरे हताश झाली.

तात्पर्य – दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ

18. शेतकरी आणि जादूचे बदक – Marathi Katha

Marathi Story for Kids 11

एक गरीब शेतकरी होता. तो खूप दारिद्र्य होता. एक दिवशी त्याला एक जादूचे बदक मिळाले. ते रोज एक सोन्याचे अंडे देई. तो ते विकून घरासाठी वस्तू विकत आणत असे. लवकरच तो श्रीमंत झाला.

एकदा त्याच्या मनात एक वाईट कल्पना आली, ‘बदक रोज एक सोन्याचा अंडे देत आहे, तर त्याच्या पोटात अशी कितीतरी अंडी असतील, मी जर त्याचे पोट कापले, तर मला सर्व अंडी एकदम मिळतील व मी श्रीमंत होईन.

त्याने बदकाला मारले व त्याचे पोट कापले. पण त्याला एकही अंडे मिळाले नाही. त्याच्या लोभा मुले त्याने जादूचे बदक गमावले तसेच सोन्याची अंडी देखील.

तात्पर्य – अति लोभ करू नये

19. सिंहाची शिकार

Marathi Story for Kids 2

कडक उन्हाळ्याचे दिवस होते. जंगलातील प्राण्यांना अन्न मिळणे कठीण झाले होते. अस्वल कोल्हा व लांडगा यांनी सिंहाची मदत घेऊन शिकार करण्याचे ठरवले. ते सिंहाकडे गेले. सिंह तयार झाला. ते चौघेजण शिकारीला गेले.

त्यांना एक म्हैस दिसली. कोल्हा व लांडग्याने म्हशीची पाठलाग केला. अस्वलाने म्हशीला पकडले. सिंहाने तिला ठार मारले.

कोल्ह्याने म्हशीचे चार भाग करण्याचे ठरवले. प्रत्येक जण आपला वाटा घेऊ लागला. तेव्हा सिंह गुरगुरला, “पहिला भाग माझा आहे. कारण मी शिकारीचा प्रमुख होतो दुसरा भाग पण माझा आहे कारण मी म्हशीला मारले आहे. तिसरा भाग पण माझा आहे कारण तो माझ्या पिल्लांना हवा आहे. चौथा भाग ज्याला हवा आहे त्याने माझ्याशी लढाई करावी.”

तिघेजण एकही शब्द न बोलता निघून गेले.

तात्पर्य – बळी तो कान पिळी

20. वाळवंटाची गोष्ट

Marathi Story for Kids 1

देवाने जग निर्माण केले तेव्हा वाळवंट नव्हते. सर्व जग सुपीक मातीने बनलेले व झाडांनी भरलेले होते.

जगाचा सांभाळ करण्यासाठी देवाने माणसाची निर्मिती केली. देव म्हणाला, “जेव्हा तू पाप करशील, तेव्हा मूठभर वाळू जमिनीवर पडेल.” माणसाने विचार केला, “मूठभर वालू ने काय फरक पडणार आहे? मी हवे तसे जगेन.” माणसाच्या हातून पाप घडण्यास सुरुवात झाली व मूठभर वाळू पडत राहिली. त्याचा परिणाम असा आहे की जगात अनेक वाळवंटे तयार झाली.

तात्पर्य – पेराल तसे उगवेल

21. दोन मुले व दुकानदार – Marathi Katha

दोन तरुण एका मिठाईच्या दुकानात गेले. दुकानदाराचे लक्ष दुसरीकडे आहे ते पाहून त्यातल्या एका मुलाने जवळच असलेल्या थाळीतील एक लाडू उचलला आणि दुसऱ्या मुलाच्या हाती दिला. त्याने तो लाडू पटकन खिशात टाकला. थाळीतील एक लाडू कमी झाल्याचे लक्षात येतात तो हलवाई हलवाई त्या तरुणांना म्हणाला, ” तुम्हा दोघांपैकी कोणीतरी लाडू चोरला आहे.” त्यावर प्रत्यक्षात लाडू चोरणारा तरुण म्हणाला, ” मी देवाची शपथ घेऊन सांगतो की मजपाशी लाडू नाही.” ज्याच्या खिशात लाडू होता तो म्हणाला, “शेठ, मीही देवाची शपथ घेऊन सांगतो की तुमच्या थाळीतला लाडू मी उचललेला नाही.”

तात्पर्य – भाषेच्या कसरतीने एखादा इसम निरपराधी असल्याचे सिद्ध करता आले तरी प्रत्यक्षात तो अपराधी असू शकतो.

22. देव हा आडदांड लोकांचा आहे

लहान मुलांच्या मराठी गोष्टी : एक गरीब व श्रद्धाळु माणसाकडे देवाची लाकडी मूर्ती होती. तो मनुष्य त्या मूर्ती समोर दररोज तासंतास बसून तिची पूजा अर्चा करी व आपली परिस्थिती सुधारण्यासाठी त्या मूर्तीची प्रार्थना करी. परंतु त्याची परिस्थिती सुधारण्या ऐवजी ती दिवसेंदिवस अधिकाधिक बिघडू लागली. अखेर एके दिवशी रागाच्या भरात त्याने ती लाकडाची मोठी मूर्ती जमिनीवर आदळली. त्याबरोबर आतून पोकळ असलेली ती मूर्ती फुटून, तिच्यातून शेकडो सुवर्ण मोहोरे बाहेर पडल्या.

त्या पाहून तो मनुष्य म्हणाला, “देवा, स्पष्ट बोलतो, त्याबद्दल मला क्षमा कर, पण तू तुझी भक्ती भक्ती भावे पूजा आर्चा करणाऱ्यांचा नाही. तुला न जमनणाऱ्या आडदांड व जबरदस्त अशा माणसांचा आहेस. त्यालाच तू पावतोस. इतके दिवस मी तुझी पूजाअर्चा केली तेव्हा तू मला पावला नाहीस, पण आता मी तुला आपटताच तू शेकडो सुवर्ण मोहरे मला देऊन माझे दारिद्र्य घालवलेस.”

तात्पर्य – देव हा दुर्बलांचा नव्हे तर प्रबळांचाच पाठीराखा असतो रबलांचा

23. उद्योगी चिमणी आणि चैनी पोपट

एका बागेतील झाडावर एक लहानसा पोपट आपल्या आईसह राहत असे. त्याची व बागेत येणाऱ्या एका चिमणीची घनदाट मैत्री जमली. एके दिवशी तो पोपट आपल्या आईला म्हणाला, “आई ग, बागेत येणारी चिमणी माझ्यापाशी फार प्रेमाने वागते. मला ती फार आवडते. तिथे आनंदी व खेळकर आहे ती!”

यावर पोपटाची आई म्हणाली, “बाळा, ती चिमणी इकडून तिकडून धान्य मिळवते, आपल्या घरट्याची नित्य नेहमी डागडुजी करते आणि मगच ती तुझ्याशी खेळायला येते. त्यामुळे कडक हिवाळ्यात ती उद्योगी चिमणी तिच्या उबदार घरट्यात आराम करीत राहील आणि नुसत्या मौज मजेत वेळ घालवणाऱ्या तुझ्यावर मात्र थंडीत कुडकुडीत राहण्याची पाळी येईल.”

तात्पर्य – प्रत्येकाने आज मजा मारताना उद्याचा ही विचार करावा

24. दोन बेडूक

उन्हाळ्यात एक तलाव पूर्ण आटवून गेल्याने, त्याच्यातले दोन बेडूक नव्या तलावाच्या शोधात बाहेर पडले. वाटेत त्यांना आत थोडेफार पाणी असलेली एक खोल विहीर दिसली. तेव्हा त्याच्यातला एक बेडूक दुसऱ्याला म्हणाला, “दोस्त, हिच्यात पाणी असल्याने, आपण याच्यातच उड्या घेऊया.

यावर दुसरा बेडूक पहिल्याला म्हणाला, “बाबा रे, हिच्यात सध्या पाणी असले तरी ते काही दिवसांनी आटून जाण्याची शक्यता आहे. तसेच झाले, तर याच्यातून बाहेर पडता येण्यासारखे नसल्याने, आपल्यावर पाण्याविना प्राणांना मुकण्याचा प्रसंग येईल.”

तात्पर्य – कुठलीही गोष्ट करताना तिचे पुढे काय परिणाम होतील याचाही विचार करणे गरजेचे असते

25. बुद्धिमान कोकरू – Marathi Story for Kids

एकदा एक कोकरू रानात चरता चरता मेंढ्यांच्या मूळ कळपापासून दूर गेला व एका लांडग्याच्या तावडीत सापडला. लांडगा आता आपल्याला मारून खाणार हे कळताच ते कोकरू त्याला म्हणाले, “लांडगे दादा तुम्ही मला बेशक मारून खा, पण त्यापूर्वी माझी एक इच्छा पूर्ण करा. त्या झाडाखाली एका मेंढपाळाचा पावा पडला आहे ना? त्या पाव्यावर एक गोडसे गाणे वाजवा. मी त्या चालीवर थोडा नाचतो आणि मग तुमच्या स्वाधीन होतो.”

त्याप्रमाणे लांडग्याने पावा वाजवायला सुरुवात करताच ते कोकरू नाचू लागले आणि पाव्याची ती सुरावट एकून धनगरांचे शिकारी कुत्रे त्या दिशेने धावत आले. त्यांना पाहून त्या लांडग्याने हाती आलेल्या त्या कोकराला सोडून तिथून पळायान केले. पळता पळता तो लांडगा स्वतःशीच म्हणाला, “जो मुख्य काम सोडून नसत्या फंदात पडतो, त्याचे मुख्य कामही होत नसल्याने तो अखेर स्वतःचा तोटा करून घेतो.”

Marathi Story for Kids PDF

आम्हाला आशा आहे की तुम्हाला या सर्व Marathi Story for Kids | Marathi Short Stories for kids in Marathi | Motivational story in Marathi | Story in Marathi for Child गोष्टी आवडल्या असतील. या Moral Stories in Marathi तुम्ही तुमच्या मुलांना मुलींना वाचण्या साठी सांगू शकता.

धन्यवाद !

हे देखील वाचा MARATHI STORIES FOR KIDS WITH MORAL | लहान मुलांच्या मराठी गोष्टी | MARATHI GOSHTI 2023

बुड बुड घागरी मराठी गोष्ट । Bud Bud Ghagri Story in Marathi

Share and Enjoy !

Shares
Similar Posts

Leave a Reply